मुक्ती
श्री गणेशाय नमः
मुक्ती
श्री गणेशाय नमः
मुक्ती
आजचा पाऊस
फारा वर्षांनी
पुन्हा तुझा माझा
कोसळत राहिला
बाहेरही अन आतही
काचांवर अन खाचांतून
डोळ्यांच्या अविरत ...
सारे थेंब ओथंबलेले
सावरलेले आजवर
निसटले न जुमानता
माझ्याच नजरकैदेतून
ऐकूआली टपटप
तुलाही दूरवर
माझ्याही नकळत
ओघळलेल्या सरींची
सावरले परत क्षण सारे
आवरत पसारा थेंबांचा
त्यातील काही थेंबांवर मात्र
हक्क तुझाही होता
शमा
7 एप्रिल मंगळवार.. गॅलक्सी सॉफ्टवेअर प्रा. लि. चे सि इ ओ मि. दिक्षित आपल्या स्टाफ सोबत मिटिंग मध्ये व्यस्थ..
सर्व इंम्प्लॉई गंभिरपणे त्यांचे बोलणे ऐकत होते. हॉल मध्ये खूप गंभिर वातावरण झाले होते. पण त्या हॉल मधिल एकच खूर्ची रिकामी होती. सि. अकॉटेंट मि. सागर यांची.
इतक्यात त्या तणावलेल्या वातावणात हॉलचा दरवाजा धाडकण उघडला आणि सागर चा आवाज ऐकू आला. मे आय कम इन सर?.. - सागर.
येस यू कॅन.. -दिक्षीत.
सागर गडबडीने आत येऊन त्या रिकाम्या खूर्ची वर बसला. सगळा स्टाफ त्याच्याकडे एखाद्या वेड्याप्रमाणे पहात होता.
फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते. ३-४ महिन्यांच्या (प्रदीर्घ ) कालावधीनंतर एका कसलेल्या गिर्यारोहकासमवेत सिंहगड-राजगड-तोरणा पदयात्रेला जायची संधी चालून आल्यावर मी लागलीच होकार कळवला. एकूण ६ लोक असणार होते. सिंहगड ते राजगड ते तोरणा एका दिवसात करून पुण्यात रात्री परतायचा बेत होता! त्याप्रमाणे पहाटे ३:३० ला निघालोही.चमूशी जुजबी ओळख करून घेतली." तू सिंहगड ला नियमित आहेस ना? " असा प्रश्न मला २-३ लोकांनी विचारला. मी त्यावर "नाही" असे उत्तर दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची काळजी दिसे. सिंहगड पायथ्याला गाडी ठेऊन, पहाटे ५ ला आम्ही चढाई सुरु केली आणि एका तासात देवटाक्यापर्यंत पोहोचलो.
पाणी हेच जीवन .... ही गोष्ट आपण शाळेत शिकलेली व पुढे आयुष्यात पदोपदी अनुभवलेली आहे. निसर्गाने प्रत्येक सजीवास जीवन जगण्यासाठी उचित प्रमाणात अन्न पाणी नेहमीच उपलब्ध ठेवलेले आहे. नैसर्गिक अन्न साखळीतील मानवी हस्तक्षेपाने आज आपल्याला पाणी टंचाई जाणवते.
चोर तर आहेच वर शिरजोर आहे
काळजाचा घोर हा घनघोर आहे!
जाळतो आहे जिवाला रोज थोडे
पावसाचा जोर या कमजोर आहे!
ऐन दुःखाचा पसारा मांडला मी
वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे!
तू नको जावूस माझ्या शांततेवर
वेदने,मी वादळाचा पोर आहे!
जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे!
वाचण्याआधीच हे लक्षात घे तू
मी कुणी नाही कवी,चितचोर आहे!
—सत्यजित
नका बांधू चौकटींनो मला उधळून जावू द्या
तडा गेलाच आहे तर मला निखळून जावू द्या!
नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे
मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जावू द्या!
घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो
पहाटे काफिला तुमचा मला वगळून जावू द्या!
अशा बेरंग अश्रूंच्या कुठे उरती खुणा मागे?
गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जावू द्या!
मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती
म्हणाली पेटले आहे..अता उजळून जावू द्या!
नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू
ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जावू द्या!
वसई रोड जवळ येऊ लागले तसा ‘पश्चिम’चा वेग वाढत चालला होता. गाडी वळताना खिडकीतून पासून आज आमचा कार्यअश्व कोणता आहे, बडोद्याचा लालेलाल डब्ल्यूएपी-४ ई की गाझियाबादचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-७ याची खात्री करून घेतली, तर तो गाझियाबादचा डब्ल्यूएपी-७ होता. डहाणू रोडपर्यंत तरी थांबायचे नव्हते आणि बडोद्यापर्यंत Automatic Block System ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे पुढच्या गाडीच्या हालचालीनुसार मागच्या गाडीला सिग्नल्स मिळत जाणार होते. त्यामुळेही गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होत असते. आता गाडीतली गडबड जरा कमी झाली होती आणि रसोई यानातील कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली होती.
शास्त्रीय नाव Nyctanthes arbor-tristis
मराठीत पारिजात, प्राजक्त, तर हिंदीत, हरश्रृगार/ हरसिंगार, तसेच संस्क्रुत मधे शेफालिका..
पारिजात.... नाव घेताच सुगंध दरवळतो ना! पहाटे चे मंद मंद आसमंत, गार वारा, कोवळे उन आणि त्यात अंगणात पडलेला
प्राजक्ताचा सडा...
आ हा हा! सारेच कसे सुखद, आल्हाददाई वाटते.
पारिजात हे खरोखर स्वर्गय फुल भासते... रंग, रुप, गंध, गुणधर्म सारेच कसे अनोखे..