कशा मला ते हसून गेले
उगीच होते छळून गेले
छते जपावी अता मनाची
तडे घराला पडून गेले
चढेल व्हावा जरा तमाशा
तसेच काही रडून गेले
नसेल कारे कुणीच वाली
मढे स्मशाणी सडून गेले
जबाबदारी नको कुणाला
लगेच सारे पळून गेले
स्वप्न उराशी जपून माझ्या
निलेश कारे जळून गेले
निलेश वि. ना शेलोटे
वृत्त :- जलौघवेगा
(लगालगागा लगालगागा)
घरच्या उपयोगा साठी कोणते Fiber ब्रॉडबँड इंटरनेट वापरावे
नमस्कार मंडळी,
लॉकडाऊन मध्ये वाचण्यासाठी मायबोलीवरच्या तुम्हाला आवडलेल्या कुठल्याही विषयांवरच्या धाग्याची लिंक इथे द्या.
आपल्याला सगळ्यांना तर परत वाचता येतीलच पण भारतात एकटे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्या लिंक्स पाठवता येतील. त्यांना नेहमीच्या बातम्या आणि भीतीदायक कायप्पा मेसेजेस पासुन तेव्हढाच विरंगुळा.
सर्व विषय / कथा चालतील....
चला तर मग, वाट बघते आहे.
धन्यवाद!
कोरोनामुळे झालेली सक्तीची स्थानबध्दता/वानप्रस्थ किंवा सब्बॅटिकलचे भविष्यकालीन परिणाम…
मित्रांनो,
रविवारचा एक दिवसाचा लाॅकडाऊन बऱ्याच जणांनी एंजाॅय केला..
कडकडीत लाॅकडाऊन मुळे अनुभवलेली शांतता, पक्षांचे आवाज याबाबत बरेच जण सोशल माध्यमांवरतीही भरभरुन व्यक्त झाले.
रूद्राभिषेक विधी,त्याचे महत्व ,रूद्राभिषेकाचे प्रकार ,स्त्रिला हा विधी करता येतो का,पुजा विधी ब्राम्हनाकडूनच करून घ्यायची की स्वतःसुध्दा करू शकतो, किती वेळ लागतो इ.माहीती हवी आहे.
माझा एक सहकारी व्हिजा संपल्यामुळे कायमचा भारतात परतणार आहे. त्याला दोन वर्षीय कन्या आहे जी अमेरिकेत जन्मल्यामुळे अमेरिकन नागरिक आहे...
तर भारतात म्हणजे पुण्यात गेल्यावर त्याला तिथे मुलीबद्धल सरकार दरबारी काही नोंदी अथवा माहिती द्यावी लागेल काय? जसे कि पोलिसांकडे नोंद वगैरे?
कोणास काही माहित असल्यास कृपया या धाग्यावर माहिती देऊन सहकार्य करावे..
कशी लिहावी कविता
हात थरथरत असताना...
आह् निघत नाही कधीही
वार काळजावर होताना...
कुठल्या दुःखात आहेस तू
कुणी विचारतो मज हसताना...
ओझे मणांचे वाटे मज
जीवन जगत असताना...
अन् होतात डोळे ओले
द्वंद मनीचे मांडताना...
(उत्तरार्ध भाग १: https://www.maayboli.com/node/72953)
कोर्टातला पहिला दिवस पूर्ण वाया गेला. ऑफिसला रजा टाकून गेलो होतो. रजा वाया गेली. मन:स्तापच जास्त झाला. मग दोन दिवस थांबलो आणि वकिलाची चाचपणी केली. नशिबाने एका मित्राच्या ओळखीचा वकील भेटला. हा मात्र खरेच वकील आहे असे त्याच्याशी बोलताना जाणवत होते. त्या म्याडम सारखा नव्हता. त्याला मी माझी केस सांगितली. त्याने मला डेबिट कार्ड आणि आयडी प्रुफ घेऊन ठराविक तारखेला कोर्टात यायला सांगितले.