जोहान्सबर्ग: दीर्घकाळ राहणे कितपत सुरक्षित वा असुरक्षित

Submitted by atuldpatil on 2 February, 2019 - 00:35

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) मध्ये दीर्घकाळ राहायचा अनुभव असलेले मायबोलीकर आहेत का? कितपत सुरक्षित/असुरक्षित आहे हे शहर (विशेषतः Sandton भाग) याविषयी माहिती हवी आहे. गुगल वर पाहतोच आहे. पण प्रत्यक्षात तेथे राहून आलेल्या व्यक्तीशी याबाबत बोलायला व अनुभव ऐकायला मिळाले तर ते जास्त बरे होईल, म्हणून हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाहिला होता हा धागा. पण मला जाऊन दहा पंधरा वर्षे झाली आहेत. आताची परिस्थिती ठाऊक नसल्याने प्रतिसाद दिला नव्हता. पण इथे कुणीच काही लिहीलेले दिसत नाही म्हणून..

त्या वेळी आम्हाला सायंकाळी बाहेर पडू नका. विमानतळावर चो-या होतात, मौल्यवान वस्तू घेऊन एकटे दुकटे बाहेर पडू नका अशा सूचना मिळालेल्या होत्या. तसेच कुठल्या ठिकाणी जाऊ नये, कुठे जावे. सुरक्षितता कशी बाळगावी याच्या अनेक सूचना होत्या. एव्हढ्यात जर परिस्थिती सुधारलेली असेल तर माहीत नाही.

धन्यवाद किरणुद्दीन. हो हे खरे आहे असाच फीडबॅक आणखीन काही जणांनी पण सांगितला. त्यातल्या त्यात Sandton हे बरेच सुरक्षित आहे असे कळले (म्हणजे 'त्यातल्या त्यात'च). मायबोलीकर तसेच तिथे राहून आलेल्या इतर काही परिचितांशी बोलल्यानंतर बरीच माहिती मिळाली आहे. पुन्हा एकदा धन्यवाद Happy

माबो कर 'शापित गंधर्व' काही वर्षे साऊथ आफ्रिकेत होता. पण तो आता इथे ऍक्टिव्ह नाही. तुम्हाला जर अजूनही शंका असतील तर त्याला विचारून मी त्याचा नंबर तुम्हाला देईन. तो भटक्या आणि adventurous असल्यामुळे तुम्हाला माहितीचा खजाना मिळेल. तुम्ही long term assignment वर जाणार आहात की फक्त quick visit?

दिनेशदा केनयाला बरीच वर्षे राहतात. ते इथे आता अॅक्टीव नाहीत पण त्यांना संपर्क करू शकता. त्यांना त्या सगळ्या भागाची माहिती आहे.

>> Submitted by मीरा.. on 14 February, 2019 - 10:55

निर्णय घेण्यासाठी प्राथमिक माहिती आवश्यक होती. अद्याप जाण्याचे नक्की नाही. पण हो नक्की झाले तर मी आपणाकडून त्यांचा नंबर घेईन.

>> Submitted by भगवती on 14 February, 2019 - 16:47

हो मी दिनेशजींशी संपर्क साधून विचारणा केली आहे.

धन्यवाद Happy