हितगुज ग्रूप

एक आठवण

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 1 April, 2019 - 08:17

मी माबोवर येऊन जवळ्पास ८ वर्षे ६ महिने झालीत. आजकाल लिखान करत नसल्यामूळे जुन्या आठव्णिंना उजाळा द्यावा म्हणून हा प्रपंच. सुरूवातीला काही कविता पोस्ट करताना कित्येकांनी खिल्ली उडविली. नंतर मैत्री वाढत गेली. त्यात आठवण ठेवण्यासारखी बरीच माणसे मिळाली ती अजुनही स्मरतात कधीकधी माबोवर आलो की ह्या पैकी फारसे कोणी दिसत नसल्याने मन हेलावते.
वे.मा. चिनूक्स
१) मंदार जोशी
२) बेफीकीर
३) कैलास गायकवाड
४) विदिपा
५) आर्या
६) शोभा १२३
७) भुंगा
८) किश्या
९) राजे
१०) स्मिता
११) आशुचँप
१२) दक्षी
१३) शुकु
१४) ह.बा

जोहान्सबर्ग: दीर्घकाळ राहणे कितपत सुरक्षित वा असुरक्षित

Submitted by अतुल. on 2 February, 2019 - 00:35

जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) मध्ये दीर्घकाळ राहायचा अनुभव असलेले मायबोलीकर आहेत का? कितपत सुरक्षित/असुरक्षित आहे हे शहर (विशेषतः Sandton भाग) याविषयी माहिती हवी आहे. गुगल वर पाहतोच आहे. पण प्रत्यक्षात तेथे राहून आलेल्या व्यक्तीशी याबाबत बोलायला व अनुभव ऐकायला मिळाले तर ते जास्त बरे होईल, म्हणून हा धागा.

नवय्राच्या वाढदिवसाला एक (एकुलती एक) बायको भेटवस्तू काय देते?

Submitted by Mi Patil aahe. on 19 January, 2019 - 02:43

याच महिन्यात मि. चा वाढदिवस आहे तरी काय गिफ्ट द्यावे यावर्षी हे सुचत नाही, कोणी सांगेल का एक बायको आपल्या नवय्राला देवून देवून काय गिफ्ट देवू शकते??????
काही आयडिया असेल तर बिनधास्त ( इच्छा असेल तर) सुचवण्याचे कष्ट घ्यावेत,ही विनंती!!!!!

___________ शांतपणे जाहिर सूचना__________
(खास फालतू"पालतू श्रद्धेसह"सल्ला/ प्रतिसाद देऊ पाहणाय्रांसाठी)

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

संक्रांतीचे वाण काय असायचे,आधी;अन् आता काय असावे?

Submitted by Mi Patil aahe. on 12 January, 2019 - 00:15

संक्रांतीला मायबोलीवरील माय-भगिनी संक्रांतीचे वाण म्हणून काय लूटणार आहेत,हळदी-कुंक कार्यक्रमात!
दरवर्षी काय-काय लूटले?
या वर्षी काय वाण ठेवणार?
काय वाण ठेवायचे राहून गेले?
काय वाण ठेवायला हवे?
काय ठेऊ नयेत?
कसा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ठेवायला हवा?
काय वाटते,या वर्षी संक्रांती कशी साजरी करावी?
गोड बोलून,की नुसतेच तिळगुळ देऊन!!!!
की आणखी काही भन्नाट कल्पना/आयडिया सुचली आहे/सूचत आहे/सुचली होती पण राहून गेली , मागच्या वर्षी!!!,की सुचतच नाही!
का हळदी-कुंकू कार्यक्रम आवडत नाही, पण काय करणार, करावा लागतो!

पुन्हा एकदा सैराट

Submitted by DJ. on 20 December, 2018 - 03:23

आज सकाळी-सकाळीच बातमी वाचली. बीड मधे सैराट स्टाईलने मेहुण्याची हत्त्या!

बातमी खोलात जाऊन वाचली. वाघमारे कुतुंबातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या सुमीतची घरची परिस्थिती अत्यंत डबघाईची होती. हा सुमीत रा.काँ. चा कार्यकर्ता होता असाही उल्लेख बातमी मधे होता. खून का झाला हे सविस्तर वाचले तेव्हा कळाले की सुमीतने बीड मधील गर्भश्रीमंत असलेल्या लांडगे घराण्यातील मुलीशी विवाह केला आणि हा विवाह मान्य नसल्याने मुलीचा भाऊ बालाजी याने निर्घ्रूण खून केला.

आता लांडगे-वाघमारे वरुन शाब्दिक चकमकी होतीलच पण त्याआधी माझ्या मनात खालील प्रश्न आले :

या व अशा घटना #MeToo च्या उलट प्रकारच्या आहेत का?

Submitted by Parichit on 14 December, 2018 - 04:37

आयुष्यात काही घटना अशा घडतात कि त्यांचे स्पष्टीकरण मिळत नाही. पुढे काही काळ जातो. आपण वयानुसार परिपक्व होत जातो. आपल्याला अजून काही माहिती मिळत जाते. किंवा आसपास अजून काही घटना घडतात. आणि मग कदाचित पूर्वी घडलेल्या 'त्या' अनाकलनीय घटनांचे अर्थ लागतात. बर, आता जास्त फुटेज खात नाही सरळ मुद्द्यावर येतो. माझ्या आयुष्यात पूर्वी ह्या घटना घडल्या आहेत. ह्यातली प्रत्येक घटना म्हणजे स्वतंत्र लेख होईल. पण विस्तारभयास्तव इथे कमीत कमी शब्दात मांडत आहे:

शब्दखुणा: 

मदत पाहिजे!!

Submitted by dr pranjal on 12 December, 2018 - 14:30

मायबोलीवर लेखनाचे धागे मिळण्याबाबत.

प्रिय मित्रांनो आणि मैत्रीनिन्नो मायबोलीवर एका कथेचे धागे सलग मिळू शकतात का?? कारण प्रत्येक कथेचा प्रत्येक भागाचा धागा हा वेगवेगळ्या pages वर शोधावा लागतो. आता तुम्ही म्हणाल शोधा म्हंजे सापडेल पन जर धाग्याच्या शेवटी जर next part च्या धाग्याची link असेल तर सोपे जाईल आणि कथा सलग वाचायला सुद्धा मजा येईल.

आपला आभारी
प्रांजल

शब्दखुणा: 

हरिश्चंद्रगड - नाईट ट्रेक

Submitted by DJ. on 31 October, 2018 - 11:18

ट्रेकची आवड आहे पण ट्रेकची आवड असणारा परिवार, नातेवाईक किंवा मित्र-मैत्रीणी नसल्यामुळे ट्रेकला जाऊ न शकणार्‍या अनेकांपैकी मी एक. ठकाला ठक भेटतोच या ऊक्तीप्रमाणे मलाही ट्रेकची आवड असणारी आमच्या ऑफिसमधील मिलन भेटल्यामुळे या वर्षी २ ट्रेक करता आले. इतकी वर्षं आम्ही दोघे एकाच ऑफिस मधे एकाच बसने जातो पण दोघांनाही ट्रेकची आवड आहे हे आम्हाला माहितच नव्हते. मिलनने जानेवारीत २६-२७-२८ चा लाँग वीकेंड बघुन एका ट्रेकिंग ग्रुप सोबत मला 'कळसुबाई'ला ट्रेकवुन आणले होते. त्यानंतर तिने आत्ता २७-२८ ऑक्टोबरच्या वीकेंडला "हरिश्चंद्रगड साठी नाईट ट्रेकला जायचं का?" विचारलं.

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप