मिन्दी गाणी - खेळ
हा एक टाईमपास खेळ आहे.
ह्यात हिंदी गाणी मराठीत भाषांतर करून लिहायची / गायची आहेत, जमेल तशी.
फा वे टा धाग्यावर उल्लेख केल्याप्रमाणे ही अशी गाणी (बे,) सुरात गायला मजा येते मला.
बघुया किती जमतय आपल्याला.
१. डोळ्यात तुझ्या विचित्र विचित्र अदा आहेत
हृदयाला बनवील पतंग श्वास तुझी ही हवा आहे
(आखो मे तेरी अजब सी अजब सी अदाए है - ओम शान्ती ओम)
२. माझ्या रंगात रंगणारी परी आहेस की पऱ्यांची राणी
की आहेस माझी प्रेमकहाणी
माझ्या प्रश्नांचं उत्तर दे गं बाई
दे ना
(मेरे सवालो का जवाब दो - मैने प्यार किया)