कुंडली/पत्रिका : खरे की थोतांड

Submitted by DJ. on 13 March, 2019 - 05:37

जन्मकुंडली

जन्मकुंडली ही एक समाजाला लागलेली एक कीड असे मला मनापासुन वाटते. मुल जन्माला आले की 'जन्मकुंडली काढुन घ्या' असे सांगणारे कुणीतरी उपटतेच. एकवेळ जन्माचा दाखला उशिरा काढला तरी चालेल पण जन्मकुंडलीआधी काढा असे सांगणारे महाभागही असतात. एखाद्या गर्भार स्त्रीला डॉक्टरांनी ९ महिने + ९ दिवस धरुन जो प्रसुती दिवस सांगितलेला असतो नेमका तोच दिवस कसा खराब आहे हे सांगणारा महामुर्ख त्या कुटूंबाला भेटतो आणि होणार्‍या बाळाच्या भवितव्याबद्दल नको त्या चिंता निर्माण करुन ठेवतो. इकडे बाळाची होणारी आई, वडील, अजोबा, आज्जी सगळे डॉक्टरला विनंती कम जबरदस्ती करुन त्या अपेक्षीत दिवसाच्या आधीच एखादा चांगला दिवस बघुन डिलिव्हरी करा म्हणुन भुणभुण लावतात. डॉक्टरने असमर्थता दाखवली तर सरळ डॉक्टरच बदलतात. अशा महामुर्ख कुटूंबाला त्या होणार्‍या बाळाच्या आणि आईच्या आरोग्याची जराही फिकीर नसते. मी तर एक महाभाग कुटूंब असे पाहिले आहे की त्यांना पितृपंधरवड्यात जन्मणारे बाळ नको होते. डॉक्टरांनी नेमकी पंधरवड्याच्या शेवटाची तारीख दिलेली. काहिही करुन ते बाळ पितृपंधरवड्याच्या आधी अथवा नंतरच जन्मावे म्हणुन त्या कुटुंबाने अक्षरशः १२ दिवस आधीच जन्माला घालायला भाग पाडले. त्यानंतर ते बाळ अशक्त आहे म्हणुन ८ दिवस काचेच्या पेटित ठेवले होते. बाळाच्या आजी-आजोबांच उत्साह दांडगा. येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक परिचिताला आपल्या पराक्रमाची रसभरीत वर्णने करताना थोडीसुद्धा शरम वाटत नव्हती.

पत्रिका

जन्मकुंडली चांगली यावी म्हणुन मुलांचा जन्म हव्या त्या दिवशी करुन घेणार्‍या कुटुंबांचा हुशारपणा बघत असतानाच मागे एकदा पत्रिका देखिल बदलुन लग्न लावणारे कुटूंब पाहण्यात आले. त्यांच्या मुलीच्या लग्नकुंडलीत मंगळ होता. त्यामुळे तिचे लग्न ठरत नव्हते. दिसायला देखणी आणि चांगल्या पगाराची नोकरी असुनही लग्न ठरण्यात अडाचणी येऊ लागल्या तेव्हा त्या काकांनी तिच्या जन्माचा दिवसच बदलुन घेतला. १ दिवस आधी जन्मवेळ दाखवल्यामुळे तिच्या पत्रिकेतुन मंगळ आपोआप अंतर्धान पावला आणि लगेच लग्न ठरले. तिच्या लग्नाला आता १० वर्षं झाली. २ मुले आहेत. सगळे सुरळीत चालु आहे.

मला अजुनही आठवते की मी एकदा आजीला विचारले होते की तिचे लग्न कुंडली पाहुन झाले का? तर ती "नाही" म्हणाली होती. माझ्या आई-वडिलांचे लग्न देखिल कुंडली न बघताच झालेले. म्हणजे कुंडली पहाण्याचे फॅड गेल्या २०-३० वर्षांपासुन सुरु झाले असावे असा माझा कयास.

कुंडली आणि पत्रिका हे थोतांड आहे यावर मी ठाम आहे पण एखाद्या अंधपणे विश्वास ठेवणार्‍याला खालील प्रश्न विचारले तर मात्र त्यावर समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत :

- चांगली वेळ पाहुन मुल जन्माला घालायला लावणारे निसर्गाच्या विरोधात जाऊन बाळाचे भविष्य सुरक्षीत करु शकत असावेत का?
- सिझरेयन बाळाची जन्मवेळ खरी मानावी का?
- कुंडली आणि पत्रिका यांवर विसंबुन लग्ने ठरवणार्‍यांच्या आजि-आजोबांनी पत्रिका पाहुन लग्न केलं होतं का?
- कुंडली/पत्रिका या फक्त ठराविक धर्मातील मुला/मुलींनाच कशा काय लागु होतात?
- मंगळ ग्रह एखाद्या मुस्लिम, जैन, परशी, शीख, बौद्ध,ख्रिस्ती समाजातील मुलांना/मुलींना त्रासदायक कसा काय नसतो?

हे सर्व थोतांड आहे हे थोड्या विचाराअंती कोणालाही कळु शकेल परंतु ज्यांची उपजिविका या गोरख धंद्यावर चालते त्यांनी अशा कुंडाल्या-पत्रिका बघुन समाजाला फसवण्याचा उद्योग अविरत चालु ठेवला आहे आणि तो फोफावतो आहे हे बघुन समाज कोणत्या दिशेस जातोय हा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. सरकार अशा फसवेगिरी करणार्‍यांवर वचक ठेवण्यास कमी पडत आहे तरिही आपण आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, परिचितांना समजावुन सांगुन या थोतांडापासुन नक्कीच दूर ठेऊ शकु असे वाटते.

Group content visibility: 
Use group defaults

Hahahhahahaha....actly malahi asech watate ase kahi naste ..n pan ek nakki ekada ki he khul dokyat gele nighat nahi..

स्वतःच्या experience वरून सांगते .. असाच एक महाराज आले होते last year कॉलनी मध्ये ..100rs मध्ये कुंडली ..त्या अगोदर काढलीही नव्हतीच मग म्हटले काय महाग आहे.. birth time आणि date दिली ..2nd day कुंडली मिळणार होती ..
माझें husband पूर्ण विरोधात आहे ह्या गोष्टीं च्या पण म्हटलं बघू आहे तरी काय..
Then nxt day त्यांचा student येऊन म्हणतो महाराज स्वतःच तुम्हाला भेटायचे म्हणत आहेत म्हटलं ठीक आहे ..आलेत ते आणि discuss करायला लागलेत की तुमच्या कुंडलीत मंगळ आहे आणि बराच काही बराच वेळ.. आणि माझा brain wash करण्यात यशस्वी पण झालेत ..आणि मग काय काही तरी दिले husband ला wallet मध्ये ठेवायला लावा म्हणून

5 मंगळवारी उपवास करायला लावला ,जे मी केलेत ..आणि दोन राशी रत्नं दिलेत..ला जे मला घ्यायचे नव्हते मुळात पण घेतलेत दिड दिवसात 5-६ हजार गेलेत आणि नाव काय त्यांचे किंवा कुठले ते काही idea नाही
आणि तेव्हापासून माझ्या मनातच बसून गेले मला मंगळ आहे ..काहीही झाले तरी मला वाटते माझ्यामुळे प्रॉब्लेम्स येतात...

तेव्हापासून माझ्या मनातच बसून गेले मला मंगळ आहे ..काहीही झाले तरी मला वाटते माझ्यामुळे प्रॉब्लेम्स येतात...

आगा गा! लिना अवघड आहे तुमचे. Lol
या विचारांमधून लवकर बाहेर पडा.

मंगळ ग्रहावर जन्माला येणाऱ्या भविष्यातील मुलांसाठी मंगलग्रहोत्पन्नकुंडलिसिद्धांतशिरोमनी लिहून टाका राव! परत म्हणू नका सांगितले नाही.

मायबोलीवर काही विषय कधीच आऊट ऑफ फॅशन जात नाहीत.

कुंडली/ज्योतिष/शास्त्र हा त्यातला सर्वाधिक लोकप्रिय विषय आहे. इथे चर्चा झडायला लागल्या की एक गाणे आठवते

हम को जो ताने देते है
हम खोये है रंगरलीयोंमे
हमने उनकोभी छुपछुपके
आते देखा इन गलियोन्मे...

चांगला धागा. तासभर आपण धरू की कुंडली बरोबर आहे, पण त्याचा बेस जन्मवेळ आहे की. आणि अचूक जन्मवेळ कशी कळणार? डॉक्टर चे घड्याळ योग्य कशावरून.

आणि एखाद्या मिनिटाने फरक पडत नाही धरले तर मग जुळ्यांचे भविष्य एकच असायला हवे की.

माझा तरी कुंडली प्रकारावर विश्वास नाही.

मला नाही वाटत यात काही फार तथ्य असेल. मी तरी आजवर कोणत्याही संतांनी कोणाला अमुक खडा घाल असे सांगितल्याचे वाचले नाही ... हा सगळा धंधा झालाय

Submitted by साधना on 13 March, 2019 - 16:13 + १००

धागाकर्त्याने लिहिलेय की ज्योतिषशास्त्रानुसार चांगल्या दिवशी बालक जन्माला यावे म्हणून मेडिकली बाळाचा जन्म पुढे / मागे करणारे लोक आहेत. मी तरी असे अजुन पाहिले नाहीत पण असतीलही.

अमेरिकेत, युरोपात व इतर अनेक विकसित देशात आपले बाळ ०१.०१.२००० रोजी जन्माला यावे म्हणून प्रयत्न करणारे व त्याकरिता हजारो डॉलर्स खरच करणार्‍या आणि मातेचे व बालकाचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या लोकांविषयी वाचले होते. थोडक्यात काय तर हे अंधश्रद्धेचे मानसिक पंगूत्व जगभर आहेच. प्रकार वेगवेगळे असतील.

DJ >> बहुदा हा धागा काढण्याचा योग्य तुमच्या पत्रिकेत होता Rofl Rofl Rofl

<<< हे अंधश्रद्धेचे मानसिक पंगूत्व जगभर आहेच. प्रकार वेगवेगळे असतील. >>>
सहमत

व्यक्तिशः मी कधीही ज्योतिषाकडे गेलो नाही, पत्रिका बघितली नाही, खडे घातले नाहीत . माझे काहीही अडले नाही किंवा वाकडे झाले नाही

<<<थोडक्यात काय तर हे अंधश्रद्धेचे मानसिक पंगूत्व जगभर आहेच. प्रकार वेगवेगळे असतील.>>>
अनुमोदन.
<<<हम को जो ताने देते है हम खोये है रंगरलीयोंमे हमने उनकोभी छुपछुपके आते देखा इन गलियोन्मे...>>
अत्यंत चपखल उदाहरण.

उदाहरण चपखल असेल नसेल ते सोडुन देऊ आपण.

परंतु नीट डोक्याने विचार केला तर ह्या पत्रिका/कुंडल्या थोतांड वाटत नाही का..??

पूर्वग्रह दूषित दृष्टी नसावी, अनेक बोगस सर्व क्षेत्रात आहेत लेखकाला असा कोणी भेटला असावा, अनेक खरे ज्योतिष सांगणारे ज्योतिषी आज हे आहेत, अनेक जण काही पैसा न घेता अचूक गोष्टी सांगणारे आहेत, या बरोबर तर्क बुद्धी वापरून आयुष्याचे कल्याण करता येवू शकते उदा ज्योतिषाने सांगितले की याच्या हातून चाकूने वर होणार आहेत, जर सद्बुद्धी असेल तर अभ्यास करू. निष्णात सर्जन बनेल आणि संस्कार न झाला तर गुंड, आपल्याकडे ऋण नुबंध मानले जातात आणि पूर्व कर्मानुसार व्यक्ती मित्र शत्रू पैसा पो आत्नी मुलेबाळे, नवरा, आरोग्य अशुपक्षी, रोग
सुख दुःख आपल्या जीवनात येतात असे मानले जाते , अर्थात विश्वास असावा किंवा नसावा खरे का खोटे ही ज्याची त्याची धारणा... पण या शास्त्राचा फायदा नक्की करून घाव्या ... एक अप्रतिम . व्हिडिओ लिंक शेअर करतो जरूर बघा.... ,https://youtu.be/lSvYkxVC-6s याशिवाय एक फॉरवर्ड शे अर करते
नाडी शास्त्र..
पूर्वीच्या काळी नुसती नाडी परीक्षा
करून वैद्य लोक आजार आणि निदान
करत होते.
सध्याच्या आधुनिक युगात ही रक्त
परीक्षण करताना.सलाईन चढवीत
असताना. ग्लुकोज देताना नाडी
परीक्षण करून शोधून च निदान केले
जाते.एवढेच काय तर प्राण गेल्यावर
आपण काय तपासतो तर ती नाडीच
असते..

काय असते ही नाडी..?
नाडी ही मानवाची नैसर्गिक प्रकृती
असते.नाडी ही तेव्हाच ठरते ज्यावेळी
तुम्ही मातेच्या गर्भात प्रवेश करता.
आयुर्वेदात नाडी ला जास्त महत्त्व
असते.नाडी मुळे प्राण व त्याचे
चलन वलन समजते.

नाडी चा प्राणवायू अधिष्ठाता असल्यामुळे.अत्यंत महत्वाचा ठरतो
प्राणवायू हाच पंच महाभुतांचा ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रिये यांचा
ज्ञान देणारा आहे.
नाडी तीन प्रकारच्या असतात.
आद्य नाडी. वात प्रकृती
मध्य नाडी पित्त प्रकृती
अंत्य नाडी.कफ प्रकृती.

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये
वात दोष विकार होतात.
एप्रिल, मे, ऑगस्ट,नोव्हेंबर लागले
की पित्त दोष होतात.
फेब्रुवारी,मार्च,ऑक्टोंबर,नोव्हेंबर
मध्ये कफ दोष होतात.
जून,जुलै महिन्यात कफ वात दोष
होतात.

शनी ग्रह वात दोष निर्माण करतो.
गुरु कफ दोष देतो.
रवी आणि मंगळ पित्त दोष देतात.
जे ग्रह दुर्बल असतात
६ ८ १२ चे स्वामी असतात.मारक
स्थान चे स्वामी असतात..त्यानुसार
प्रकृती दोष देतात.
आणि आपण मग समजतो आरोग्य
बिघडले आहे.

विवाहाच्या बाबतीत नाडी महत्त्वाची
समजली जाते..
जेंव्हा पती पत्नी समान नाडी असते
तेंव्हा एक नाडी दोषामुळे समान दोष
असणारी प्रकृती बनते.
आणि जे काही गुण दोष आहेत तेच
परत संतती त उतरतात.
समान प्रकृती असणारी जोडपी एक
निरोगी निरामय दीर्घायु संतती कशी
बरे निर्माण करेल?

त्यासाठी पूर्वीच्या ज्योतिष कर्त्यानी
वैद्यक शास्त्र चा आधार देवून च
ठरविले की एक नाड असता विवाह
करू नये.
सध्याच्या आधुनिक काळात वितंड
वाद करणारी पिढी असल्यामुळे
काय होते आम्ही करून बघू..त्याला
काय होते ..या वादाला.पूर्णविराम
म्हणजे. गुणसूत्रअसतात त्याला आलेला दोष..बऱ्याच वेळा दिसून येतो..

आणि मनुष्य प्राणी अनुभवांती च
शिकतो..हे तर अटळ सत्य आहे.

@Gujji +1000
माबोवर ज्योतिषशास्त्राची बाजू मांडणे म्हणजे एक तर तुम्ही ढोंगी आहात किंवा तुम्हाला लोकांना लूबाडून स्वतःचा धंदा करायचा आहे असे समजले जाते.. असो. मला असे वाटते कि या जगात खरं आणि खोटं असे काही नसतच.. असतात ते आपापले अनुभव.. मी ज्योतिषाला मानतो म्हणून तुम्ही मानू नका तसेच कोणितरी सांगतो म्हणून अमान्यहि करू नका. स्वतः अभ्यास करा व ठरवा

Gujji : तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण हे सर्व एका ठरावीक धर्मासाठीच लागु होते असे का..?
तुम्ही म्हणताय तसे नाड पाहुन लग्न केले तरी सर्वात जास्त मतिमंद मुले एका ठरावीक समाजातच (लोकसंख्येच्या प्रमाणात) कशी काय दिसुन येतात (हल्ली सोनोग्राफीमुळे हे प्रमाण नगण्य झाले असले तरी गेल्या १५-२० वर्षांतला डेटा पाहिल्यास प्रत्यय येईल..!)

डिजे, म्हणूनच पूर्वी पत्रिका पहात. मध्यंतरी एका काकांनी ( ते ज्योतिषी आहेत ) यावर प्रकाश टाकला. पूर्वी एक नाड विवाह करु नये म्हणायचे. एक नाड म्हणजे वधु व वर या दोघांची एक नाड. आता नाडीचे प्रकार म्हणजे आद्य नाड, मध्य नाड व अंत्य नाड.

आद्य नाडीचा माणुस स्पष्टवक्ता असतो , मनात येईल ते बोलुन टाकतो. मध्य नाडीवाला काही वेळेस स्पष्ट बोलतो काही वेळेस नाही. तर अंत्य नाडवाला माणुस काहीच बोलत नाही, म्हणजे मनातल्या मनात कुढतो. मग यांच्या कुढण्याचे रुपांतर कधीतरी शाब्दिक स्फोटात होऊन भांडने होऊ शकतात. याकरता नवरा व बायको दोघांची नाड वेगळी हवी. जर नवरा - बायको दोघे आद्य नाडीचे असतील, तर कायम भांडतच बसतील, आणी अंत्य नाडीचे असतील तर मनात राग धरुन कधीतरी घटस्फोट घेऊन मोकळे होतील . नवरा बायको वेगळ्या नाडीचे असतील तर एकमेकांशी जुळवुन घेतात. दोघांपैकी कोणी एक तरी माघार घेतो. लव्ह मॅरेज बर्‍याच वेळा याचमुळे अयशस्वी होतात, कारण लग्ना आधी डिस्को करणार्‍यांना लग्नांनतर एकमेकांचे स्वभाव कळतात मग कथ्थक सुरु होते.

मतीमंद मुलांचे प्रमाण हे सख्ख्या नात्यात ( चुलत- मावस भावंडे ) लग्न केल्याने होतात. म्हणून हिंदुंमध्ये आत्याकडे मुलगी दिली जाते, काका वा मावशी कडे नाही. अपवाद आहेत अशाही लग्नांचे.

हम को जो ताने देते है
हम खोये है रंगरलीयोंमे
हमने उनकोभी छुपछुपके
आते देखा इन गलियोन्मे..+111

> सर्वात जास्त मतिमंद मुले एका ठरावीक समाजातच (लोकसंख्येच्या प्रमाणात) कशी काय दिसुन येतात (हल्ली सोनोग्राफीमुळे हे प्रमाण नगण्य झाले असले तरी गेल्या १५-२० वर्षांतला डेटा पाहिल्यास प्रत्यय येईल..!) > कोणता समाज? काही बातमी वगैरे आली होती का याबद्दल? असेल तर लिंक कृपया.

DJ तुम्ही ज्योतिषशास्त्राविरोधात पोलिसात किंवा न्यायालयात तक्रार किंवा जनहितार्थ याचिका का दाखल करत नाही?

Pages