हितगुज ग्रूप

सहकारी/मैत्रीण गर्भवती आहे असे प्रथमच दिसते तेंव्हा...

Submitted by एक मित्र on 9 August, 2017 - 09:21

फार महत्वाचा नसलं तरी जरा नाजूक विषय आहे. पण चर्चा झाली तर बरे होईल.

परवाची गोष्ट. ऑफिसमध्ये जुन्या प्रोजेक्ट टीम मधली एक सहकारी गर्भवती आहे असे लक्षात आले. तशी हि गुड न्यूज तिच्या सध्याच्या टीम मध्ये तर सर्वांनाच कळली होती. पण मला ती अनेक दिवसांनी पहिल्यांदाच लिफ्ट मध्ये भेटली. प्रेग्नंट आहे लक्षात आले. तर हाय हेलो झाल्यावर मी सहज तिला अभिनंदन म्हणालो. पण तिची प्रतिक्रिया फारशी चांगली नव्हती. वाईटसुद्धा नव्हती. नुसतेच कसनुसे स्मितहास्य केल्यासारखे करून ती दुसरीकडे पाहू लागली. नंतर काही बोलली पण नाही. त्यानंतर लिफ्टमधून बाहेर पडल्यावर सुद्धा बाय वगैरे न करताच निघून पण गेली.

पंख पसरून उडणारी डुकरे

Submitted by उडता डुक्कर on 1 August, 2017 - 08:30

पंख पसरून उडणारी डुकरे

तू माझे काय झाले याची पर्वा केली नाहीस
आणि मी हि तुझी
कंटाळा आणि वेदनांशी सामना करीत आपण चाललो आहोत वेड्यावाकड्या मार्गावर
कधीतरी पावसाकढे बघत
कोणत्या नालायकाला दोष दयावा याचा विचार करीत
आणि बघत ती पंख पसरून उडणारी डुकरे

-उडता डुक्कर

(रूपांतरित / आधारित / प्रचोरीत)

मायबोलीवरच्या काही बदलांच्या चाचणीसाठी मदत हवी आहे.

Submitted by webmaster on 17 July, 2017 - 01:08

मायबोलीवर येत्या काही दिवसात येऊ घातलेल्या काही बदलांची चाचणी करायला मदत हवी आहे.
मायबोलीतले बदल तपासून काही अडचणी येतात का ते सांगायचे , कुठले आवडले, कुठले नाही याचा अभिप्राय द्यायचा असे याचे स्वरूप असणार आहे. या चाचण्या जगात कुठूनही करता येतात. यासाठी दिवसातून ५-१० मिनिटे ( तुम्हाला जसे जमेल तसे, दररोज नाही) वेळ अपेक्षीत आहेत. फक्त वेगवेगळ्या सुविधांसाठी जी काही डेडलाईन असेल त्या अगोदर तो अभिप्राय हवा असतो.
वेगवेगळ्या ब्राउझर वर चाचण्या अपेक्षित असल्याने विविधता असणे गरजेचे आहे त्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांनाच यात सामील होता येईल असे नाही.

हजारो रुपयाच्या नुकसानीचे काही वाटत नाही पण सातशे रुपये हातून गेल्याची रुखरुख आहे

Submitted by एक मित्र on 6 July, 2017 - 02:52

हि माझ्या बाबतीत जरा विचित्रच अशी मानसिक समस्या उद्भवली आहे. तुमच्यापैकी कुणाला असे काही अनुभवला आले असल्यास कृपया सल्ला द्यावा हि विनंती. मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.

पाऊस

Submitted by shuma on 21 May, 2017 - 12:53

आजचा पाऊस
फारा वर्षांनी
पुन्हा तुझा माझा
कोसळत राहिला
बाहेरही अन आतही
काचांवर अन खाचांतून
डोळ्यांच्या अविरत ...
सारे थेंब ओथंबलेले
सावरलेले आजवर
निसटले न जुमानता
माझ्याच नजरकैदेतून
ऐकूआली टपटप
तुलाही दूरवर
माझ्याही नकळत
ओघळलेल्या सरींची
सावरले परत क्षण सारे
आवरत पसारा थेंबांचा
त्यातील काही थेंबांवर मात्र
हक्क तुझाही होता

शमा

मन माझे सैराट...

Submitted by दिपक ०५ on 21 May, 2017 - 08:41

7 एप्रिल मंगळवार..  गॅलक्सी सॉफ्टवेअर प्रा. लि. चे  सि इ ओ मि. दिक्षित  आपल्या स्टाफ सोबत मिटिंग मध्ये व्यस्थ.. 

सर्व इंम्प्लॉई गंभिरपणे त्यांचे बोलणे ऐकत होते. हॉल मध्ये खूप गंभिर वातावरण झाले होते. पण त्या हॉल मधिल एकच  खूर्ची रिकामी होती. सि. अकॉटेंट मि. सागर यांची.

इतक्यात त्या तणावलेल्या वातावणात हॉलचा दरवाजा  धाडकण उघडला आणि सागर चा आवाज ऐकू आला. मे आय कम इन सर?.. - सागर.

येस यू कॅन.. -दिक्षीत. 

सागर गडबडीने आत येऊन त्या रिकाम्या खूर्ची वर बसला. सगळा स्टाफ त्याच्याकडे एखाद्या वेड्याप्रमाणे पहात होता.

सिंहगड-राजगड-तोरणा (SRT)

Submitted by डोंगरयात्री on 24 April, 2017 - 03:08

फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते. ३-४ महिन्यांच्या (प्रदीर्घ ) कालावधीनंतर एका कसलेल्या गिर्यारोहकासमवेत सिंहगड-राजगड-तोरणा पदयात्रेला जायची संधी चालून आल्यावर मी लागलीच होकार कळवला. एकूण ६ लोक असणार होते. सिंहगड ते राजगड ते तोरणा एका दिवसात करून पुण्यात रात्री परतायचा बेत होता! त्याप्रमाणे पहाटे ३:३० ला निघालोही.चमूशी जुजबी ओळख करून घेतली." तू सिंहगड ला नियमित आहेस ना? " असा प्रश्न मला २-३ लोकांनी विचारला. मी त्यावर "नाही" असे उत्तर दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची काळजी दिसे. सिंहगड पायथ्याला गाडी ठेऊन, पहाटे ५ ला आम्ही चढाई सुरु केली आणि एका तासात देवटाक्यापर्यंत पोहोचलो.

जल............ नीर, तोय, उदक...........जीवन

Submitted by सेन्साय on 21 April, 2017 - 01:11

पाणी हेच जीवन .... ही गोष्ट आपण शाळेत शिकलेली व पुढे आयुष्यात पदोपदी अनुभवलेली आहे. निसर्गाने प्रत्येक सजीवास जीवन जगण्यासाठी उचित प्रमाणात अन्न पाणी नेहमीच उपलब्ध ठेवलेले आहे. नैसर्गिक अन्न साखळीतील मानवी हस्तक्षेपाने आज आपल्याला पाणी टंचाई जाणवते.

घोर हा घनघोर आहे!

Submitted by सत्यजित... on 20 April, 2017 - 23:08

चोर तर आहेच वर शिरजोर आहे
काळजाचा घोर हा घनघोर आहे!

जाळतो आहे जिवाला रोज थोडे
पावसाचा जोर या कमजोर आहे!

ऐन दुःखाचा पसारा मांडला मी
वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे!

तू नको जावूस माझ्या शांततेवर
वेदने,मी वादळाचा पोर आहे!

जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे!

वाचण्याआधीच हे लक्षात घे तू
मी कुणी नाही कवी,चितचोर आहे!

—सत्यजित

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप