हितगुज ग्रूप

वेळ वाया घालवण्याची सवय कितपत गंभीर आहे?

Submitted by ek_maaybolikar on 23 July, 2019 - 10:10

मी मायबोलीवर आहे बरीच वर्षे पण वाचनमात्र आहे. पण लिहिले नाही कधी. इथे काही चांगले सल्ले दिले जातात हे वाचून आहे. सध्या एका खूप कठीण मानसिक अवस्थेतून जात आहे. त्यासंबंधी share करण्यासाठी हा आयडी/धागा काढला आहे व अनुभवींच्या मार्गदर्शनाची खूप गरज आहे.

पूर्वी आणि आता...

Submitted by अतुल. on 8 July, 2019 - 10:28

गेल्या पंचवीस तीस वर्षात काळ झपाट्याने बदलला. माझ्या पिढीने एक संक्रमण पाहिले. माहितीतंत्रज्ञानाने देशात घडवलेली क्रांती पाहिली. वैचारिक, सामाजिक, आर्थिक व इतर अनेक स्तरांवर बदल घडून आले. राहणीमान विचारसरणी दृष्टीकोन. खूप सारे बदलले. आजच्या काळात आपण सहज मागे पाहिले तर हा बदल ठळकपणे दिसून येतो. त्यांचेच हे छोटे संकलन...
.
(अर्थात सर्वांनाच हे सगळे बदल जाणवतीलच असे नाही. पण ही मला व माझ्यासारख्या अनेकांना जाणवलेली काही निरीक्षणे)
.
पूर्वी: येत्या रविवारी ना, आपल्याकडे मुंबईचा मामा येणार आहे. मुंबईची मिठाई घेऊन.

शब्दखुणा: 

बातम्या डॉट कॉम बंद का आहे?

Submitted by अतुल. on 19 June, 2019 - 00:01

मागचे काही वर्षे batmya.com हि वेबसाईट मी बुकमार्क करून ठेवली आहे. विविध मराठी वृत्तपत्रांत आणि माध्यमांत आलेल्या ठळक बातम्या एकत्र पाहायला मिळतात. पण मागचे अनेक दिवस साईट बंद आहे. मायबोली वेबसाईट च्या तळाशी या वेबसाईटची लिंक दिली आहे. तसेच मायबोलीशी संबंधित साईट आहे असेही वाचले होते म्हणून विचारणा/चर्चा करण्याकरता इथे हा धागा.

कार्यालयात बॉस वयाने लहान असल्यास ती सिच्युएशन कशी हाताळावी?

Submitted by Parichit on 13 June, 2019 - 00:39

नमस्कार मायबोलीकरहो,

गाणी आणि आठवणी

Submitted by अतुल. on 18 May, 2019 - 06:31

खूप लहानपणीची एक घटना आठवते. ती एक अतिशय उदासवाणी सकाळ होती. पावसाळा नव्हता. तरीही वातावरण कुंद. ढगाळलेले. जाग आली तीच बाहेर सुरु असलेल्या कसल्याश्या गोंधळ आणि गलक्यामुळेच. उठून पाहिले. घरातल्या व शेजारपाजारच्या मोठ्या माणसांच्या चेहऱ्यांवर धक्का बसल्याचे काळजीचे भाव होते. सगळेजण गंभीरपणे कसलीशी कुजबुज आणि चर्चा करत होते. त्याचवेळी रेडीओवर लता मंगेशकरांचे ते 'गाईड' मधले गाणे लागले होते "काँटों से खिंच के ये आँचल, तोड़ के बंधन बांधी पायल. कोई ना रोको दिल की उड़ान को, दिल वो चला, आज फिर जीने की तमन्ना है. आज फिर मरने का इरादा है". तसाच बाहेर आलो.

शब्दखुणा: 

मनात खोलवर अचानकपणे घुसलेली "ती" बाहेर कशी काढावी?

Submitted by Parichit on 5 May, 2019 - 07:10

नमस्कार! आज खूप दिवसांनी मायबोलीवर आलो आहे. सुट्टी आहे म्हणून नाही. निवांत आहे म्हणून पण नाही. जरा वेगळेच कारण आहे. म्हणून आलो. बघतो तर इथे काही धाग्यांवर घमासान हाणामारी दिसली. काही धाग्यांवर विनोदी लिखाण दिसले. काही धाग्यांवर राजकीय फड रंगला आहे. काही धाग्यांवर छान छान कविता आहेत. पण आज कशातच माझे मन रमत नाहीये. त्याला कारणच तसे घडले. म्हटले तर हास्यास्पद म्हटले तर खूप गंभीर. ते इथे व्यक्त व्हावे वाटले म्हणून आलो आहे. बर आता जास्त फुटेज न खाता सरळ विषयावर येतो.

शब्दखुणा: 

चूक कोणाची???भाग१

Submitted by pritikulk0111 on 26 April, 2019 - 10:51

एक दीर्घ कथा मनात आकार घेत आहे .. तीच इथे प्रकाशित करत आहे ...कशी वाटली ते नक्की सांगावे..

आठवणीतील चिमणी

Submitted by 'सिद्धि' on 13 April, 2019 - 08:58

आज रविवार. सकाळ पासूनच धमाल नुसती. आम्ही मुलं परसात खेळत होतो. लपाछपी चा खेळ म्हणुन मी एका आंब्याच्या झाडामागे लपलेले. एवढ्यात बाजूलाच असलेल्या सुक्या पानांच्या ढिगामध्ये काही तरी पडल्याचा आवाज झाला. पण बाहेर पडले तर पकडले जाईन म्हणून मी तिथुनच निरिक्षण करायला लागले.काहीच दिसेना.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप