एक दीर्घ कथा मनात आकार घेत आहे .. तीच इथे प्रकाशित करत आहे ...कशी वाटली ते नक्की सांगावे..
नुकतीच दहावी संपून अकरावी सुरू झाली होते...नवीन कॉलेज नवीन मित्र मैत्रिणी बनत होते. तिच्या सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी commerce ला एडमिशन घेतले होते आणि ती ने सायन्स ला एडमिशन घेतले. सगळा ग्रुप तुटला होता. तिच्या डोळ्यात डॉक्टर बनायचे स्वप्नं होते. आपल्याला खूप शिकायचे आहे मोठे व्हायचे आहे हे सगळेच तिच्या मनावर लहानपणा पासून बिंबवत होते. ती दिसायला खूप काही सुंदर नव्हती. फार उंच नसली तरी मध्यम उंची, गव्हाळ वर्ण आणि सुंदर जीवनी होती. बघता क्षणीच तिचे सुंदर डोळे वेध घेत असे आणि समोरचा त्या नेत्रात हरवून जात असे. पण ती मात्र ह्या सगळ्या पासून अजाण होती. अशी ती निशा. सगळ्यांची निशू. थोडीशी अबोल ,आपल्यात रमणारी आणि मनमिळावू अशी निशुं. आपल्या आई वडिलांची लाडकी आणि खास करून वडिलांची त्याला कारण ही तसे होते..एक तर त्याच्या घराण्यात मुलगी नव्हती आणि निशा चा जन्मानंतर तिच्या वडिलांची खूप भरभराट झाली होती . पण तरी निशा ला तसे कडक शिस्तीत आणि धाकात ठेवले होते.
त्या दिवशी निशा ला कॉलेज ला पहिला दिवस होते. छान नटून ती कॉलेज ला जायला निघाली होती. खरे तर तिला मुंबई ला कॉलेज ला जायचे होते पण आई तिला पाठवायला तयार नव्हती त्याला कारण ही तसे होते नाहीतरी डॉक्टरकी करायला बाहेर जावेच लागणार आहे ..मग आत्ता पासून कशाला ???
छान गुलाबी रंगाचा कुर्ता आणि जीन्स मध्ये निशा एक सुंदर कॉलेज कन्या दिसत होती. स्टेशन ला तिच्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या, सगळ्या चिवचिवाट करत कॉलेज ला निघाल्या. आपल्याच मस्तीत चालता चालता निशा चा धक्का एक मुलाला लागला आणि त्याची बॅग पडली....तिने लगेच वाकून बॅग उचलली आणि त्याला दिली पण तो मात्र तिच्याकडे बघतच राहिले . थोडइशी शाशक होत तिने त्याला बॅग दिली आणि निघून गेली.मैत्रिणी मात्र उगीच लफांगा वैगरे म्हणत पुढे गेल्या....निशा ला कळेना त्यात त्याची काय चूक होती पण लवकरच ती तो किस्सा विसरून गेलीं. नवीन कॉलेज मध्ये निशा अगदी एकटी पडली आधीच अबोल त्यात नवीन लोक काय बोलणार. पटकन जाऊन कोणाशी मैत्री करेल असा स्वभाव नाही. एक कोपरा तील बेंच पकडून बसली. हळुहळु मुले आली,पण त्यात तिला ओळखणारे कोणी नव्हते....सगळे मागचे बेंचभरले आणि निशा एकटी बसली. रिंग झाली पहिल्या लेक्चर ची आणि धावत धावत एक मुलगी निशा चा शेजारी येऊन बसली. ब्रेक मध्ये दोघींनी ओळख करून घेतली. ती हेमांगी होती. ह्याच वर्षी ते निशा चा गावात शिफ्ट झाले होते. तिला कोणी मित्रमैत्रिणी नव्हत्या ह्या शहरात. हेमांगी बोलघेवडे होती. लगेच दोस्ती केली, निशा ला आपल्या बरोबर कॅन्टीन मध्ये घेऊन गेली...
थोड्याच दिवसात निशा आणि हेमांगी ची छान मैत्री झाली. तरी निशा ला मात्र हेमंगीच्या काही गोष्टी खटकत असतं. पण उगीच कशाला बोला...म्हणून गप्प बसत असे. निशा चे आत्ता टाइमटेबल सेट झाले होते. सकाळ ते दुपार कॉलेज, नंतर घर आणि अभ्यास. कधीतरी जुन्या मैत्रिणी मध्ये रमणे. अजुन आयुष्यात काय हवे असते.???