आकाशातला प्रकाशाचा उत्सव!
✪ अखेर धुमकेतूने दर्शन दिलं!
✪ अंधार्या आकाशात तार्यांची उधळण
✪ गुरू ग्रहावर उपग्रहामुळे पडलेल्या सावलीचा थरार
✪ आकाशात तार्यांचा व जमिनीवर दवाचा पाऊस
✪ मोरगिरी किल्ला व घुसळखांब परिसरात भ्रमंती
✪ हजारो वर्षांपूर्वीच्या जगात नेणार्या बेडसा लेण्या!
✪ Anjanvel- the week-end spent well!
जिम कॉर्बेट या व्यक्तीविषयी माझ्या मनात आत्यंतिक आदर आहे. काही वर्षांपूर्वी त्याचं मॅन-ईटर्स ऑफ कुमाऊं हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं आणि कॉर्बेटचं अफाट धैर्य, जंगल ’वाचण्याची’ त्याची असामान्य क्षमता, सर्वसामान्य माणसाबद्दल त्याला वाटणारी मनापासूनची कणव, लिखाणात मधूनच डोकावणारा खास ब्रिटिश मिश्किलपणा आणि या सगळ्याबरोबरच, आतून येणारा खराखुरा विनम्रपणा असे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू मला खूप प्रभावित करून गेले. मग त्याची ’माय इंडिया’, ’ट्री टॉप्स’ अशी अजूनही काही पुस्तकं वाचली आणि त्याच्याबद्दलचा आदर वृद्धिंगत होत गेला.
तेजोमय आकाशदीप हा
प्राचीवर लाविला कुणी
किरणांची आरासही पहा
रंगावली जणु नभांगणी
भल्या पहाटे गात भूपाळी
विहग विहरती वनोवनी
वृक्ष लेवुनी तिलक कपाळी
कृतार्थ होती मनोमनी
दाही दिशांना गुलाल उधळुनी
लीन मेघ शरदाच्या स्तवनी
पाही कौतुके दीप उजळुनी
सरिता ती जलदांची जननी
इच्छा धरिते एक इथेची
दिपावली ही सृष्टीची
कथा सरावी दुष्काळाची
व्यथा नको अतिवृष्टीची
शाश्वत करण्या मार्ग आपुला
साथ हवी ऋतुमानाची
तिमिर भेदण्या अज्ञानाचे
ज्योत हवी विज्ञानाची
कर्नाटकातल्या चिकमगळूर जिल्ह्यात कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान आहे. या परिसरात सहा-सात ट्रेक्स आहेत. त्यापैकी कुद्रेमुख शिखराचा ट्रेक सगळ्यात मोठा आहे. हे मलयनगिरीनंतर कर्नाटकातलं दुसर्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे. आम्ही यावेळी कुद्रेमुखची चढाई न करता तिथल्याच दुसर्या ’कुरिंजल’ नावाच्या शिखराचा ट्रेक करायचं ठरवलं होतं. या ट्रेकचं हे थोडक्यात वर्णन!
कवितेच्या ओळी चार
अलंकार ना उपमा
रुपक ना विलक्षण
उपदेश नाही कुणा
जीवनाचे तत्त्वज्ञान
दुर्बोध ना अतर्क्यसे
कृष्ण विवर भेदून
गूढ अगम्य ना तेथ
डोळे जाती विस्फारून
स्वैर निसर्गात दिसे
मन मोहकशी खूण
चित्त तरंग थांबले
एकरुप तेचि क्षण
मनी ओघळत आल्या
कवितेच्या ओळी चार
लख्ख लख्खसे होऊन
क्षणी निवाले अंतर
आज १४ ऑक्टोबर २०२४ रात्री चंद्र- शनि पिधान!
C/2023 A3 (Tsuchinshan-ATLAS) धुमकेतूचे संध्याकाळच्या आकाशात आगमन
✪ सह्याद्री पर्वतरांग व कोकणाचा संगम असलेली शिवथरघळ!
✪ "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे!"
✪ सोलो सायकलिंग नव्हे निसर्गाच्या सान्निध्यातली तीर्थयात्रा!
✪ शेकडो धबधबे, असंख्य डोंगर आणि अजस्र वरांधा घाट
✪ अजस्र धबधबा- जीवंत प्रवाहाचं रमणीय प्रतिक
✪ आयुष्यभराचा अनुभव देणारी १२४ किमीची थरारक सायकल राईड
✪ अनेक किल्ल्यांच्या परिसरातलं निसर्गाचं विराट रूप दर्शन
✪ परतीच्या थरारक प्रवासाची उत्सुकता
कसे कोण जाणे, कसे नजरेतून सुटले,
या झाडांनाही येतात एवढी सुंदर फुले?
वर्षभर नुसतीच हिरवी, टोकदार पाने लेऊन,
कशी उभी असतात की मुक्याने?
आज अचानक, पावसाच्या एका शिडकाव्यानंतर,
कुठून फुलले आहेत हे रंगित तुरें, फांदीफांदीवर?
कसे कळले तुम्हाला की आजचा दिवस आहे फुलायचा!
एकेकट्याने नाही, सगळ्यांनी मिळून सजायचा?
कोण गुणगुणते हे गुज तुमच्या कानात?
हीच ती वेळ हे कसे उमटते अंतरंगात?
आमच्या डोळ्यांना दिसते जे आत्ता आहे ते,
विसरून, हरवलेल्या संवेदनांचे रिकामे गाभारे.
दैवी आणि तेवढच दुर्मिळ फूल म्हणून ब्रम्हकमळाची ख्याती आहे.
निबिडात दडलेल्या
निळ्याभोर पाखराची
लवलवती लकेर
जेव्हा कानावर येते....
निळ्यासावळ्या निर्झरा
फेसाळत, कवळून
पाणभोवर्याची माया
जेव्हा पैंजण बांधते...
मावळतीच्या बिलोरी
आभाळाला तोलूनिया
एक इवले पाखरू
जेव्हा पंखावर घेते...
काजळल्या नभावर
निळी रेष रेखाटत
दिशा, कोन झुगारून
जेव्हा उल्का कोसळते....
.....काळजात रुजलेल्या
कुण्या कवितेची ओळ
ध्यानीमनी नसताना
तेव्हा ओठावर येते