काही गोष्टी लिहिल्या जात नाहीत. काही रहस्ये आपण आपल्यासोबत घेऊनच ईहलोकाचा रस्ता धरतो. बरेचदा झाकली मूठच सव्वा लाखाची असते. पण कधी कधी आपल्या लोकांचा पराकोटीचा आग्रह मोडवत नाही, आणि ती गुपिते उलगडायला भाग पाडतो.
अशीच एक कथा, जी दंतकथा म्हणून आजही दक्षिण मुंबईत प्रसिद्ध आहे. आज मी जो सांगणार आहे, हा तोच मायबोलीप्रसिद्ध किस्सा आहे. जो तुम्ही ईथे तिथे फुटकळ प्रतिसादात ऐकला असेल. किस्सा ए माझगाव-डोंगर जाळण्याचा!.. वाचा आणि विसरा. किंवा कवटाळून बसा. पण या मायबोलीच्या चार भिंतीबाहेर जाऊ देऊ नका.
------------------------------------------------
ट्रेक
“आबा ए आबा उठ बाबा फाट झाली. आत्ता तांबडं फुटल एवढ्यात. लवकर जायाला हवं सरपाण आण्हाया तरच उन्हाच्या आत परत येऊ डोंगरातनं.”
आबाचे कान दर रविवारी पहाटे ही हाक कधी येते या प्रतिक्षेत असायचे. तो आधीच अर्धवट जागा असायचा. त्याला डोंगराचा लळा लागला होता.
रविवार म्हणजे शाळेला सुट्टी. आज तरी थोडं आरामात उठावं असंही त्याला कधीच वाटायचं नाही. शाळा असेल त्या दिवशी उशिरा ६ वाजता तो उठायचा.
आज सकाळी सहा वाजता भारत-न्यूझीलंडचा सामना बघायला उठलो पण घरच्यांच्या ओरडा कम सूचनेनंतर प्लॅन चेंज करत कधी नव्हे ते मॉर्निंग वॉल्कला बाहेर पडलो. मस्त ट्रॅक पॅंट घातली, वर नवे कोरे पांढरे स्पोर्ट्स टीशर्ट. पायातले स्पोर्ट्सशूज मात्र जुनेच. एक फारसे वापरात नसलेले पण बर्यापैकी छान स्पोर्ट्सवॉच सुद्धा धुंडाळले. सकाळी साडेसहाला उन्हाचा पत्ता नसल्याने गॉगलचा मोह तेवढा आवरला. गाणी ऐकायला म्हणून हॅण्सफ्री कानात टाकले. एकंदरीत सज धज के घरापासून साडेसात मिनिटांच्या अंतरावर असलेल्या माझगावच्या डोंगराकडे कूच केले.
मूळ चित्रात आणखीही लँड्स्केप आहे. पण ते काही तांत्रिक कारणामुळे गंडलंय
म्हणून MS Paint मधे जो बरा वाटतोय तेवढाच भाग क्रॉप करून इथे डकवलाय. अॅडमिन, हे असं नियमात बसत नसेल तर ही पोस्ट उडवून टाका.
