निसर्ग

पाऊस

Submitted by Ravi Shenolikar on 18 September, 2019 - 11:17

नभातुनी झरती धारा
बेफाम वारा, घोंघावे

सागरी चाले थैमान
लाटा बेभान, उसळती

चपला चमकें आकाशीं
काळ्या ढगांची नक्षी, तिजसवे

अखंड पर्जन्यवृष्टी
हिरवी सृष्टी, चहुकडे

निसर्गाचे पाहतां तांडव
चाळवे शैशव, मनोमनीं

विषय: 
शब्दखुणा: 

ताम्हिणी घाट, पावसाळी माहोल

Submitted by पुरंदरे शशांक on 15 September, 2019 - 10:42

ताम्हिणी घाट, पावसाळी माहोल

तलम तलमसे जलद उतरती मधेच धरणीवर
हिरवे कुंतल माळून बसले मोत्यांची झालर

भर माध्यान्ही रवि किरणही येती ना भुईवर
मेघ अडविती वाट तयांची विरविरती चादर

झरे वाहती अगणित नाजूक खळखळती सुस्वर
विराट रुपे घेऊनी काही कोसळती भूवर

ओलावा हा भरुन राहिला इथवरुनी तिथवर
एक चिमुकला पंख वाळवी ऊडून वरचेवर

पागोळ्या ओंजळीत वेची पोर कुणी अवखळ
रानफुले डोलती घुमूनीया तरुतळी त्या निश्चळ

...........................................................

जलद..... ढग

कुंतल.... केस

विरविरती.....विरलेली

लिझीकीचे जग

Submitted by मामी on 13 September, 2019 - 12:22

लीझीकी (Li Ziqi) - चीनच्या शेझुआन प्रांतातील एका गावात शांत, निसर्गरम्य परिसराच्या सोबतीत राहणारी एक गोडशी मुलगी. तिच्यापेक्षाही गोड असलेल्या आजीबरोबर ती राहते. आजूबाजूला केवळ एक भरभरून देणारा, डोळे निववणारा निसर्ग आहे. या सकस मातीतून पिकवलेल्या ताज्या भाज्या, धान्य, फळं यापासून ती मुलगी काय काय पदार्थ आणि प्रकार बनवते. वेलकम टु लिझीकी चॅनल - हा एक युट्युबवरचा आनंदाचा खजिना आहे आणि ती आहे या चॅनलची अनभिषिक्त राणी. लीझीकीचा एक एपिसोड बघा की तुम्ही तिचे चाहतेच होऊन जाता.

विषय: 

*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?* (Beyond the 'Rainwater Harvesting') भाग - दोन.

Submitted by सुनिल प्रसादे on 19 August, 2019 - 11:04

*प्रभावी जलसंवर्धन कसे कराल ?*
(Beyond the 'Rainwater Harvesting')

भाग - दोन.
--------------
जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचं संवर्धन
-------------------------------------------------------------

भाग १ : जाना था जोशीमठ - औली पहुंच गए.......

Submitted by मंजूताई on 17 August, 2019 - 00:35

झालं असं की, या वर्षी लेक भारतात आल्यावर कुठेतरी जाऊ असं चाललं होतं, पण नक्की कुठे ते ठरत नव्हतं. जायला जमणार होतं तेवीस जून नंतरच. खूप धावपळ करायची नव्हती. चार दिवस एका ठिकाणी निवांत राहायचं होतं.

हमिंगबर्ड सोहळा

Submitted by स्वाती२ on 16 August, 2019 - 07:07

नुकताच माझा अमेरीकेतला नव्या नवलाईचा संसार सुरु झाला होता. काही कामानिमित्त बाहेर पडलो. रस्ता एका हाउंसिंग सबडिविजनमधून जात होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे छोट्या फुलबागा बहरल्या होत्या. मला सगळेच नविन त्यामुळे गाडीच्या खिडकीच्या काचेला अगदी नाक लावून बाहेर बघत होते. एका घराच्या पोर्चबाहेर काचेचे लाल झाकणाचे काहीतरी टांगलेले दिसले. पुढे गेल्यावर तसेच एका आवारातील झाडाच्या फांदीला देखील टांगलेले दिसले.
"ते झाडाला लाल झाकणाचे बाटली सारखे काय टांगलय?" मी कुतुहलाने विचारले.
"हमिंगबर्ड फिडर." रस्त्यावरची नजरही न हटवता नवर्‍याने उत्तर दिले. कुतुहल शमायच्या ऐवजी वाढले.

विषय: 

पाऊस असा पाऊस तसा

Submitted by Dr Raju Kasambe on 14 August, 2019 - 11:41

पाऊस असा पाऊस तसा

पाऊस कोसळधार
नुसताच धो धो कोसळणारा
चाकरमान्यांची तारांबळ उडवणारा !

पाऊस रिमझिम
ओलेचिंब भिजवणारा
सर्वांना रोमॅन्टिक बनवणारा !

पाऊस धमकावणारा
विजांच्या गडगडाटात
नुसतेच चार थेंब शिंपडणारा !

पाऊस रीप रीप
गरमागरम चहा भज्यांची
आठवण करून देणारा !

पाऊस ढगफुटीचा
नावानेच घाम फोडणारा
गावही गिळंकृत करणारा !

पाऊस मुसळधार
महापुराचे थैमान घालणारा
घर संसार उध्वस्त करणारा !

पाऊस न बरसणारा
दुष्काळ अवर्षण घडवणारा
अश्रूंच्या धारा बरसवणारा !

तुम्हा निष्पापांचं असंच असतं (चिमणी)

Submitted by Dr Raju Kasambe on 14 August, 2019 - 04:25

तुम्हा निष्पापांचं असंच असतं (चिमणी)

कसे तुम्ही मख्ख बाई
संसाराची कशी फिकीरच नाही

त्या दृष्ट काकाने पळविले छकुल्याला
तुम्हास कशी चिंता नाही

चिवचिव चिवचिव करशील किती
धावपळ ओरड करशील किती

बछडा तुझा गं मिळणार नाही
कारण काय तुला कळणार नाही

तुम्हा निष्पापांचं असंच असतं...
कसेही रहा, कुणी वाली नसतं

पहा ती चिऊताई धावून धावून
बसलीय शून्यात नजर लावून !

(१९९१)

वरूणराजा

Submitted by SATISH SHIVA KAMBLE on 12 August, 2019 - 23:01

पावसानं घातलं थैमानं
नद्यांना आलंया उधाणं
काय करावं कळंना कुणाला
जनता झाली हैराणं

आत्ताच काही दिवसापूर्वी
व्हता ह्यो भलताच रूसला
किती वाट पाहिली सार्‍यांनी
तरी ह्यो बाबा नव्हता बरसला

हैराण होती जनता सारी
चिंतेत होता शेतकरी
मग एकेदिवशी आगमन झाले
ऐटीत याचे धरतीवरी

हा आला अन् सुखावले सारे
आनंदित झाले मनातूनी
बरसत गेला भरली धरणे
तरीही पेटला जिद्दीनी

आता मात्र नको नको
म्हणण्याची वेळ आली आहे
वरूणराजाने आता थोडे
थांबण्याची वेळ आली आहे

विषय: 
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - निसर्ग