बोगनवेल: अधुरी एक कहाणी
एखाद्या गोष्टीचा अनुभव आयुष्यात पहिल्यांदा घेत असल्यास त्याचे खूपच नावीन्य असते. त्यातल्या त्यात, जर ती गोष्ट जगात आपल्या बाबतीत प्रथम घडत असल्यास त्या नाविन्याबरोबर ती एक औत्सुक्याचा आणि अभिमानाचा विषय देखील बनते. परंतु अशा घटनेची जर कोणी काहीच दखल देखील घेतली नसेल तर? अशीच एक रोचक गोष्ट आहे जीन बॅरेट यांची.
कल्पना चावला स्पेस एकेडमीच्या विद्यार्थ्यांसोबत आकाशातल्या खजिन्याची लूट
✪ तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी रात्रभराचं आकाश दर्शन शिबिर
✪ मुलांचा आनंदमेळा आणि ता-यांचा झगमगाट
✪ “रात है या सितारों की बारात है!”
✪ मृग नक्षत्र? नव्हे, हा तर मोssssठा तारकागुच्छ!
✪ प्रकाश प्रदूषण नसलेलं अप्रतिम आकाश आणि तारकागुच्छांची उधळण
✪ कडक थंडीतही मुलांचा उत्साह, मस्ती आणि धमाल
✪ तुंग परिसरात ट्रेक आणि मुलांसाठी नवीन एक्स्पोजर
✪ नितांत रमणीय निसर्गात राहण्याचा अनुभव
हिमवस्त्राची तलम पैठणी
लेवुनि अवनी मृदुल हसे
शीतल निर्मल शुभ्र धरा ही
शिशिराज्ञी जणु मज भासे
हिमगौरीच्या आगमनास्तव
वनचर उल्हासित झाले
चिंब नाहले तनामनासव
आशीर्वादच रिमझिमले
रोपटी अल्लड, क्षण-क्षण गाती
वायूसंगे रुणूझूणू
वृक्ष थोर ते, कण-कण जपती
सुखदुःखाचे अणुरेणू
अगा मानवा पाहि जरासे
वास्तवात उघडुनि चक्षू
तापमान जर वाढत गेले
भविष्यात होशिल भिक्षू
टेक्सस अॅश
या इथे मी कधीच एकटी नसते. माझ्यासाठी हा जगातला सगळ्यात सुंदर कोपरा आहे. इथे खुप जण येतात. खासकरुन hummingbirds. त्यांना माझी बहुतेक अडचण होत नाही. मी आले तरी ते उडून जात नाहीत. ते मला घाबरत नाहीत किंवा मला माणूस म्हणुन वेगळं काढत नाहीत. मी अशा सुंदर ठिकाणी बसुन फक्त माणसालाच सुचतील अशा गोष्टी करत असते. चहा पिणे, भेळ खाणे किंवा या पक्षांचे फोटो काढण्याचा प्रयत्न करणे. हे सगळे मी त्यातल्यात्यात कमी आवाज करता करते म्हणुन बहुतेक ते मला चालवून घेतात त्यांच्यात.
काळ बदलला तसे पर्यटनाचे स्वरूपही बदलले.
बंगळूर महाराष्ट्र मंडळ हे नवीन नवीन कार्यक्रम आखून पार पाडण्याच्या बाबतीत अत्यंत उत्साही आहे. त्यांचा शिवगंगे ट्रेकबद्दल मेसेज आला तेव्हा लगेचच जाण्याचं पक्कं केलं. याआधी हुळुकुडी बेट्टा नावाच्या ट्रेकला मंडळाच्या सदस्यांबरोबर जाऊन आलो होतो. तेव्हा खूपच मजा आली होती. तो ट्रेक तसा सोपा होता. शिवगंगे त्यापेक्षा थोडासा अवघड असल्याचं गूगल केल्यावर लक्षात आलं. उंचीला सिंहगडाच्या निम्मा आहे. बंगळूर हे पश्चिम आणि पूर्व घाटापासून लांब असल्यामुळे इथे आजूबाजूला आपल्या सह्याद्रीसारखे उंच उंच डोंगर नाहीत. पण अशा टेकड्या मात्र अनेक आहेत.
दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३
आता दिवाळी अगदी जवळ आली. पुण्यातले रस्ते आकाशकंदील, रांगोळ्या-रंगाची दुकानं आणि खरेदीसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी अगदी फुलून गेले आहेत. अशी उत्सवी गर्दी छान वाटते. पण त्यामुळे जिथेतिथे अडकायला होतंय. चौकाचौकात थांबत शेतापर्यंत जायचं म्हणजे संयमाची कसोटी. पुण्यात राहून शेतावर ये-जा करायची, तर ह्या प्रश्नातून सुटका नाही. पण थोडं लवकर निघालं तर ट्रॅफिकचा रेटा थोडा कमी असतो. म्हणून प्रवासाला जाण्याआधी प्लॅनिंग करावं, तसं प्लॅनिंग करून भल्या सकाळी डबा, पाण्याची बाटली वगैरे घेऊन निघालो.
भाग पहिला
कूर्ग १/२
https://www.maayboli.com/node/84306
रविवारी सकाळी बाहेर सुंदर धुकं होतं. छान थंडी पडली होती. आदल्या दिवशी सकाळी बरेच पक्षी दिसले होते, पण आज मात्र धुक्यात तेही बाहेर पडलेले दिसत नव्हते.
झोपतो आता! उद्या जरा लवकर उठाव लागेल... ति नाहि मला उठवणार लवकर....काय रे असा एकटाच बोलतोय स्वतःशी..!नाहि ग आई.. स्वतःच्या मनाला धीर देउन बघुयात जमत का ?
म्हणून स्वतःशीच बोललो झोपतो आता! उद्या जरा लवकर उठव हे मात्र तुला उपदेशात्मक हा..
हो रे बाळा झोप...
बस्स हे विचारायला आली कि , ति येनार आहे ना तुझ्या सोबत.. कि नाही?(अगदीच शांतता पसरली ) आई तुझ्या मनाची किव करावी कि तुझ्या बद्दल मि आदर करावा तेच समजत नाहि.. किती वेळेस एकच प्रश्न विचारते.. आणि माझ नेहमीच उत्तर मला काहि फरक पडत नाहि.. ति आलि तरि तिच स्वागत नाहि आली तरी...
आता झोपु का ??
हो झोप..