पाऊस पडतोय (It's Raining)

Submitted by ब्लू कोलंबसे on 3 July, 2025 - 03:00

पाऊस पडतोय,

समुद्राच्याच वागणुकीने बनलेले ढग , त्याच्याच इशाऱ्यावर नाचणाऱ्या वाऱ्यांनी

भारतभूच्या उत्तुंग कड्यांवर नेऊन आदळले,

आणि सुरु झाला नवा खेळ, - मॉन्सून !

पाऊस पडतोय,

पश्चिमेचे भन्नाट वारे, अरबी,बंगालच्या जलधीकडून दोहो बाजूंनी तुफान वर्षाव

काळ्याकभिन्न सह्याद्रीवर करतायत,

साऱ्या भारतभरातल्या नद्या, कडेकपारीच्या अंगाखांद्यावरून उड्या मारत,

कधी झरा तर कधी जलप्रपात होऊन

आजूबाजूच्या माणसाला,त्याच्या व्यस्त जीवनाला,

आपल्या कवेत घेत

अनेक आयुष्ये,शहरे ठप्प करत

उकळत्या चहाचा गर्द,तपकिरी रंग लेऊन समुद्राकडे धावतायत,

पाऊस पडतोय,

साऱ्या मानवजातीची तहान भागवणारे, शेते फुलवणारे

धन्य पिकवणारे, समृद्धी आणणारे

गोडे पाणी

घेऊन त्या वेगाने त्याच समुद्राकडे पुन्हा धावतायत,

पाऊस पडतोय,

पाऊस पडतोय...................................................!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असू शकते, सामो! आपण कविता या प्रकाराकडे अनंत प्रकारांनी पाहू शकतो. तुमच्या मनातले रूपक तुम्ही नक्की इथे लिहा. मलाही नवीन दृष्टीकोनातून मग ते पाहता येईल.

मी ते जसे दिसते तसे लिहिले. २०१७ च्या पावसाळ्यात.

>>>>त्याच्याच इशाऱ्यावर नाचणाऱ्या वाऱ्यांनी
मुळे मला राजकारण वाटले Happy पण सरळसोट असेल तर छानच.