littlemoments

दिवाळी त्यांचीही...!

Submitted by छन्दिफन्दि on 14 October, 2025 - 20:30

दिवाळी त्यांचीही.,.

दिवाळी अगदी तोंडावर येऊन ठेपली, सगळीकडे एकच उत्साह संचारलेला- दिवे, पणत्या, रोषणाईचे सामान, भरजरी, रंगीबिरंगी कपडे, नानाविविध मिठाया ह्यांनी सजेलेली दुकाने आणि त्यात करंजीत सारण दाबून भरावे तशी खचाखच भरलेली माणसे!

त्या उत्साही वातावरणातही दिवसेंदिवर हिची बेचैनी, हृदयातील धडधड वाढत चाललेली.
आज तर कळस झाला होता, पोटातला गोळा इतका मोठा झालेला, डोकं तर फुटतंय की काय असंच वाटायला लागलेलं.
कारणही तसचं होतं,
आज पगाराचा आणि (अर्थात) बोनसचा दिवस..
मात्र तिच्या नाही तर तिच्या घरातल्या सर्व मदतनिसांच्या…!

***

विषय: 

संस्मरणीय भटकंती - दक्षिण मुंबई (गेट वे - मरीन ड्राईव्ह) - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 6 September, 2025 - 01:00

गेल्यावर्षी म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये, जवळजवळ दोन दशकांहून जास्त वर्षांनी, मी आणि माझ्या मैत्रिणींने दक्षिण मुंबईतील फोर्ट, नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह भागाची मस्त सैर केली, आमच्या जुन्या आठवणी जागवण्याचा केलेला तो एक छोटा प्रयत्न होता.
भुरभुरत्या पावसातील दक्षिण मुंबईची ही काही क्षणचित्रे आणि आठवणी.

***

शशक १ - आसू आणि हसू - छंदीफंदी!

Submitted by छन्दिफन्दि on 5 September, 2025 - 02:25

स्थळ : बँक, अमेरिका

काउंटरवरच्या बाईने हसून हिंदीत त्याच गाव विचारलं, स्वतःच सागितलं.
साहजिकच त्यालाही जरा आपलेपणा वाटला.
म्हणूनच चेक देताना तो अवघडत बोलून गेला, “आकडा तसा छोटा आहे पण बऱ्याच अवधीने पगाराचा चेक मिळालाय.”
मंदसं हसली आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिलं.
“आकडा असू दे, पण पगाराचा चेक मिळालाय,नोकरी आहे ते जास्त महत्वाचं. गुडलक!”
तिच्या धीराच्या शब्दांनी सुखावलेला तो ही “गुडलक” म्हणत वळला.

विषय: 

शशक १ - शंका - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 3 September, 2025 - 22:58

ढोलताशाच्या कार्यक्रमावरून मंडळी घरी परतताना:
त्या नादातच ती पुटपुटली, “मलाही जावसं वाटतं, पण नाही जमणार..”
लेकाच्या तीक्ष्ण कानांनी ते ऐकलेच,”पुढच्या वर्षी तू पण ये. जमेल तुला. तुझ्यापेक्षा म्हातारी लोकही येतात..”
विचारशृंखला तुटली आणि विस्मयाचकित नजरेने तिने त्याच्याकडे बघितले,
“म्हातारी..?? माझ्यापेक्षा??”
चाणाक्षपणे नवरा पुटपुटला,” अरे, असं नाही बोलू.”
“अगं म्हणजे people older than you.. तुमच्यापेक्षा वयाने मोठे लोकंही येतात..” तत्काळ दुसऱ्याने बाबाची टिप ऐकून सुधारणा केली.

विषय: 
शब्दखुणा: 

शशक १,२ - मायलेक भाग २ - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 1 September, 2025 - 21:50

मायलेक भाग १
पुढे ...

मायलेक भाग २

आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले..

“थांब गणू… मला वाटलं नव्हतं, तू कधी असा वागशील.
अरे राजा, हे तुंदील तनु, गोजिरवाणे गोड रूपडे हीच तर तुझी खरी ओळख आहे. दहा दिवसांसाठी जातोस आणि नको ती खुळं घेऊन येतोस.. ”

“माते, चिंता नसावी! ते तर उगाच #trending म्हणून सांगायला. मला माझ्या दिसण्याची काळजी नाही पण खरा मुद्दा फक्त तुला म्हणून सांगतो. काम कर इकडे.”

विषय: 

शशक १ - कोरे कागद- छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 31 August, 2025 - 15:10

जरी सगळीकडे दिवाळीची धांदल सुरू होती तरी ती शांतपणे त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात बसून नोट्स वाचत होती.
दोन वर्षांपासून घरच्यांना आणि तिलाही ह्याची आता सवय झाली होती दिवाळीची सुट्टी आणि PL एकदम असण्याची.

विषय: 

शशक २,३ - होम मिनिस्टर! - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 30 August, 2025 - 21:05

बांदेकर भाऊजींनी जिंकलेल्या वहिनींना पैठणी दिली आणि होम मिनिस्टर चा एकच गजर सुरू झाला!

दूरदर्शनवरील ते दृश्य बघून तिने त्याला सहजच विचारलं, ”ए, मी पण बघू का रे होम मिनिस्टर मध्ये प्रवेशिका टाकून?”

तो हसून तत्परतेने म्हणाला, “हो, कर ना! फक्त आपल्या शोभाबाई आणि कुलकर्णी मावशींच्या सवडीने बघ.”

एक भुवई उंचावली आणि तिने विस्मयचकित नजरेने त्याच्याकडे पाहीले, “का??”

“बघितलसं ना, त्या एका फेरीमध्ये घरातल्या, स्वयंपाकघरातल्या ते सांगतील त्या वस्तू पटापट आणून द्याव्या लागतात. आता पैठणी जिंकायची तर त्यांना पण इथै असायला लागेल ना…”

विषय: 
शब्दखुणा: 

शशक -३- शतकांवर शतके - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 29 August, 2025 - 01:23

“यावेळचा गणेशोत्सवाचा धागा बघितलास का..?”

“बघितला ना! काय केलंय..? त्या पाककृती स्पर्धेच्या धाग्यावर शंभर अटी घातल्यात आणि वर अध्याहृत असलेल्या वेगळ्या..”

“ हो ना ते पूर्ण वाचून होईपर्यंत, वरण भात शिजून, सजावट करून insta ला #HomeFoodrRestaurantStyle वाला फोटो टाकला तर शंभर लाईक्स पण येतील. ”

“हा हा हा आणि शशक ? त्यात शंभर तर फक्त नियमव आहेत.. आहेस कुठे? “

“तर काय? हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही?”

“हम्म.. पुढच्या वर्षीपासून शशक स्पर्धेचाचा मसुदा शंभर शब्दात लिहायची अट संयोजकांनाच लागू केली तर..? काय वाटतं तुला ? ”

विषय: 
शब्दखुणा: 

शशक- १- देवमाणूस - देवासारखा धावून आलेला माणूस! - छंदीफंदी

Submitted by छन्दिफन्दि on 28 August, 2025 - 01:19

सकाळी साडेसातची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट. पाठीला बॅग लटकावून, हातात कंटेनर घेऊन ती घाईघाईने बस पकडायला निघालेली. EDचं सबमिशन होतं. रात्री अडीचपर्यंत जागून सगळी ड्रॉईंग्स पूर्ण केलेली - ती सगळी त्या कंटेनरमध्ये सुरक्षित होती.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - littlemoments