निसर्ग

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना

Submitted by मार्गी on 30 November, 2021 - 01:52

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना

शब्दखुणा: 

हिरवी स्वप्ने/Green Dreams

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 November, 2021 - 06:05

मायबोली आणि मायबोलीकरांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने व आशिर्वादाने मी हिरवी स्वप्ने/Green dreams नावाने यू ट्युब चॅनेल चालू केले आहे. यामध्ये निसर्गातील फुला-पानांच्या, पक्षांच्या गमती जमती, मला टिपता येईल ती माहिती, बागकाम या विषयांचा समावेश असेल. खाली तीन भाग देत आहे. तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.

इथे तुम्ही बुलबुलचे बाळंतपणचे दोन लेख माझे वाचलेले आहात. या वर्षीच्या जन्मोत्सवाची थोडक्यात कथा खालील भागात आहे.
https://youtu.be/aA6k1AgPocY

विषय: 

अवकाळी आला पाऊस

Submitted by पाषाणभेद on 24 October, 2021 - 09:26

अवकाळी आला पाऊस त्यानं सारं रानं धुतलं
हाती आलेलं पीक गेलं ते डोळ्यासमूर घडलं

काय सांगावी दैना चहूबाजूनी तो आला
ढगफुटी झाली जणू एकाजागी बरसला

किती निगूतीनं केलं व्हतं शेत आवंदा
बैलं नव्हते मदतीला औताला लावी खांदा

खतं बियाणं आणूनीया येळेवर केला पेरा
पाण्यासारखा पैसा पाण्यातच वाया गेला

पाऊस आला घेवून पाण्याचा मोठा लोंढा
न उरली बांधबंदिस्ती न उरला माती भेंडा

दु:ख सारं गेलं वाहून आलेल्या पाण्यात
उभारीनं करू पुन्हा तेच आपल्या हातात

- पाषाणभेद
२४/१०/२०२१

शब्दखुणा: 

सकाळ कोवळी

Submitted by पाषाणभेद on 17 October, 2021 - 02:05

सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई
हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई

धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर
शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई

झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड
सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई

रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर
वार्‍यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई

फुलपाखरांसवे पक्षी उडती वरती आरव करती
खोल दरीतून दूर कुणीतरी आल्हादक गीत गाई

- पाषाणभेद
१७/१०/२०२१

शब्दखुणा: 

भाद्रपदाचे कवतिक

Submitted by पुरंदरे शशांक on 3 October, 2021 - 22:24

भाद्रपदाचे कवतिक

रंगपिसारा उघडून देई
श्रावण वेडा अवखळ भारी
हाती येता रंग ढगांचे
भाद्रपदाची खुलते स्वारी

मधेच ओली उन्हे तळपती
सर सर थिरके थेंबघुंगरु
क्षणात लपते उन सोनेरी
पानाकाठी जरा झुरमुरु

कडेकपारी रंग उमलले
माळरान झोकात सळसळे
भिरभिरती रंगांचे अवघे
थवे चमकती रेशिमकवळे

उन्हे तापूनी जरा विसावी
गर्द तरुच्या तळात थोडी
मेघ अडविती किरणांना त्या
डोंगरातुनी येत गडबडी

सरता पाऊस बघे मागुता
पापणकाठी हळवे पाणी
पुन्हा उचलूनी टाके पाऊल
पायवाटीची झुळझुळ गाणी

बरसू दे मज मेघसा

Submitted by निखिल मोडक on 24 September, 2021 - 17:01

बरसू दे मज मेघसा
भार हो आठवांचा वसा
क्षणैक ये गे चमकुनी
सौदामिनीशी मदालसा

© निखिल मोडक

शब्दखुणा: 

वनस्पती उद्यान आणि फ्रिडोत्सव

Submitted by अस्मिता. on 8 September, 2021 - 16:39

वनस्पती उद्यान आणि फ्रिडा काह्लो यांच्या कलेचा उत्सव

शब्दखुणा: 

असाही एक कवितेचा दिवस

Submitted by सामो on 3 September, 2021 - 20:56

एखाद्या सकाळी तुम्ही जागे होता. आणि तुमच्या नेहमीच्या सरावलेल्या कामाला लागता, ते म्हणजे - Brooding. हे अर्थात रुसणं, चिडलेलं असणं, नाराज असणं, स्वत:शी नकारात्मक बोलणं यात तुम्ही इतके पारंगत झालेले असता म्हणुन सांगू - की तुमच्या लक्षातही येत नाही आपण स्वत:वरती, जगावरती इन फॅक्ट आपल्याला झेलणाऱ्या आपल्या प्रियजनांवरती नाराज आहोत. अहो का म्हणुन का विचारता - नेहमीचं अगदी सवयीचं असतं ना ते. शिवाय कित्ती कित्ती सोईस्कर!! एकदा चिडीला आलेलं असलं की लोक आपल्याला एकटं सोडतात. बद्ध्कोष्ठ झाल्यासारखा आपला चेहरा पाहून कोणी आपल्याशी बोलायला धजावत नाही.

विषय: 

नातं निसर्गाशी: हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालिचे

Submitted by जिज्ञासा on 15 August, 2021 - 23:58

जंगल परिसंस्थेनंतर जमिनीवरची आपल्या ओळखीची दुसरी परिसंस्था म्हणजे गवताळ प्रदेश. आजच्या भागात आपण केतकीशी गवताळ प्रदेशांविषयी गप्पा मारणार आहोत.

Pages

Subscribe to RSS - निसर्ग