संस्कृती

अमेरिकेत भारतामधून आंबे मागवता येतील का?

Submitted by sulu on 3 April, 2012 - 15:39

अमेरिकेत भारतामधून विश्वासार्ह आंबे कोण पाठवते का? कृपया माहिती असल्यास कळवा.

हे माझे आयुष्य नाही! हे माझे लग्न नाही!!

Submitted by निनाद on 2 April, 2012 - 07:57

सामिया - तिचा जन्म ऑस्ट्रेलियातला. वडील मूळचे पाकिस्तानातले. तिला त्यांनी एकदा सांगितले की आपल्याला फिरायला जायचे आहे पाकिस्तानात. तेथे गेल्यावर त्यांनी तिचे लग्न लाऊन टाकले तिच्या चुलत भावाशी. हे लग्न त्यांनी ती फक्त १२ वर्षांची असतानाच ठरवले होते.

इतिहासाचे विकृतीकरण

Submitted by RISHIKESH BARVE on 28 March, 2012 - 13:30

संभाजी ब्रिगेडचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख श्री भैय्या पाटील यांच्या प्रश्नाची उत्तरे

१) ब्राह्मण : हिंदू विरुद्ध मुसलमान वा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन वा अशाच धार्मिक दंगली मध्ये ब्राह्मण का मारत नाही?

उत्तर:- ब्राह्मणांना माहिती आहे कि सध्या जे हिंदू-मुस्लीम राजकारण सुरु आहे त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तसेच हि धार्मिक तेढ राजकीय पुढार्यांनी (मग ते कोणत्याही जाती धर्माचे असोत) लाविली आहे. ब्राह्मण हा पूर्णपणे मुसलमानी आतंक वादाच्या विरोधात आहे. पण त्याला जातीय दंगली किंवा धार्मिक तेढ हा उपाय मान्य नाही.

गुढी पाडवा व आपल्या नवीन वर्षाचे संकल्प

Submitted by मंदार-जोशी on 22 March, 2012 - 02:02

उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा. आपल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातला पहिला दिवस, नवीन वर्षाची सुरवात.
म्हणजेच उद्या गुढी पाडवा. सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.

23-March-padwa.jpg23-March-padwakalnirnay.JPG

उद्या डॉ. हेगडेवार जयंती तसेच जागतिक हवामान दिन सुद्धा आहे. तर आपल्या नवीन वर्षात आपण कोणते संकल्प करणार आहोत?

गर्भसंस्कार

Submitted by आयुष्यमान on 26 February, 2012 - 20:31

गर्भसंस्कार म्हणल की आपल्या समोर अनेक गोष्टी येतात. नेमके काय करायचे या बाबत अनेक होणार्या आई वडिलांच्या मनात संभ्रम असतो.संस्कार म्हणजे सातत्याने केलेला प्रयत्न.संस्काराची व्याख्या करताना " संस्कारोही गुणांतरधानम्"अशी केली जाते. संस्कार म्हणजे वाइट गुणांचे चांगल्या गुणांमधे रुपांतर करणे. होणार्या आई वडिलांना जेव्हा आम्ही विचारतो, की, संस्कार म्हणजे तुम्हाला काय अपेक्शीत आहे? तुमच्या बाळा मध्ये तुम्हाला कोणते गुण असावेत असवाटत? तेव्हा त्यांच्या मनातील संभ्रम दिसुन येतो. त्यांना अस वाटत असत की आपल्या बाळा मध्ये शिवाजी, राम, स्वामिविवेकानंद यांच्यासारखे गुण असावेत.

शब्दखुणा: 

अचानक भेटलेली कला, कल्पकता, सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28

आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.

तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्‍यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.

चिन्ह : 'नग्नता - चित्रातली आणि मनातली'

Submitted by चिनूक्स on 3 January, 2012 - 00:11

यंदा पंचविशीत पदार्पण करणारं 'चिन्ह' हे मराठी कलावार्षिक चित्रकला आणि तिच्याशी संबंधित दृश्यकलांना केंद्रस्थानी ठेवून निघतं. मात्र चित्रकलेचा सर्वांगानी वेध घेणे इतकाच मर्यादित हेतू 'चिन्ह'चा निश्चितच नाही.

चित्रकला म्हणजे एका अर्थाने चित्रकारांची कहाणी. त्यांची वैयक्तिक आणि चित्रनिर्मितीच्या प्रेरणेची हकीकत काही वेगळी नसते याची जाणीव 'चिन्ह'ला आहे. चित्रकलेबद्दल बोलायचे तर आधी चित्रकारांची ओळख व्हायला हवी, त्यांचं जगणं, त्यांचं वावरणं, त्यांचं असणं यातून विकसित होत गेलेल्या त्यांच्या कलाविषयक जाणिवांचाही शोध घ्यायला हवा ही जाणीव 'चिन्ह'ला अगदी पहिल्या अंकापासून होती.

मांजर आडवे जाणे अपशकून असते का?

Submitted by साधा माणुस on 3 December, 2011 - 03:30

समजा तुम्ही एकादे चांगले काम करायला घरातून बाहेर पडला असाल, आणि त्याचवेळी तुमच्या समोरून मांजर आडवे गेले तर तुम्ही काय कराल.
तुम्ही पाच पावले मागे चालून परत आपल्या वाटेला लागाल? कि ते काम रद्द करून उद्यावर ढकलाल का.?

हिंदू धर्मात अनेक चालीरितीं पैकी वरची घटनाही अशूभ समजली जाते. त्यापाठी काय कारण असू शकते?
की माणसाच्या असफलतेचे पाप त्या मांजराच्या गळ्यात मारण्याचा हा प्रयत्न असेल.?
आणि खरच मांजर आडवे गेले तर जे काम करायला जातो, ते झालेच नाही असा कुणाला अनुभव आहे का.?

वैश्वदेव म्हणजे काय?

Submitted by जागोमोहनप्यारे on 21 October, 2011 - 13:03

वैश्वदेव करणे म्हणजे काय? वैश्वदेव न करणार्‍या लोकांचा ( ब्राह्मणांचा) अनेक साधुसंतानी धिक्कार केला आहे, ते कसे करावे, कुणी, कुठे करावे? त्याने नेमके काय साध्य होते? ऋग्वेदात विश्वदेवांचा उल्लेख येतो, ते हेच का?

शब्दखुणा: 

लक्ष्मी अन अवदसा

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

लक्षुमी आन अवदसा या दोन बहिनी. दोनीस्ले शेजारशेजारना घरस्मा देयेल व्हतं.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - संस्कृती