संस्कृती
बंगाली मिठाई फॅन क्लब
शॉगतम 
तुमी की खॉबे??? मिश्ती किचु??? .... 
बंगाली मिठाई .. बंगाली भाषेसारखीच गोड आणि परत परत खावीशी वाटणारी... रोशोगुला, चॉमचॉम.. अशे बोबडे उच्चार करायलाही किती मजा वाटते ना?
तर मग सांगा बर तुमच्या आवडत्या बंगाली मिठाया, त्यांचा इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र.. त्या बनवण्याच्या पाककृती (पाकृ योग्य जागी लिहीणे आणि इथे फक्त लिंका देणे), आणि युक्त्या, अस्सल बंगाली मिठाई कुठे चांगली मिळते.. हलवाई/हॉटेल इ इ ....सोबकिचु बाँगला मिश्ती 
ज्यांना बंगाली मिठाई आवडत नाही त्यांना या धाग्यावरच्या पोष्टीवाचुन त्या आवडायला लागणार याची खात्री 
शुरु कोरो...
चालो खाई 
सिनेमा सिनेमा- आम्रपाली
अमेरिकेतील निवडणुका - २०१२
यावर्षी अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होतील. रिपब्लिकन पक्षातर्फे 'मिट रॉमनी' उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील असं (जवळपास) निश्चित झालं आहे. त्यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार कोण असतील/असावेत यासाठी नुकत्याच मायबोलीवर घेतलेल्या सर्व्हेत भाग घेणार्यांचे आभार. मायबोलीकरांनी (प्रचंड) बहुमताने 'बॉबी जिंदल' (आर्च, आडनाव बरोबर लिहिलंय का?) यांना निवडले. त्यांच्या खालोखाल कॉंडालिझ्झा राईस (नाव ऐकलेलं आहे, द्या ठोकून!) यांना मते मिळाली.
मराठीचं काय होणार?
बेफिकीर यांचा मराठीचा अभिमान
हा लेख नक्कीच विचार करायला लावणारा आहे. लेखातले काही मुद्दे पटले तरी त्यामधे भविष्यात काय घडू शकेल, याबद्दल जे विचार मांडले आहेत ते मला पटले नाही. थोडे पुढे जाऊन मी असे म्हणेन कि त्यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले तरी त्यामागची कारणे मात्र त्यांनी मांडलेली नसतील. त्यांच्या एकेक विधानाचे मुद्देसूद खंडण करणारा हा लेख नाही. तर मनात आलेले काही वेगळे विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
१. मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्रः
सिनेमा सिनेमा- वक्त
वक्त- ’साठ’वण सिनेमांची
पन्नासच्या दशकातल्या दो बिघा जमीन, कागझ के फ़ूल, मदर इंडिया, देवदास इत्यादी गाजलेल्या सिनेमांनी त्या दशकाच्या चेहर्यावर ’सिरियस’ ठसा उमटवला. कदाचित हे गांभीर्य जरा अतीच झालं म्हणूनही असेल, पण त्याच्या पुढच्या दशकाने आपला पूर्ण मेकओव्हरच करुन टाकला. सिनेमांमधे रंग आले आणि त्या रंगांचा उत्फ़ुल्लपणा अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकारांच्या कामगिरीत आपसुक उतरला.
सिनेमा सिनेमा- पुन्हा एकदा
भारतीय सिनेमा शंभर वर्षांचा झाला. आजवर या सिनेमामुळे मनाला असीम आनंद मिळाला. सिनेमांचं ऋण मनावर सुखाचं ओझं ठेवून आहे, ते अंशतःही उतरवण्याची इच्छा नाही मात्र या निमित्ताने आवडत्या सिनेमांवर लेख लिहून निदान कृतज्ञता तरी व्यक्त करणे मस्ट आहे.
मला सिनेमा बघायला आवडतो, त्यावर लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला आवडतं, जो सिनेमा पाहिलेला नाही त्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं, जे सिनेमे आवडले नाहीत, त्यांच्यावरही बोलायला आवडतं, ते का आवडले नाहीत त्याबद्दल विचार करायला आवडतं. थोडक्यात सांगायचं तर मला सिनेमा कसाही आवडतोच.
काही सिनेमे बुद्धीने बघायचे, काही नजरेने, काही मनाने. काही उगीचच.
कोल्हापुरच्या आठवणी
टवाळक्या (उपेक्षितांचे अंतरंग)
मित्रांनो ! मी तसा मा.बो. वरचा जुनाच पडीक आहे. म्हणजे बघा, उणीपुरी १० वर्षे काढलीत मी ईथे. सुरवातीची साडे-चार वर्षे मी अगदी साधा-सुध्या स्वरूपात जपून-जपून प्रतिक्रिया देत काढली. पण माझा येळकोट काही रहात नव्हता आणि मुळ स्वभाव जात नव्हता. शेवटी एक दिवशी माझ्यातल्या मी चा साक्षात्कार झाला आणि "नम्र टवाळा" चा जन्म झाला. बराच काळ मुख्यतः कट्टा आणि क्वचित दुसर्या काही पानांवर टवाळक्या केल्यानंतर आता स्वतःचे एक पान सुरू करावे अशी सुरसुरी आली. या पानाचे नाव मी "टवाळक्या (उपेक्षितांचे अंतरंग)" असे देण्याचे मुख्य कारण टवाळ या आय्-डी सारख्याच मा.बो.
चौदा विद्या आणि चौसष्ठ कला
चौदा विद्या आणि चौसष्ठ कला
चौदा विद्या: चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र
वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद
सहा वेदांगे: १. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र. २. ज्योतिष- ग्रहगती तथा सामुद्रिक जाणण्याची विद्या. ३. निरुक्त- वेदांतील कठीण शब्दांचे अर्थ सांगणारे शास्त्र. ४. कल्प- धार्मिक विधी- व्रतांचे वर्णन करणारे शास्त्र. ५. छंद- शब्दांची गानयोग्य रचना व काव्यवृत्ताचे ज्ञान. ६. शिक्षा- शिक्षण, अध्यापन व अध्ययन.