हानामी (花見) : साकुरा
हानामी(花見), जपान मधे साधारण सातव्याशतकापासून चालू झालेली ही परंपरा आजही कसोशीने आणि हौसेने पाळली जाते. हाना(花)म्हाणजे साकुरा(桜、चेरी)चे फूल आणि मी(見) म्हणजे पहाणॆ. साकुराचा आलेला बहर पहायला जाणे म्हणजे हानामी. ही झाली पुस्तकी व्याख्या, पण जपानी लोक़ांची खरी व्याख्या आहे, हानामी म्हणजे मौज मजा, जत्रा, कुटुंबकबिल्यासोबत, मित्र-परिवारासोबत जीवनाचा आनंद लुटण्याचा काळ.

कथा पूर्ण करा, शीर्षक द्या, लेखक/लेखिका ओळखा : शेवटचं वळण (कथा २) आणि प्रवेशिका
संयोजक | 28 August, 2011 - 02:06
स्वेटर विणताना शेजारी जोरात आवाज करत खेळण्यातील गाडी चालवत असलेल्या आपल्या नातवाला म्हणजे अमेयला आजींनी आवाज कमी करण्याचा सल्ला दिला आणि नेहमीप्रमाणेच तो न ऐकता अमेय उलट अधिक आवाज करू लागला. समोरच्या फोटोतील पतीच्या चेहर्याकडे सहज नजर गेली आणि आजींचा श्वास रोखला गेला. मनातील विचारांना व्यक्ततेचे अमूर्त स्वरूप मिळाले तसे विचार सैरावैरा डोळ्यातून वाहू लागले.
राहुल गांधी- एक औस्तुक्याचा (?) विषय....
हे मला ई मेलमधून ढकलपत्रातून आले...
राहुल गांधी : जे काही UP मध्ये घडले ते पाहून मला भारतीय म्हणवून घेण्यास लाज
वाटते.....
थांबा!!!! भारताच्या युवराजचे हे शब्द ऐकून तुम्ही लगेच UP शिव्या द्यायला
सुरुवात करू नका...
थोडेसे युवराज आणि त्याची आई यांच्या बद्दल जाणून घ्या....
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यउत्तर काळ मिळून उत्तरप्रदेशवर कॉंग्रेसचेच
राज्य होते. फक्त आणीबाणी आणि काही बदली सरकार सोडून कॉंग्रेसच सत्तेवर होते
(१९३९ ते १९८९ याकाळामध्ये)
स्वातंत्र्य मिळाल्या पासून आत्ता पर्यंत झालेल्या १४ पंतप्रधानापैकी ८
गणपती विसर्जन आणि प्रदूषण
आज गणपती विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे नदीवर गेलो तर तिथे पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी उभे होते. त्यानी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला. त्याऐवजी जवळच्या एका हिरवेगार घाण पाणी असलेल्या खंदकाचा पर्याय दिला किंवा नदीजवळ एक छोटी काहिल होती त्यात गणपती सोडायला सांगितला. निर्माल्य टाकायला वेगळी ट्रॉली होती.
हरताळका विसर्जनाच्या वेळी नदीकाठी भात, निर्माल्य, फुले आणि मूर्ती यांचा राडा-चिखल झालेला होता, म्हणून असे केले असे साम्गण्यात आले.
१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?
मंडळी...
मायबोली गणेशोत्सवात प्रसिद्ध, अप्रसिद्ध मंदिरे पाहून मला दुर्ग-गणेशची संकल्पना सुचली. जरी बहुतांश गडांवर महादेव किंवा भवानीमातेची मंदिरे आढळत असली तरी गणराय देखील काही ठिकाणी आपल्या भक्तांना दर्शन देत असतात.
या दुर्गभ्रमंती दरम्यान पावलेल्या या काही बाप्पांची प्रकाशचित्रे माबोकरांसाठी सादर करत आहे.
माबोकर आनंदयात्रीला ही संकल्पना सांगितल्यावर त्यानेही उत्साहाने प्रतिसाद देत त्याच्याकडील आणि रोहन एक मावळा कडील काही बाप्पा पाठवले....
सर्व भटक्यांनी देखील आपल्याकडे असलेली दुर्ग गणेशांची प्रचि पाठवाव्यात जेणेकरून एक सुंदर असे संकलन करता येईल...
धन्यवाद...
प्रचि १
अंतरीचे धावे
लेख़क : भानू काळे
प्रकाशक मौज प्रकाशन
प्रकाशन: जून २००९
'अंतरीचे धावे' च्या निमित्ताने ..
आर्यांच्या शोधात
मधुकर केशव ढवळीकर
राजहंस प्रकाशन
प्रथम आवृत्ती - एप्रिल २००८
किंमत - १०० रूपये
नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमपरो यत् ।
किमावरीवः कुहकस्यशर्मन्नंभः किमासीद्गहनं गभीरं ॥ १ ॥ -- ऋग्वेद, मंडल १०, सूक्त १२९

भारताचे राष्ट्रगीत ..... महाराष्ट्राचे महाराष्ट्रगीत ........ मग मायबोलीचं आपलं स्वत:चं मायबोलीगीत का बरं नाही???
आपल्या मायबोलीवर कितीतरी प्रतिभासंपन्न कवी-कवयित्री आहेत. त्या सगळ्यांना यंदा ही सुवर्णसंधी आहे. आपल्या लाडक्या मायबोलीचं सुंदर वर्णन, तिचं तत्वज्ञान, तिचे पैलू उलगडून सांगणारं, छानसं चालीवर बसवता येईल असं गीत तयार करायचं... खास "मायबोली शीर्षकगीत".

****************************************************************************
काय आवडलं आमंत्रण? आपल्याला अनेक प्रकारची लिखित आमंत्रणं येत असतात. लग्न, मुंज, बारसं, वाढदिवस, सत्कारसमारंभ, पुस्तक प्रकाशन, कवी-संमेलन .... अशी कितीतरी! कधी कधी मुख्य समारंभाआधीच या निमंत्रण पत्रिका आपली अत्यंत करमणूक करतात - कारण आपलं 'आवताण' अधिकाधिक 'वरताण' करण्यापायी लोक काहीही लिहितात.