मांजर आडवे जाणे अपशकून असते का?

Submitted by साधा माणुस on 3 December, 2011 - 03:30

समजा तुम्ही एकादे चांगले काम करायला घरातून बाहेर पडला असाल, आणि त्याचवेळी तुमच्या समोरून मांजर आडवे गेले तर तुम्ही काय कराल.
तुम्ही पाच पावले मागे चालून परत आपल्या वाटेला लागाल? कि ते काम रद्द करून उद्यावर ढकलाल का.?

हिंदू धर्मात अनेक चालीरितीं पैकी वरची घटनाही अशूभ समजली जाते. त्यापाठी काय कारण असू शकते?
की माणसाच्या असफलतेचे पाप त्या मांजराच्या गळ्यात मारण्याचा हा प्रयत्न असेल.?
आणि खरच मांजर आडवे गेले तर जे काम करायला जातो, ते झालेच नाही असा कुणाला अनुभव आहे का.?

मी बर्‍याच लोकांना मांजर आडवे गेल्यावर एकाच ठीकाणी थोडा वेळ उभे राहणे, पाच पावले मागे जाणे किंव्हा तो रस्ताच बदलताना बघितलेय. तर काहीजण म्हणतात, मांजर डावीकडून उजवीकडे आडवे गेलेय आणि ते तर अजिबात अशूभ नसते.

तर यावर तुम्हाला काय वाटते?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याबाबतीत उलटे होते. मला एखाद दिवशी मांजर आडवे गेले - मग ते डावीकडून उजवीकडे ऑर व्हाईस व्हर्सा असा फरक पडत नाही - गेले तर तो दिवस चांगला जातो. अनेक कठीण कामे होतात. आता मी एखादे दिवशी कठीण कामे असली की मांजर दिसतंउ का शोधतो. बरोबर घेऊनच फिरेन म्हणतो आता.

Proud

आमच्या घरात तर तीन-तीन मांजरी आहेत. आणि त्या घरात, घराच्या बाहेर सतत आडव्या, उभ्या, तिरप्या कशाही जात असतात पण त्यामुळे कोणताही अपशकून झाल्याच आठवत नाही.
काय कारण असेल बर?

दुसर्‍या दिवशी पण मांजर आडवी जाणारच नाही कशावरुन? गेली तरे तिसर्‍या दिवसावर काम ढकलायचे कां?

मांजर आडवे जाण्याचा आणि काम न होण्याचा संबंध नाही आहे. मी अनेकवेळा पुढे गेलो आणि कामे पुर्ण झाली आहेत.

जामोप्या..................कीती धागे उघडतात............ आता उघडेच पडा............ Happy

जामोप्या..................कीती धागे उघडतात............ आता उघडेच पडा............
---- अहो हा धागा साध्या माणसाने काढला आहे.... जामोप्यांची संधी हुकली Sad

तुमची नजर चुक झाली नसेल तर मग तुम्ही गंभीर आरोप करत आहात... Happy

आता मी एखादे दिवशी कठीण कामे असली की मांजर दिसतंउ का शोधतो. बरोबर घेऊनच फिरेन म्हणतो आता.<<

मी तर सतत एक मांजरच बॅगेतच ठेवतो, आणि चांगले काम असेल तर लगेच बॅगेतून काढून रस्त्यावर आडवी सोडून देतो.:फिदी: अर्थात माझ्या स्वत: च्या.

अरेरे.. माझा चान्स चुकला.. ! मला का नाअही सुचले हे..?

मी तरी मांजर आडवे जाणे शुभ मानतो.. कारण मला मांजर आवडते. मी कुठल्याही मांजराला मॅग्गॉनिगल म्हणतो. Proud ही आमची जुनी मॅग्गोनिगल..

cats.JPG

*** खूपच महत्वाचा धागा काढल्या बद्दल अभिनंदन!!

मला वाटते सगळ्यात महत्वाचा आहे तो रंग.. की मांजर कोणत्या रंगाचे आहे.

१) काळे मांजर भयंकर अपशकुनी असते, आडवे गेल्यास आपल्या आरशावर परीणाम होउ शकतो..म्हणजे गोरा माणूस सावळा किंवा मांजराच्याच रंगाचा होऊ शकतो. असे मांजर जास्त वेळा आडवे गेल्यास मात्र सिनेस्टार होण्याचे योग असतात.. काजोल, बिपाशा, अगदी अजय आणि रजनिकांत सुद्धा याचीच उदाहरणे आहेत..

२) तांबूस मांजर ... हे बिनअपशकुनी असते. हे आडवे गेल्यास प्रेम होण्याच्याच शक्यता जास्त असतात...मात्र हे प्रेम कोणत्याही वयोगटाला होऊ शकते.
विवाहित-अविवाहित अगदी कोणालाही होण्याचा धोका असतो. अशी मांजरे जास्त वेळा आडवे जाण्याने शायनी आहूजा अडचणीत आल्याचे ऐकिवात आहे.

३) राखाडी मांजर- हे साधारण राखाडी रंगाचे असते.. हे ही मांजर तसे बिनअपशकुनी आहे. डिसेंबर ते फेब्रवारी हा या मांजरांच्या विनिचा काळ असतो या
कालावधीत मात्र ही मांजरे खूप आशेने जोडीदार शोधत असतात. अशात कोणी माणूस आडवा गेल्याने त्यांची संधी हुकल्यास ते शाप देऊ शकतात आणि
माणसावर त्याचा परीणाम होऊ शकतो... अशाच एका मांजरीने शाप दिल्याने सलमान खान यांचे लग्न रखडल्याचे समजते.

४) इतर रंगाची मांजरे ही बहुदा परदेशी वंशाची असतात..ती आडवी गेल्यास परदेशी लोकांची चापलूसी करण्याची वेळ माणसावर येऊ शकते ज्यामुळे चेहर्‍याच्या वेगवेगळ्या शस्रक्रिया केल्या तरी लोकं शोधून शोधून कानफाड फोडू शकतात...अशीच एक घटना मागील आठवड्यात झाल्याची समजते.

सदर माहिती "मांजरआख्याण" या प्राधार्मिक ग्रंथातून मिळवलेली आहे.. भंपक समजू नये, असे या ग्रंथात शेवटी म्हटलेले आहे. असे समजणार्‍यांच्या कुटूंबात या पुढे होणारी अपत्ये इम्राण हश्मी किंवा मल्लिका शेरावत सारखी निपजू शकतात.

अजून लागल्यास माहिती याच धाग्यावर वेळोवेळी प्रकाशित करण्यात येईल.......

गुरुजी, पोटुशी माम्जर आडवे गेल्यास काय होते? इथे मांजर म्हणजे स्त्री मांजरच का? की हे नियम बोक्यालाही लागू आहेत? Proud

मांजर आडवी जाणे ...म्हणजे मांजर पण कुठे तरी जात असेल कदाचीत आपल्यापेक्शा घाईत असेल

मांजर आणी बोक्या एकदाच दोन्ही साईड ने आडवे गेले तर काय होईल?????
म्हणजे त्यांनीच एकमेकांना कट मारला तर आपन दहा पावलं मागे जायचं का??

ख्रिस्ताचा किंवा जागोमोहम्मदप्यारे अल्लाचाही जप करु शकतात. सबका मालिक एक. Wink

अरे...वा, जामोप्याचा आणखी एक टाईमपास धागा....::फिदी:

मागे आम्ही दापोलीहून मुंबईला खाजगी बसने येत होतो, बस अंबेत घाटात असताना त्या बससमोरून एक मुंगुस आडवे गेले तर त्या बस ड्रायवरने दहा मिनटे बस थांबवून घाटात ट्रफिक जाम करून टाकले होते.

ख्रिस्ताचा किंवा जागोमोहम्मदप्यारे अल्लाचाही जप करु शकतात. सबका मालिक एक.

ख्रिस्ताचा किंवा अल्लाचा जप करण्यात कसला आलाय कमीपणा? सावरकरानीच ख्रिस्त हिंदु होता असे लिहून ठेवलय. असो. या मांजराच्या बीबीवर सावरकर आडवे जायला नकोत. उगाच मांजर मारल्याचे पाप नको.. ( युरेका युरेका... नवीन धागा सापडला.) Proud

Pages