गुढी पाडवा व आपल्या नवीन वर्षाचे संकल्प

Submitted by मंदार-जोशी on 22 March, 2012 - 02:02

उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा. आपल्या वर्षाच्या पहिल्या महिन्यातला पहिला दिवस, नवीन वर्षाची सुरवात.
म्हणजेच उद्या गुढी पाडवा. सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा.

23-March-padwa.jpg23-March-padwakalnirnay.JPG

उद्या डॉ. हेगडेवार जयंती तसेच जागतिक हवामान दिन सुद्धा आहे. तर आपल्या नवीन वर्षात आपण कोणते संकल्प करणार आहोत?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवा संकल्प केला की नवी पळवाट सापडते

शेराची पुढची ओळ येथे लिहीत नाही

पाडव्याच्या सर्वांना व आपल्याला शुभेच्छा

सगळ्यांना गुडीपाडव्या हार्दिक शुभेच्छा... हे नव वर्ष सर्व माबोकरांना सुख समृद्धी चे जावो हिच कामना..:स्मित:

मंदार, ही छान कल्पना आहे.. प्रत्येकाच्या विपुत जाऊन शुभेच्छा दिल्या पेक्षा इथेच सर्वांना शुभेच्छा दिल्या जातील :स्मित:.......

मी व्यायामाला पुन्हा सुरवात करेन असा संकल्प केला आहे.
तसेच पूजा करायला अजिबात आळस न करता रोज सकाळी न चुकता पूजा करणार.

मी व्यायामाला पुन्हा सुरवात करेन असा संकल्प केला आहे.
>>

लवकरच आपण अतिशय फिट व स्वास्थ्यपूर्ण व्हाल अशी प्रार्थना

(आत्ता नाही आहात असे नाही )

क्वान्टमला जाणार की घरीच?

सर्वांना गुढीपाडव्याच्या व नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझा संकल्प म्हणजे रोज रात्री उशीरापर्यंत महाजालात अडकून सकाळी उशीरा उठतो ते बंद करणे.
लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपदा भेटे ! Happy

नवा संकल्प केला की नवी पळवाट सापडते,
या वर्षिची संकल्प पुढच्या वर्षि वर पडते
आणि दरवर्षि हे असेच घडते...... Wink

सर्वांना पाडव्याच्या शुभेच्छा..!!!! Happy

पुर्वी संकल्प करायचे. पण ते संकल्प ४-५ दिवसांत संथ व्हायचे त्यामुळे हल्ली संकल्प करणे बंदच केल आहे. आता येईल तो काळ आपल्या सवडी, सोईनुसार सार्थकी लावायचा मग त्यात काम, छंद, आराम सगळच आल.

गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्वांना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!. हे वर्ष सर्वाना सुख-समृद्धीचे, व शांततेचे जावो. Happy
संकल्प न करण्याचा संकल्प केला आहे >>>लाजो Lol

नक्षिदार काठीवर रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनि मराठी मनाची गुढी,
साजरी करुया गुढीपाडवा !

सर्वांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नाहीच मुळी, मला तसाही कोणाला त्रास द्यायला नाही आवडत. संकल्पाला तर नाहिच Wink

सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
मी इंग्रजी नवीन वर्षाला केलेला संकल्प अजुन सुरुच झाला नाही. Happy
मग तोच संकल्प पुन्हा आपल्या नवीन वर्षाला करीन म्हणते Happy

मी १ जानेवारीला (म्हणजे जोशी यांच्यानुसार खिस्ती नववर्षाला) संकल्प सोडला आहे. त्यामुळे तोच संकल्प चालू ठेवण्याचा संकल्प उद्या सोडेन असे म्हणतो...

बेफी - तुम्हाला फिट आणि स्वास्थ्यपूर्ण असे का म्हणावेसे वाटले...http://www.maayboli.com/node/33512 इकडे जाऊन आला नाहीत का?

}}[[[[}[[[सर्वांना गुढीपाडव्याच्या व नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझा संकल्प म्हणजे रोज रात्री उशीरापर्यंत महाजालात अडकून सकाळी उशीरा उठतो ते बंद करणे.
लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपदा ......................]]]

डिट्टो.........................................

Pages