वैश्वदेव म्हणजे काय?

Submitted by जागोमोहनप्यारे on 21 October, 2011 - 13:03

वैश्वदेव करणे म्हणजे काय? वैश्वदेव न करणार्‍या लोकांचा ( ब्राह्मणांचा) अनेक साधुसंतानी धिक्कार केला आहे, ते कसे करावे, कुणी, कुठे करावे? त्याने नेमके काय साध्य होते? ऋग्वेदात विश्वदेवांचा उल्लेख येतो, ते हेच का?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्वदेव हा विश्वजित व देव आनंद या दोघांची एकदम नक्कल करणारा एक हिंदी सिनेमातील नट आहे.
त्याच्या सिनेमात ऋग्वेद नावाचा साईड्किक असलेला नट असतो. जसे मुन्नाभाई नि सर्कीट!

जसे मुन्नाभाइचा सिनेमा न बघणारे धिक्कारास पात्र आहेत तसेच विश्वदेव व ऋग्वेद यांचे सिनेमे न पहाणारे हि धिक्कारास पात्र आहेत.

Light 1

झक्की,

तुम्ही जिथे जाईल तिथे विनोद करताय! अहो, ज्ञानपिपासू वृत्तीने विचारलेला हा सिरीयस प्रश्न आहे व यावर सिरीयस उत्तर अपेक्षित आहे.

Biggrin

जामोप्या, स्टेप बाय स्टेप जा.
पहिले देव म्हणजे काय?
मग विश्व म्हणजे काय?
मग विश्वदेव म्हणजे काय?

उगाच दोन बाफंची कमी भासेल की तुमच्या वाटचालीत.

. जसे मुन्नाभाई नि सर्कीट!
----- झक्की तुम्ही तर षटकार मारलात :स्मित:.

ते वैश्वदेव आहे... स्नान, संध्या-जप, होम, पठण, देवार्चन आणि वैश्वदेव ही ब्राह्मणाची कर्तव्ये सांगितली आहेत.

http://www.hindujagruti.org/hindi/index.php/dharmashiksha/dharmashashtra...

जिस घरमें पंचमहायज्ञ नहीं होते, वहांका अन्न संस्कारित नहीं होता; इसलिए संन्यासी, सत्पुरुष व श्राद्धके समय पितर उसे ग्रहण नहीं करते । जिस घरमें पंचमहायज्ञ करनेपर शेष अन्नका सेवन किया जाता है, वहां गृहशांति रहती है तथा अन्नपूर्णादेवीका वास रहता है ।

धन्यवाद... हो ते वैश्वदेवच आहे.

टेंबे स्वामींच्या चरित्रात उल्लेख आहे, वैश्वदेव होत नसलेल्या घरी ते भिक्षा घेत नसत. पण त्याचे कारण पुस्तकात दिले नव्हते, म्हणुन इथे धागा काढला. इथे मायबोलीवर हिंदुत्ववादी ढीगभर आहेत, त्यातला एक तरी पुढे येईल उत्तर द्यायला अशी अपेक्षा होती! Proud

जामोप्या, अस्ले प्रश्न इथे विचारत बसण्यापेक्षा असे का नाही करत? अप्पाबळवन्त चौकात जा, किन्वा दगडु हलवाई गणपती समोर नेर्लेकरान्चे दुकान आहे, तिथे हिन्दू धर्माबाबत सर्व पुस्तके माफक किमतीला मिळतात, वाचशील तर सत्वर खात्रीने "शन्कानिरसन" होईल. नेटजगतात वावरणार्‍या लोकान्ना हे सर्वच ज्ञान सम्यक स्वरुपात असेल असे नाहीच, तर केव्हा जातोस पुस्तके घ्यायला? मी तरी तेच केलय.
ख्रिश्चन्नाना प्रश्न विचारण्यापेक्षा मी सरळ बायबल विकत घेतले! Proud
मात्र एक हे, हिन्दु धर्माबाबत विचारणा करायच्या तर तुम्हाला बरीच पुस्तके घ्यायला लागतील, (इतर धर्मियान्सारखे एकच एक पुस्तक घेऊन काम भागत नाही, हिन्दू धर्मात विवेचन केलेले ज्ञान बहुरन्गी/बहुढन्गी/बहुआयामी व सार्वकालिक आहे) त्यासाठी पैका खर्च करावा लागेल (गुगलुन फुकटात जे मिळतं ते सम्पुर्ण परिपूर्ण नस्तच), व महत्वाचे म्हणजे पुस्तके वाचायचे "कष्ट" घ्यावे लागतील. ते न करता, इथे तिथे पिचकार्‍या मारल्याप्रमाणे प्रश्नान्च्या फैरी किं निमित्ते? Wink
बाकी तुमच्या प्रश्नान्चा तुम्हाला जाहिर धन्यवाद देण्याजोगा एक सूप्त फायदा असाही आहे की मजसारख्या नेटविश्वात वावरणार्‍या पण "धार्मिकदृष्ट्या पूर्ण अडाणी" लोकान्ना, असेही काही विधी/कर्म करायची असतात हे माहिती होतय, अन हे ही नसे थोडके, नै का? Proud

>>> हिन्दू धर्मात विवेचन केलेले ज्ञान बहुरन्गी/बहुढन्गी/बहुआयामी व सार्वकालिक आहे

आता तुम्ही संपलात. चिलखत, ढाल, शिरस्त्राण, गायत्री मंत्राने मंत्राळलेले जानवे वगैरे परिधान करून सज्ज रहा.

Happy

इथे मायबोलीवर हिंदुत्ववादी ढीगभर आहेत, त्यातला एक तरी पुढे येईल उत्तर द्यायला अशी अपेक्षा होती! >>>

अहो जामोप्या तुम्ही नेहमीसारखाच घोळ केलात. हिंदूत्ववादी आणि हिंदू धर्म हे दोन्ही वेगळ्याबाबी आहेत. हिंदू धर्माशी सांगड हिंदूत्वाशी नाही.

शिवाय सर्व हिंदू हे देवपुजक असतात हा भंयकर गैरसमज तुमच्या मनात आहे. तो पण काढा.

तुम्हाला काहीच कसेहो माहित नाही, की मुद्दाम सर्व!

हिंदू धर्माशी सांगड हिंदूत्वाशी नाही.

आता हिंदुत्ववाले तुम्हाला बडवतील. Proud

इथे मायबोलीवर हिंदुत्ववादी ढीगभर आहेत, त्यातला एक तरी पुढे येईल उत्तर द्यायला अशी अपेक्षा होती! >>>

५० हिंदुत्ववाले असतील तर एखादा तरी देवाधर्माचं ज्ञान असलेला असेलच की...