योग

माझी योगचर्या

Submitted by अनन्त्_यात्री on 21 June, 2024 - 08:10

भुजंगासनाची
माझी रीत न्यारी
डसेन जिव्हारी
नकळत

शीर्षासन तर
माझे आवडते
नको ते उलटे
पाहतो मी

"धनुरा"सनाची
सवय लाविली
"मशाल" फेकली
दूरवर

सध्या "पद्मा"सन
घालतो मुकाट
ED चे झेंगट
कोणा हवे?

भ्रष्ट नेत्यांना सत्तेसाठी सोबत घेत मोदीजी भ्रष्टाचार कसा हटवणार ?

Submitted by ashokkabade67@g... on 5 May, 2024 - 01:19

आज भारतात राजकारणाचे अत्यंत गलिच्छ रुप पहाण्याची वेळ सत्तजीवी राजकारण्यांनी मतदारांवर आणुन ठेवली आहे ,आधी विरोधीपक्षातील नेत्यावर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करायचा त्याच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या ईडी ,सिबिआय सारख्या तपास संस्थाना त्याच्या मागे लावत त्याला बदनाम करायचे भाजपसोबत तो नेता गेल्यास त्याचा मानसन्मान करत त्याला मंत्रीपद बहाल करायचे व तो तत्ववादी निघाल्यास त्याला जेलमधे टाकायचे हा फंडा ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणनारे मोदीजी वापरत आहेत प्रत्येक राज्यात हीच स्थिती आहे सत्तजीवी असलेल्या मोदींनी हाच फंडा वापरत निवडणूक लढवली नाहीतर मोदींच्या फुग्यातील हवा कधीच निघून गेली आ

भ्रष्ट नेत्यांना सत्तेसाठी सोबत घेत मोदीजी भ्रष्टाचार कसा हटवणार ?

Submitted by ashokkabade67@g... on 5 May, 2024 - 01:19

आज भारतात राजकारणाचे अत्यंत गलिच्छ रुप पहाण्याची वेळ सत्तजीवी राजकारण्यांनी मतदारांवर आणुन ठेवली आहे ,आधी विरोधीपक्षातील नेत्यावर भ्रष्टाचारी असल्याचा आरोप करायचा त्याच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या ईडी ,सिबिआय सारख्या तपास संस्थाना त्याच्या मागे लावत त्याला बदनाम करायचे भाजपसोबत तो नेता गेल्यास त्याचा मानसन्मान करत त्याला मंत्रीपद बहाल करायचे व तो तत्ववादी निघाल्यास त्याला जेलमधे टाकायचे हा फंडा ना खाउंगा ना खाने दुंगा म्हणनारे मोदीजी वापरत आहेत प्रत्येक राज्यात हीच स्थिती आहे सत्तजीवी असलेल्या मोदींनी हाच फंडा वापरत निवडणूक लढवली नाहीतर मोदींच्या फुग्यातील हवा कधीच निघून गेली आ

अशक्य

Submitted by श्रीराम_देशपांडे on 4 August, 2023 - 21:23

मूल जेथे हसू शकत नाही
ते कुटुंब असू शकत नाही

पुण्य हे एक कर्मफळ आहे
पुण्य हेतू असू शकत नाही

कार्यशक्ती वेडेपणामधली
शाहण्याला दिसू शकत नाही

राहिला जर कृतीत रावण तर
राम हृदयी वसू शकत नाही

आसवांना तरी पुसा, कारण
आठवण तर पुसू शकत नाही

खूप ठरवून शेवटी कळलें
मी तुझ्यावर रुसू शकत नाही

विषय: 
शब्दखुणा: 

योगाचे सांस्कृतिक अपहरण (Cultural appropriation of Yoga)

Submitted by चामुंडराय on 20 June, 2023 - 21:58

योगामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक स्तरावरचे सुपरिणाम लक्षात आल्यावर आणि योगाला जगभर प्रसिद्धी मिळाल्यावर त्या मागचे अर्थकारण लक्षात घेऊन पाश्चिमात्य देशांमध्ये व इतरत्र देखील योगाचा आर्थिक प्राप्तीसाठी व्यावसायिक पद्धतीने वापर सुरु झाला. योगासने आणि प्राणायाम शिकवण्यासाठी योग प्रशिक्षण वर्ग जागोजागी सुरु झाले. पुढे त्यांची संख्या एव्हढी वाढली कि त्याला मॅकयोगा (McYoga) अशी संज्ञा मिळाली. आजकालच्या सोशल मीडिया आणि डिजिटल जगाचे अर्थप्राप्तीसाठी योगाकडे लक्ष न जाते तर नवलच त्यामुळे आंतरजालावर योगाचा प्रसार झाला.

विषय: 

शुभेच्छा

Submitted by ashokkabade67@g... on 5 November, 2021 - 08:54

मायबोलीवरील माझ्या साऱ्या मीत्र,बंधुभगिणींनो दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ।ही दिपावली आपणास व आपल्या कुटुंबास सुखसम्रुद्धीची जाओ हीच ईशचरणी प्रार्थना।

विषय: 

भारतातील चांगले बीपी आणि शुगर मशीन

Submitted by च्रप्स on 21 September, 2021 - 10:28

आजीला अचानक किडनी सूज आल्यामुळे ऍडमिट करावे लागले, डॉक्टर म्हणाले शुगर शूट झाल्यामुळे असा त्रास झाला आहे...
आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरीच बीपी आणि शुगर चेक करण्याचा प्लॅन आहे...
चांगले मशीन सुचवू शकता का... वापरण्यास सोपे असावे आणि ऍक्युरेट...

शब्दखुणा: 

स्व-काळजी- जबाबदारी कोणाची?

Submitted by मोहिनी१२३ on 28 July, 2021 - 11:23

बर्याच दिवसांपासून या विषयावर लिहायचं मनात होतं.माझ्या फेसबुक मित्रयादीतील Dr.Shilpa Chitnis Joshi आरोग्य/आजारांविषयी अनेक महितीपर,बोधप्रद पोस्टस् लिहीत असतात.
त्या वाचल्यावर नवीन महिती कळतेच. परंतू त्या वाचून, काही कंमेटस् वाचून एक प्रश्न बराच काळ मनात घोळतोय. तो म्हणजे स्व-आरोग्य, स्व-काळजी ही जबाबदारी कोणाची?

माझ्या मते डॅाक्टरस् हे पेशंटसला treat करतात; काही वेळा आजार होऊ नये म्हणून prevent करतात.मार्गदर्शन करतात.

मला सुदैवाने खूप चांगले डॅाक्टर्स मिळाले. ज्यांनी मला मोठ्या आजाराच्या, मरणाच्या दाढेतून बाहेर काढलं. त्यामुळे मी डॅाक्टर्स बद्दल खूप कृतज्ञ आहे.

"योगा" ची बाजारपेठ (Yoga Inc. $ € ¥ £ ₹)

Submitted by चामुंडराय on 27 July, 2021 - 12:05

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त एका दैनिकाच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रकाशित झालेला "योगाची बाजारपेठ Yoga Inc." हा माझा लेख इथे देत आहे.

इतरत्र प्रकाशित झालेले साहित्य इथे देणे मायबोलीच्या नियमांत बसत नसेल तर हा लेख उडवावा अशी संपादकांना विनंती.

टीप : लेखाबरोबर प्रकाशित केलेली सर्व प्रकाशचित्रे त्या दैनिकाने लेखाला जोडली आहेत. मी केवळ लेख पाठवला होता.

"योगा" ची बाजारपेठ (Yoga Inc. $ € ¥ £ ₹)

शब्दखुणा: 

योगासने...... एक नवा दृष्टीकोन

Submitted by अश्विनी कंठी on 16 May, 2021 - 23:07

Yoga is the journey of the self, through the self to the self …The Bhagwat Geeta.

त्या दिवशी माझी योगशिक्षिका मला म्हणाली की, “अश्विनी, तुला समवृत्ती प्राणायाम जास्त आवडतो ना, मग तू त्याचा जास्त सराव कर. त्यातूनच तुला तू समजत जाशील.” मला काहीच समजेना. मला मी समजत जाईन म्हणजे? प्राणायाम करून स्वतःची ओळख पटते? योगासनांमुळे शरीराला आणि प्राणायामामुळे मनाला होणारे फायदे मला माहीत होते. पण त्यातून तुम्हीच तुम्हाला उलगडत जाता ही कल्पना माझ्याकरता नवीन होती. हा नवा अर्थ समजून घेण्यास मी अतिशय उत्सुक होते. मी विचारात पडले की हे सगळे मला आधी कसे काय कोठून समजले नाही?

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - योग