संस्कृती
अखेरचा जय महाराष्ट्र
सण होता बळीपाडवा ॥ संगे दिवाळीचा गोडवा ॥ तव वार्तासंचार कडवा ॥ कानी आला अकस्मात ॥०१॥
घास अडके घशात ॥ चित्त न रमे कशात ॥ बाळासाहेबांचे मिषात ॥ भिरभिरी फिरे ॥०२॥
काटूनी लांबशी सडक ॥ गाठले 'मातोश्री' तडक ॥ जाळीतसे दाह कडक ॥ वाघक्षेम चिंतेचा ॥०३॥
भीष्म पडे शरपंजी ॥ की रामराजाची चंजी(*१) ॥ मांडली झगडाझुंजी ॥ साक्षात मृत्यूशी ॥०४॥
जीव होई इवलासा ॥ जरी ऐकुनी खुलासा ॥ दिलास लाभे दिलासा ॥ कसाबसा थोडा ॥०५॥
भाऊबीजेचा पै दिन ॥ दीन मन राहे खिन्न ॥ बेचव लागे मिष्टान्न ॥ सकल बंधुरायां ॥०६॥
दुसरे दिनी उत्साहक ॥ बातमी आणती वाहक (*२) ॥ वाटले चिंतेत नाहक ॥ पडलो असो की ॥०७॥
दीपावली
घराघरातून आळवू सारे चैतन्याचे सूर
चला लावूनि दीप करूया नैराश्याला दूर ।।
संस्कृती अपुली ही अतिप्राचीन
प्रकाशपूजा सांगे प्रतिदिन
पावित्र्याचे हे शुभलक्षण
'सत्य'प्रभावे कृष्ण संपवी इथेच नरकासूर ।।
पाने इथल्या इतिहासाची
पराक्रमाच्या कथा सांगती
कर्तृत्वाला प्रेरक ठरती
समृद्धीचे वर्णन सांगे तो सोन्याचा धूर।।
विज्ञानाला अध्यात्माची
जोड अचूक ही इथे लाभली
शाश्वत मूल्ये सदैव जपली
या मूल्यांना घेऊन जाऊ आपण जगती दूर।।
दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
कंदिलांचे आकाश
दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, रंगिबेरंगी रांगोळ्यांचा, गोडधोड खाण्याचा, पण दिवाळी आली की खरी रोषणाई होते ती कंदिला मुळेच, बाजारात अनेक रंगाचे ढंगाचे आकाशकंदिल बघायला मिळतात. पण लहानपणी कंदिलांची मज्जाच न्यारी होती. पतंगाच्या काडया, झाडू मध्ये भरीला घातलेल्या काडया, तर कधी बांबू उभा चिरुन त्या वेताच्या काठीने चांदणी बनवायची, त्यावर रंगीत पतंगाचा कागद लावायचा. हा पहील्या टप्प्याचा कंदिल, मग त्या काठ्यांचा विमानाचा आकार.. जहाजाचा आकार, कॉलनी मध्ये टांगायला भला मोठा कंदील. त्या नंतर आले जिलेटीन पेपर, मग थर्माकोल ह्या पद्धतीने कंदिल निर्मीतीला आणि कलात्मकतेला खुप वाव दिला.
तुम्ही किती व्यवस्थित आहात?
आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.
खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.
देवमाणसे अशीच भेटतात !!!
शनिवार दिनांक ३ नोव्हेंबर २०१२! सकाळी पावणे सातची वेळ. ९१९८१८८११२४९ या अनोळखी नंबरवरून मोबाईल घणाणला. मी आणि माझी पत्नी - अनुराधा दोघेही व्यावसायिक असल्याने असा अवेळी फोन आला तर आम्ही अनिच्छेनेच उचलतो; आणि अ-महत्वाच्या कारणासाठी फोन असेल तर त्या व्यक्तीला जाम झापतो. तसाच तो उचलला. अनुराधा त्या व्यक्तीशी बोलू लागली. "आप कौन बोल रहे हैं? कहांसे?" त्या व्यक्तीने काय उत्तर दिले ते ठाऊक नाही, पण लगेच अनुराधा चित्कारली, "ओह माय गॉड!! मैं अभी उसको बताती हूँ!" त्या व्यक्तीने परत काही उत्तर दिले. "क्या? उसका फोन भी उधर ही है? मैं कुछ करती हूँ!!"
"क्वार्टर ऑफ अॅन इंच" हेअरकट
सलून मधे खुर्चीवर जाऊन बसलो, "मिडियम", आणि भांग कोठून पाडायचा हे सांगून झाले, सलून मधली ती मुलगी तिच्या कामाला लागली, आणि मी आता वेळ कसा घालवावा विचार करू लागलो. भिंतीवरच्या फ्रेम्समधल्या हेअरस्टाईल्स आधीच बघून झाल्या होत्या. त्यातील एकही गेल्या दहाबारा वर्षातली दिसत नाही याचेही नावीन्य नव्हते. तेथे बसल्यावर तो घोस्ट वर्ल्ड का कशातील संवाद नेहमी आठवतो "The 80s have called and they want their hairstyle back". काही सलून्स मधे आरशात उलटा का होईना पण टीव्हीतरी दिसतो. येथे ते ही नव्हते. इतरही काही टाईमपास नव्हता.
सीमोल्लंघन
शमी ही श्री गणेशाची लाडकी वनस्पती. अज्ञातवासात पांडवांची शस्त्रे वर्षभर शमी वृक्षावर विसावली होती. याच शस्त्रांनी पुढे अन्याय - अधर्माचा नाश केला. म्हणून शमीचं महत्त्व आणखीनच वाढलं.
निरपेक्षपणे ज्ञानदान करणारे वरतंतू ऋषी, गुरुदक्षिणेचा आग्रह धरणारा त्यांचा शिष्य कौत्स, कौत्साच्या ज्ञानाचा गौरव करण्यासाठी कुबेराला आव्हान देणारा रघुराजा, रघूच्या पराक्रमाला मान देऊन सुवर्णमोहरांचा वर्षाव करणारा कुबेर, आपल्याला हव्या तेवढ्याच मोहरा घेणारा कौत्स, शिल्लक मोहरा लुटून टाकणारा दानशूर रघु, या साऱ्यांचा साक्षीदार म्हणजे आपट्याचा वृक्ष. याच वृक्षावर सुवर्णमोहरांचा पाऊस पडला होता.
मांजर, मी आणि 'तो'
पंधरा दिवसांपूर्वी घरात एक छोटे मांजर आले. साधारण दोन एक महिन्याचे असावे. आमच्या पूर्वीच्या मांजराने नवा घरोबा केला असल्याने या नव्या जिवाला आनंदाने ठेऊन घेतले.
मांजर अगदी घरचेच झाले आहे. व्य्वस्थीत खाते, खेळते आणि माझ्याबरोबरच झोपते. स्वतःची स्वच्छ्तही छान राखते. घरच्या एका कोपर्यात त्याने त्याची सोयही केलेली आहे. इतरत्र कोठे घाण करत नाही.
हे ते आमचे गोड बाळ...

शंभर वर्षांपूर्वीच्या वृत्तांकनाचे नमुने हवे आहेत
वृत्तपत्रांतून मराठी बातम्या वाचता येऊ लागल्या त्याला आता कित्येक वर्षं झाली. या काळात वृत्तांकनाच्या शैलीत चांगलाच फरक पडला. सुमारे शंभर वर्षांपूर्वी मराठी वृत्तपत्रांत ज्या बातम्या दिल्या जात असत ती भाषा आणि आजची भाषा यांत काय फरक आहे ते दाखवण्यासाठी जुन्या बातम्यांच्या मजकुराचे नमुने हवे आहेत. आंतरजालावर कुठे असे नमुने उपलब्ध असले तर कृपया इथे दुवे द्यावेत. टंकलेला मजकूर किंवा स्कॅन केलेली पानं यांपैकी काहीही चालेल. स्कॅन असेल तर मजकूर वाचता येईल इतपत दर्जा चांगला हवा.