अमेरिकेत भारतामधून आंबे मागवता येतील का?

Submitted by sulu on 3 April, 2012 - 15:39

अमेरिकेत भारतामधून विश्वासार्ह आंबे कोण पाठवते का? कृपया माहिती असल्यास कळवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदा आंब्याच पीक खराब आलय... विचार हि करु नका. असे मला एका विक्रेत्याने सांगितलेय. Proud

डझनाला १५०० असे मिळतायत...

मागच्या वर्षी देसाई बंधुंचे आंबे बाजारात होते. ह्या वर्षी तरी आत्तापर्यंत दिसले नाहीत.
mangopeti साईट वरुन फक्त भारतात आंबे पाठवता येतात (म्हणजे अमेरीकन चलन वापरुन भारतातील नातेवाईकांसाठी आंबे पाठवता येतील).
mangozz.com वरुन अमेरिकेत आंबे मागवता येतात. कसे आहेत ते माहिती नाही. त्यांची पहिली शिपमेंट अजुन आली नाही त्यामुळे कुणाला ऑर्डर करायची असेल तर त्यांना फोन करुन विचारा.

मागवणे इतके सोपे नाही. USFDA च्या नियमानुसार ठराविक नियमांची पुर्तता केलेले पदार्थांचीच आयात करता येते. देसाईबंधुंनी ह्या सगळ्या नियमांची पुर्तता केलेली असणार.

देसाइ बन्धु ची सुविधा वापरून गेल्या वर्शि सासर आणि माहेर च्या लोकांनी अमेरिकेत आम्बे पाठवले होते. सागळे च्या सगळे आम्बे आतुन खराब झालेले. टोट्ल ४ पेट्या आम्बे टाकले . फुकट नासाडी होते.
एकदा देसाइना मेल पाठ्वली फोटो काढुन तर त्यांनी आजून एक पेटी पाठ्वली. ती पण खराब निघल्यावर परत मेल पठवायची हिंम्मत केली नाही.
फार पाप लागल मला आम्बे टाकण्याचे.

Dont waste money and mangos. It doesnt work.

-Shireen

त्यापेक्षा थोडे जास्त पैसे पडले तरी अमेरिकेत अल्फान्सो म्हणजे हापूस अंबा मिळत असेल तर घ्यावा. माझाही अनुभव फार काही चांगला नाहीये. इकडे युके मध्येच मला अल्फान्सो बरे मिळाले. निदान जे काही होते त्यातले बरेच खाता आले नाहीतर भारतातून येणारे नक्की कसे असतील ह्याची खात्री देता येणार नाही. निघाले चांगले तर उत्तमच.

mangozz.com वरुन मागवलेले आंबे खुपच चांगले होते. मध्यम आकाराचे आंबे होते.
पिकण्यासाठी आणि कस्टम मधे लागणारा वेळ गृहीत धरुन त्यांनी भारतातुन पाठवले होते. शिपमेंट मिळाल्यावर लगेच १-२ दिवसात खाण्यायोग्य होते.
किंमत मात्र खुप वाटली Sad कदाचित दुष्काळ आणि अमेरीकेसाठी वेगळी प्रक्रिया इ. गृहीत धरल्यास कदाचित किंमत योग्य असेल.

आत्ता भारतातुन येताना काहि लोकांना आंबाच्या पेट्या लगेज बरोबर नेताना पाहीले. असे सामानाबरोब प्रवासात आणता येते का?

mangozz.com वरुन मी पण मागवले होते, पहिल्यांदाच मागवायचे म्हणुन ६च मागवले त्यातले २ खराब (थोडेसे) व्हायला लागले होते. पण बाकीचे ४ उत्तम आहेत.

नानबा, अजून आले नाहीत?
मी कालच रात्री ऑर्डर केले. आजची शिपमेंट डेट दाखवतायत. कधी येतील म्हणायचे? Wink
महागुरु, खरंच काहीच्याकाही महाग आहेत आंबे Uhoh

भाई, आम्ही $१०० देतोय शिपिंगला. पण एकदा ट्राय करुन बघू. पुढच्या वर्षी पासून आंब्याकरता सेव्हिंग करावं लागेल Wink

मी एक महिना अगोदर ऑर्डर केले होते. त्यावेळी मला फ्री शिपिंग दिले.
First Dilevery on 22nd April असे सांगितले. नंतर कळाले की २२ एप्रिलला भारतातुन शिप झाले. वाहतुकीला लागणारा वेळ आणि कस्टम मधे गेलेला वेळ ह्या मुळे आम्हाला १० दिवस अधिक वाट बघावी लागली.

काल अजुन एक मिळालेली माहिती:
एल.ए. जवळ कुठलेतरी इंडीयन ग्रोसरी स्टोअर आहे म्हणे. ते रत्नागिरी हापुस अमेरीकेत सगळी ऑर्डरप्रमाणे शिप करतात. मला ज्याने ही माहिती कळवली त्याला मागच्या वर्षी चांगला अनुभव आला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आंब्याचा आणि शिपिंगचा दर रास्त होता.

त्या दुकानाचे नाव माहिती नाही पण त्यांचा फोन नं. ५६२-८०९-९४३३ असा आहे.

पायोनिअर कॅश अँड कॅरी..आमचा अनुभव ठिकठाक आहे. गेले ३-४ वर्षे घेतोय आम्ही कधीतरी चांगले निघतात नाहीतर पैसे वाया.

सोनपरी, महागुरू ने उल्लेख केलाय तेच दुकान 'पायोनिअर कॅश अँड कॅरी' का ?

पेरू, सामनाबरोबर 'फळे' चालत नाहीत आणलेली. माझ्याकडे अगदी चुकून एक ऑरेंज राहिले होते बॅगेत. तर अमेरिकेत एअरपोर्ट वर बॅग चेक करताना बरोबर त्या बाईला दिसले. तिने बॅग उघडून सगळे सामान उलटे पालटे करून ते काढलेच बाहेर.

कुणाला अल्फान्सो हवे असतिल तर सांगा! सध्या इथे टोरोंटो मधे ईंडियन स्टोअर मधे दिसत आहेत हापुस आणि केशरच्या पेट्या. $२५-२६ अशी काहि तरि प्राईस पाहिलि.आंबे बघुन घेता येतात. फक्त मला त्यातले फारसे काहि कळत नाहि. न्युयॉर्क, फिलि वाल्यांसाठि आणु शकेन , सध्या कामाच्या निमित्ताने त्या भागात २-३ महिन्यातुन एकदा तरि ट्रॅव्हल होते, आणि बॉर्डरवर चेक नाहि होत जास्त काहि.

आम्हाला पण मागच्या वर्षी कॅनडा मध्ये खाता आले होते हापूस आंबे. अमेरिकेत जरा जास्तच रुल लावतात आंब्यांना Happy

Pages