''एकसाथ नमस्तेऽऽ!'' इयत्ता पहिली व दुसरीतील ती चिटुकली मुलंमुली आम्हाला वर्गाच्या दाराबाहेर पाहूनच एकसुरात आमचे स्वागत करू बघत होती. जुनाट वाड्यात भरणार्या त्या शाळेतील लाकडी तुळया, पोपडे उडालेल्या भिंतींवरच्या रंगीबेरंगी कागदी पताका, तक्ते, चित्रे व फळ्यांनी सजलेल्या भिंती, बुटक्या उंचीची बाकडी यांना आम्ही न्याहाळत असतानाच वर्गातल्या मुलामुलींची लगबग सुरु झाली होती. वर्गाच्या दारात आम्ही थबकलो. त्यांच्या त्या लगबगीला, उत्साहाला आणि निरागसतेला मनात आणि कॅमेर्यात साठवून घेऊ लागलो.
१० वी 'क' - भाग १
गावाहून आलो त्यादिवशीच मुंबईतला धुमशान पाऊस अनुभवायला मिळाला. रस्त्यावरचं साचलेलं गढूळ पाणी बाजूने चालणार्यांच्या अंगावर फराफर उडवत गाड्या पळत होत्या. ज्याच्या अंगावर पाणी उडायचं तो त्या गाडीवाल्याच्या अनेक पिढ्यांचा उध्दार करायचा. मला जाम हसायला येत होतं. कसेबसे धावतपळत आम्ही घरी पोहचलो. मुसळधार पाऊसातून येताना आमची बरीच दैना उडाली.
घरात पाऊल टाकल्या टाकल्या वडीलांना प्रश्न केला"अण्णा, पुस्तकं आणायला कधी जायचं?"
"जामिनाचे पैसे कोण भरतय?" पोलिसांनी मला विचारले.
"मी", मी उत्तर दिले.
पोलिसांनी माझ्याकडे निरखून बघितले. " कोण लागतो हा तुमचा?" मला प्रश्न विचारला गेला.
"मित्र ", मी उत्तरलो.
" जरा समजावा तुमच्या मित्राला", पोलिस ऑफिसर म्हणाले.
मी पैसे भरले, सही केली आणि जग्या बाहेर यायची वाट बघू लागलो.
साहित्य : कर्तव्याची जाणीव (१ किलो), चिकाटी (५ किलो), भरपूर वेळ (काढता येईल तितका), होडी आणि वल्ही (मी दोन वल्ही वापरलीयेत.)
सध्या आमच्याकडे पाचवीचा अभ्यास सुरू झाला आहे. गृहकार्यात हिंदी टीचरनं प्राणी आणि पक्ष्यांची हिंदी नावं गुंफून एक शब्दकोडं बनवायला सांगितलं होतं.
कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥
कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥
नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी
नुस्त्याच फळ्याला चौकट लाकडी...
मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर
सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥
शाळेत शिक्षक इकडे तिकडे,
यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे
का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे!
बि.ए. सोडुन दुसरा मार्ग,यांना परवडला होता का कधी?॥२॥
इथले विद्यार्थी,कोचिंगला जाती
घरचे सोडून,बाहेर खाती,इथल्यापेक्षा तिथेच जास्ती
कोचिंग क्लास का लागतात गोड,जणू जेवणातली लोणच्याची फोड..

पी. एच. डी नंतर देखील दोन वर्षे शिक्षण घेउन आता शिकायचे काही शिल्लक राहिले नाही, असे समजुन मी भारतात आल्यावर शिक्षकाची नोकरी पत्करली! पण त्या सहा महिन्याच्या कालावधीने एकुनच शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला 
लायकी नसणारे लोक शिक्षण संस्था चालक झाले कि काय होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. अन मग ठरवले, स्वतःच शिक्षण क्षेत्रात काही काम करायचे. जुने मित्र होतेच... एक प्रोजेक्ट नव्याने सुरु करत आहे!
नमस्कार,
सध्या शाळेत केजी पासुन मुलांच्या शाळेत आर्ट्स अँड क्राफ्ट एक्जिबिशन, सायन्स फेअर वै. होतात.
मुलांना शाळेतुनच विषय दिला असेल तर ठीक नाहीतर काय करावं हा विचार करतच वेळ जातो. आई वडीलही मुलांना त्यांचं अडेल तिथे मदत करतातच. इथे आपल्या मुलांच्या प्रॉजेक्ट्साठी काय काय बनवले/ ठेवले होते किंवा त्या साठी नव नविन आयडीयाज या गोष्टी शेअर करुयात.
सुरुवात करते माझ्यापासुन. मला कमित कमी खर्चात आणि अव्हेलेबल नॅचरल रिसोर्सेसमधे पण हुबेहुब आणि नॅचरल वाटाव्यात अशा वस्तु मुलाने बनवाव्यात असे वाटत होते. त्यामुळे मी त्याला तशाच आयडीया दिल्यात.
खरंतर शालेय शिक्षण आणि त्यावर बोलावे हा माझा प्रांत नव्हे. पण काल रचनाशिल्प या मायबोलीकरणीशी फोनवर २ तास झालेल्या गप्पांनंतर आजकालच्या शालेय शिक्षणावर प्रकाश टाकणारा एक धागा उघडावा असं राहून राहून वाटत होतं.