विहंग
वाटले मज आज होऊनी विहंग
उधळावेत रंग आसमंतातले..
घेतली भरारी पसरूनी पंख
उमटलेत तरंग बघ पाण्यावरी...
मिटलेल्या गच्च पापण्यांनी घेतली मी खोल उडी
केल्या भंग आज मी माझ्याच खोट्या ह्रडी...
न्याहाळतीये हे विश्व होऊनी विहंग
मीच मज संग का उरलेली?
अर्थ लावत मी या जगण्याचा
गाठते सुरुंग मनाच्या अंताचा..
गवसले मज आज होते जे हरवले
बांधिला आता चंग नव्या उम्मेदीचा!
- जान्हवी जोरी.
कलर पेन्सिल

जंगलातल्या मैत्रीची गोष्ट
भल्या पहाटेच बंटी आणि चिकू जंगलात आले होते. निमित्तही तसेच होते. मुंबईचे प्रसिद्ध पक्षीतज्ञ डॉ. सालीम अली त्यांच्या गावाला आले होते. सालीम अंकल (खरे तर आजोबा) त्यांच्या बाबांच्या परिचयातले होते. त्यामुळे सकाळी फिरायला त्यांनी ह्या दोन चुणचुणीत मुलांना सोबत न्यायचे कबुल केले होते. मुलांना थोडी भीती वाटत होती. कारण ते खूप म्हणजे खूपच मोठे शास्त्रज्ञ आहेत असे त्यांना पुन्हा पुन्हा बजावले गेले होते.
नुकताच माझा अमेरीकेतला नव्या नवलाईचा संसार सुरु झाला होता. काही कामानिमित्त बाहेर पडलो. रस्ता एका हाउंसिंग सबडिविजनमधून जात होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे छोट्या फुलबागा बहरल्या होत्या. मला सगळेच नविन त्यामुळे गाडीच्या खिडकीच्या काचेला अगदी नाक लावून बाहेर बघत होते. एका घराच्या पोर्चबाहेर काचेचे लाल झाकणाचे काहीतरी टांगलेले दिसले. पुढे गेल्यावर तसेच एका आवारातील झाडाच्या फांदीला देखील टांगलेले दिसले.
"ते झाडाला लाल झाकणाचे बाटली सारखे काय टांगलय?" मी कुतुहलाने विचारले.
"हमिंगबर्ड फिडर." रस्त्यावरची नजरही न हटवता नवर्याने उत्तर दिले. कुतुहल शमायच्या ऐवजी वाढले.
अंधश्रध्दा ही केंव्हाही वाईटच. या बद्दल कुणाचेच दुमत नाही. पण गेले काही वर्ष मी एका अंधश्रध्देची गोड फळे चाखतो आहे. मीच काय आमची सगळी सोसायटी या अंधश्रध्देमुळे खुष आहे.
या धाग्यात पक्ष्यांची फक्त उडतानाची प्रकाशचित्रे 
शेकाट्या (Black-winged Stilt )
आमच्या घराच्या परिसरात दिसलेल्या पक्ष्यांची ही प्रकाशचित्रं आहेत. जवळजवळ सगळीच प्रचि माझ्या कॅनॉन
पॉवरशॉट SX 430 IS या पॉइंट अँड शूट कॅमेर्याने काढलेली आहेत. या कॅमेर्याला ४५ x झूम असल्यामुळे लांबच्या पक्ष्याचाही फोटो बर्यापैकी स्पष्ट येतो.
ही मैना किंवा साळुंकी ( Common Myna)

१

2
दिवाळीतील पाडव्याचा दिवस होता. सकाळीच जाऊबाईंच लक्ष किचनच्या खिडकीतून बाहेर गेल आणि त्यांनी आधी मला हाक मारली लवकर ये म्हणून. मी समजले साप, पक्षी काहीतरी आल आहे. जाऊन पहाते तर बदामाच्या सुकलेल्या झाडावर घार बसली होती. ती एकदम शांतपणे उन खात बसली होती पण माझी मात्र कॅमेरा आणण्याची घाई झाली आणि धावत जाऊन कॅमेरा आणला. पण घार शांतपणे इकडे तिकडे पहात उभी होती. घारी बद्दल ती शिकारी पक्षी आहे, जमिनीवर भक्ष दिसल की लगेच खाली येउन उचलून नेते, पायांमध्ये भक्ष उचलून नेते, वार करते अस बरच लहानणापासून मारकुटा पक्षी असच माझ्या डोक्यात घारीबद्दल बसल होत.