मला एक मदत हवी आहे. (त्वरित)
माझा आत्तेभाऊ MS in Cybersecurity करण्यासाठी Saint Leo University Florida येथे जातो आहे. त्याच्या सुरूवातीच्या काही दिवसांसाठी (२३ ऑगस्ट २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१) राहण्याची खात्रीलायक सोय होऊ शकेल का? तिथले काही संपर्क मिळू शकतील का?
इथे हा प्रश्न अस्थायी असेल तर योग्य धाग्यावर हलवावा ही विनंती.
आगाऊ धन्यवाद.
माझ्यासाठी विंडो सीट बुक कराल का प्लिज एरेटॉसथिनिस काका? सायलीने पटकन आपला क्लेम लावला.
मला पण ... चिंट्याने सूर मिसळला. नेहा आणि सॅमीच्या मनातही हेच होत, पण स्वभावामुळे बोलले नाही इतकेच.
**************************
आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर... एरेटॉसथिनिस काकाबरोबर समद्वीभुज खंडाकडे जायला निघाले...
13 मे रोजी दु. 12:31 वा. पुण्यात तुमची सावली "गायब" होईल!
Fake news? खाली लिंक्स आणि सविस्तर माहिती दिली आहे ती बघा.
**************************
To every problem, there is a most simple solution. हे चिंट्या जितके सहज म्हणाला, तितके सहज उत्तर मिळेल याची कुणालाच खात्री नव्हती. पण शोधले तर पाहिजेच! त्याशिवाय गत्यंतर नव्हते...
**************************
गोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा
**************************
“मला तर वाटलं भूत काका मुलांना छळायला फक्त गणिताचेच प्रॉब्लेम विचारतात! ही काय नवीन गेम टाकताहेत?” चिंट्या वैतागून म्हणाला ... मुलांना यंदा प्रश्नच समजत नव्हतं. पुन्हा पुन्हा वाचत होते... अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते... काय करायचं आहे आपल्याला? ...
माझी गाडी SMART Objectives वर कशी आली? वेळ चांगला जावा म्हणून नवीन शैक्षणिक धोरण चक्क पूर्ण वाचले (कोरोना काळात ...!). त्यातल्या एका परिच्छेदाने लक्ष वेधले.
बरेच लोक म्हणतात की मातृभाषेतून शिक्षण घेतले तर लहान मुलांना फंडामेंटलस चांगले कळतात. म्हणजे याचा अर्थ असा की पुढे चालून मुले चांगले करियर करतात. माझे जवळपास 20 असे मित्र आहेत जे आयुष्यामध्ये आज उत्तम डॉक्टर, इंजिनीयर, कार्पोरेट लीडर, बिझनेस मन, वैज्ञानिक, जर्नलिस्ट अशा विविध क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. या मधले बरेच लोक अगदी लहानपणापासून मराठी असून देखील इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. मग मला प्रश्न पडलाय ही खरंच आपण म्हणतो की लहान मुलांनी मातृभाषेत शिकावं हे खरोखरच सायटीफिकली सत्य आहे का?
२०२० साली नवे शैक्षणीक धोरण जाहीर झाले आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
आतापर्यंत कळलेले काही ठळक मुद्दे:
- ५वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषा किंवा राज्याच्या अधिकृत भाषेमधुन.
- वैद्यकीय व कायदा वगळता ईतर सर्व उच्चशिक्षणासाठी एकच केंद्रीय मंडळ.
- उच्चशिक्षणामधे अनेक एग्झिट पॉईंटस - उदा - १ वर्षी बाहेर पडल्यास सर्टीफि़केट, २ वर्षे डिप्लोम , ३ वर्षे डीग्री ई.
- १०/१२ बोर्ड परिक्षा रद्द (unverified)
- १०+२ ऐवजी आता ५+३+३+४
- भाषांतर व भाषा यासाठी नवी संस्था. संस्कृतवर भर.
- सहावीपासुन कोडींग शिकवणार
यावेळी मी खरगपूर स्टेशनवर उतरल्यानंतर आयआयटी कॅम्पसला ऑटोने नव्हे तर सायकल रिक्षातून जायचे ठरवले. पहिल्यांदा एडमिशन साठी आले होते तेंव्हा सभोवतालचे दृश्य पाहून फार छान वाटले होते. पण बरोबर आई आणि माझ्या चार मोठ्या बॅगा, म्हणून टॅक्सी केली होती. त्याच वेळी ठरवले की पुढच्या वेळी एकटी असेन तेंव्हा स्टेशन ते कॅम्पस सायकल रिक्षाची मजा लुटू. मी स्टेशनबाहेर पडले तेव्हा समोर पार्कच्या बाहेर बऱ्याच रिक्षा उभ्या होत्या. मी एका रिक्षेकडे वळले आणि पाठमोऱ्या असलेल्या त्याला विचारले," तुमि की आमाके आयआयटी निये आबे..?" रिक्षावाल्याने माझ्याकडे वळून पाहिले, आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. सदानंद!