शिक्षण

नोकरीच्या शोधात..

Submitted by बुन्नु on 30 November, 2019 - 09:42

माझा एक मित्र आहे जो सध्या नोकरीच्या शोधात आहे. या मित्राचे शिक्षण कलेच्या क्षेत्रात झालेले आहे. त्यांनी आर्ट स्कूल मधून पदवी घेतलेली असून काही वर्ष चित्रकला, आर्ट अँड क्राफ्ट साठी चे मार्गदर्शन क्लासेस चालवले. त्याच बरोबर जिल्हा परिषदेच्या शाळेत कला शिक्षक म्हणून काम केले. म्हणजे शिकवण्याचा अनुभव आहे.
गेले काही वर्ष त्यांनी स्वतः चा इंटेरियर डिझाईन चा व्यवसाय सुरू केला होता.

झोप येऊ नये म्हणून उपाय

Submitted by रे on 25 November, 2019 - 07:44

माझी मुलगी या वर्षी दहावी ला आहे पण वर्ष संपत आले तशी तिची झोप अनावर होत आहे.... सतत झोप येते , कुठे ही बसली तरी पेंगते बेड ची गरज आहेच असेही नाही .... कृपया उपाय सुचवा सुट्टी च्या दिवशी 8 नंतर उठते , बाकी दिवस 6 ला, सकाळची शाळा आहे.

रात्री जागत नाही 11 पर्यंत सगळे झोपतो, अभ्यासच होत नाही जबरदस्ती बसवले तर फिके दुखायला लागते.....
काय करू .... खुप टेन्शन आले आहे

जपान मध्ये शिकण्याच्या आणि करियरच्या संधी

Submitted by Ashwini_९९९ on 19 November, 2019 - 23:40

B.E. (IT) पास स्टुडण्टला जपानमध्ये करियरच्या काय संधी आहेत ?
जपानी भाषा शिकून झाली आहे. पुण्या मध्ये याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या काही इन्स्टिटयूट आहेत का?

आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

Submitted by हर्पेन on 16 November, 2019 - 05:16

नमस्कार मंडळी ,

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मैत्री संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. २००१ मधे झालेला भुज भूकंप, २००४ मधे आलेली त्सुनामी, २००९ मधे लेह येथे ढगफुटीमुळे अचानकच आलेला पूर, नेपाळमधील भूकंप, २०१३ मधे उत्तराखंड राज्यात आलेला त्यानंतरचा केरळ राज्यातला आणि ह्यावर्षीचा आपल्या महाराष्ट्रातला महापूर अशा अनेक वेळप्रसंगी मैत्री संस्थेने आपत्ती व्यवस्थापन, स्थानिकांना मदत आणि पुनर्निर्माण कार्यामधे सहभाग घेतला आहे.

आनंदिले मन, शिकविता जर्मन… (माझे जर्मन शिकविण्याचे प्रयोग)

Submitted by केदार जाधव on 15 November, 2019 - 00:47

जर्मन शिकण्याची आवड मला कधीपासून वाटू लागली, तेच मला आठवत नाही. अगदी आठवी किंवा नववीत असताना कुठूनतरी “जर्मन शिका मराठीतून” टाईपची पुस्तके मिळवून “आईन्स, त्स्वाय “ शिकलेले आठवते. पण इचलकरंजीसारख्या ठिकाणी शिकण्याची साधने (त्या काळात तरी) बरीच मर्यादीत असल्याने ते राहूनच गेले. त्यानंतर नोकरीमध्ये थोडा स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा एकदा प्रयत्न केला खरा, पण २००८ सालची आर्थिक मंदी आली, अन्‌ नोकरी वाचवण्यासाठी बेंगलोरला पळावे लागले. पण मे २०१५ मध्ये मात्र योग जुळून आला आणि मला ‘गोएथे इन्स्टीट्यूट’, मॅक्स मुलर भवन, कोरेगाव पार्क इथे सकाळी सात ते साडेआठ या वेळेतील बॅचला प्रवेश मिळाला.

विषय: 
शब्दखुणा: 

ध्येयवेडा माणूस (गझल)

Submitted by @गजानन बाठे on 20 September, 2019 - 11:52

ध्येयवेडा माणूस (गझल)
स्वप्नात जगण्याचा अधिकार मला आहे,
कोण जाणे काय नशा, भिजण्यात मला आहे.

वेचूनी चांदणे मी ओंजळीत घेत जातो,
दिव्यापरी कधी का जळण्यात मजा आहे.

दिसली कधी फुले की परडीत त्यांस घ्यावे,
जाई, गुलाब,जुई, गंधात मर्म आहे.

फुलपाखरू मुले ही, संचार मुक्त राहो,
हरवून मी स्वतः ला हरण्यात गर्व आहे.

बांधूनी देऊळे ही ,दगडात भाव पाहे,
जोडलीत माणसे मी माणसात देव आहे.

स्वप्नात जगण्याचा अधिकार मला आहे,
कोण जाणे काय नशा, भिजण्यात मला आहे.

गजानन बाठे

विषय: 

आयकार्ड

Submitted by मिलिंद जोशी on 5 September, 2019 - 04:32

काल टीव्हीवर कुठलासा चित्रपट पहात होतो. चालू असलेल्या सीन मध्ये साध्या वेशात असलेला नायक दोन हवलदार घेऊन नायिकेच्या घरी जातो आणि आपण पोलीस असल्याचे सांगतो. तो साध्या वेशात असल्यामुळे अर्थातच नायिकेचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. ती त्याला त्याचे आयकार्ड मागते. त्याच्या चेहऱ्यावर आधी ‘आपल्याला आयकार्ड विचारणारी ही कोण?’ असे काहीसे भाव उमटतात, पण काही क्षणातच त्याचा चेहरा हसरा बनतो. तो आपल्या खिशातून आयकार्ड काढतो आणि अगदी फिल्मी स्टाईल मध्ये नायिकेसमोर धरतो. प्रसंग अगदी साधा. पण तो नायक ज्या पद्धतीने आपले आयकार्ड दाखवतो हे पाहून मला माझे पहिले आयकार्ड आठवले.

विषय: 

सेक्स एज्युकेशन/लैंगिक शिक्षण

Submitted by मुक्ता.... on 28 July, 2019 - 13:24

सेक्स एज्युकेशन/लैंगिक शिक्षण

अवांतर वाचन बऱ्याचदा काही तरंग मनात निर्माण करतं. आणि मग मन म्हणतं की या विषयी आता लिहायलाच हवं.

एका गंभीर आणि सहज न बोलल्या जाणाऱ्या विषयावर लिहिण्याचा प्रयत्न करतेय. संभाळून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रिया मोकळेपणाने द्या.

एका शिक्षकाचा बदला

Submitted by Dr Raju Kasambe on 26 July, 2019 - 07:35

एका शिक्षकाचा बदला

“कुणी केली ही खोडी? हा खोडसाळपणा कुणाचा?”
शिक्षकांनी दरडावून विचारले. त्यांच्या आवाजात करारीपणा होता. नजरेत जरब होती. वर्गातील सर्व मुलं जागेवरच उभी राहिली. काही तर थरथरत होती. सर्वांच्या माना खाली झुकलेल्या होत्या. आज पुन्हा कुणीतरी मधल्या सुट्टीत फळ्यावर किचाडून ठेवले होते. त्यावेळेत बहुतेक मुलं लघवीसाठी आणि पाणी पिण्यासाठी जात असत. मीसुद्धा त्यापैकीच एक होतो. त्यामुळे वर्गखोलीत काय घडले किंवा कुणी केले याची मला सुतराम कल्पना नव्हती.

Pages

Subscribe to RSS - शिक्षण