भरतातल्या शाळा वर्षाच्या मध्ये म्हणजे ़जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये मुलांना अॅडमिशन देतात का? अमेरिकेतून काही लोक शैक्षणिक वर्षाच्या मधल्या कालावधीत भारतात परत जात आहेत, त्यांची मुले पहिली ते आठवी या इयत्तां मधली आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर ला भारतात परत जायचे असेल तर भारतातिल एक टर्म तेव्हा पूर्ण झालेली असते अश्यावेळी भारतातल्या शाळांमध्ये प्रवेश मिळू शकतो का ? की विद्यार्थ्या चे वर्ष वाया जाउ शकते ? कुणाला काही माहीती किंवा अनुभव असल्यास जरूर कळवा.
मातृदेवो भव, पितृदेवो भव पाठोपाठ समाजात आचार्य अर्थात शिक्षक श्रेष्ठ. 'आचार्य देवो भव' असं विशेष स्थान शिक्षकांना आहे. गुराख्याचा पोर असणार्या चंद्रगुप्ताला आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या आधारे चाणक्याने चक्रवर्ती सम्राट बनवलं. अलिकडच्या काळात एक शिक्षक या राष्ट्राच्या सर्वोच्च पदावर पोचला होता. पाच सप्टेंबर हा दिवस या शिक्षकाचाच जन्मदिन. हा शिक्षक म्हणजेच आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन.
प्राथमिक शाळेत शिकलेलं गणित - "गणू कडे १० आंबे होते. त्यातले ६ नासके निघाले तर गणूला किती आंबे चांगले मिळाले?" आणि मग १०-६ करुन उत्तर लिहीलं जातं "गणूला ४ चांगले आंबे मिळाले." आपल्या आजुबाजुला भ्रष्टाचारी, फक्त आणि फक्त स्व:हिताचाच विचार करणारी, स्वार्थी, सत्तांध अशी प्रत्येक क्षेत्रातली माणसं नासक्या आंब्यांप्रमाणे दिसत असताना, चांगुलपणाचा वसा घेतलेल्या माणसांमुळे मग ती भलेही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी का असेनात असल्यामुळेच केवळ संपुर्ण समाज वजा भ्रष्टाचारी ह्या वजाबाकीने अजून तरी समाजात "शुन्य" अवस्था आलेली नाहीये.
शालेय अभ्यासात उपयोगी पडणार्या बेवसाईटस आणि पुस्तकं यांची नोंद या धाग्यावर करावी.
आयुष्याचे विषय
इतिहासातील तह-कलमांनी
मनात गुंता झाला
टुंड्राच्या अभ्यासाने
भुगोल वेडा झाला!
बीज-गणितातील "क्ष" ही
राक्षसातील वाटून गेला
नाते त्रिज्येशी भूमितीत
परिघाशी "पाय" अडला !
गणितातील शून्याचे
असेच काही झाले
गुणपत्रिकेतच त्याचे
स्थान पक्के झाले!
हायड्रा अमीबा प्राणीशास्त्रातले
भिंगातूनही ना दिसले
अल्गी-फंगी वनस्पती कां ते
शास्त्रानेही ना सांगितले !
शाळेचे ना कुठल्या विषयाचे
आयुष्याशी नाते होते
आयुष्याचे सगळे-सगळे
विषय वेगळे होते !
"माझ्या मर्यादा समजून घे..." - तू म्हणालास... आणि बास!
माझ्या सगळ्याच प्रश्नांना तू तुझ्या मते उत्तर दिलेलं होतंस.
ते प्रश्न तुझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच.
खरंतर बरं झालं. तसंही ते प्रश्न तुझ्यापर्यंत पोचण्याची शक्यता नव्हतीच.
ते ओठांतून निघाले अन् हवेत विरून गेले. डोळ्यांतून निसटले अन् मातीत मिसळून गेले. स्पर्शातून झरले अन् भलत्याच आगीत जळून खाक झाले.....!
सगळेच या पाच भूतांनी मिळून गिळून टाकायचे आहे म्हणा... पण माझ्याच शब्दांनी माझ्याशी असे वागावे?
असो.
तुझ्या मर्यादा!