आगळ्या वेगळ्या प्रावासाची माझी आवड मायबोली च्या वाचकांना आता थोडीफार माहीत आहे. पण तसेही ट्रीप म्हटल्यावर सर्वांना उत्सुकता वाटतेच. प्रत्येकाची प्रवासाची आवड निवड वेगवेगळी असते तशा प्रत्येकाच्या प्रवासाच्या मर्यादाही ठरलेल्या असतात. सहसा आपण त्या मर्यादा पार करून कुठचा प्रवास करायला बघत नाही. पण अशा प्रवासाबद्दल आपल्याला कुतूहल मात्र असते. अनेकांना माझ्या प्रवासाची गोष्ट खूप विचित्र वाटली असेल. पण आपल्या माहितीत नाहीत असे अनेक भन्नाट प्रवास लोक करत असतात.
"काय त्रास आहे!"
"कशाला निघालो इतक्या सकाळी बोंबलत?"
"ह्यांना सक्काळी सक्काळीच कशाला बस काढायची असते काय माहिती..."
"अॅपवर टॅक्सीही दिसत नाही जवळपास!"
असे अनेक उद्गार मनात अंधाराच्या पार्श्वभूमीवर उमटत होते, आणि मी मुकाट सामानासकट पंढरीची वाट चालावी तसा 'देह जावो अथवा राहो' म्हणून चालत होतो.
पण खरंतर थोडं मागे जाऊन सुरवात करायला हवी. सरळ छोट्या खयालाला हात घालून कसं चालेल? आधी आलापी, मग काय ते बडा खयाल, स्थायी, अंतरा वगैरे करून मगच हे. त्यामुळे आपण थोडं मागं जाऊ.
मी मार्चमध्ये पुण्यात मुलाकडे सहज गेले आणि तिथेच अडकले लाँकडाऊन मुळे.9 मेला रात्री 9:00 वाजता आम्ही दोघे कारने पुण्याहून निघालो. पूणे शहर ,चाकण, शिरूर, औरंगाबाद, जालना, सिंदखेडराजा, सुलतानपूर, मालेगाव,वाशिम, अमरावती, नागपूर असा प्रवास करत दुसर्या दिवशी साडेअकराच्या सुमारास घरी पोहचलो
ड्रायव्हर गोरोबा टेकाळे (पुणे) अतिशय निष्णात ,गंभीर व्यक्तीमत्व. त्यांच्याशी गप्पा करत आम्ही सुखरुप पोहचलो.