मित्राच्या कामासाठी मी अब्दुललाट गावामध्ये आलो होतो. त्यावेळी त्याचे घर शोधत आलो. त्यांनी नवीन भाड्याने घेतले होते हे घर ! अब्दुललाट गावाच्या बाहेर एका धरणग्रस्त वसाहतीमध्ये घेतलेले हे घर शोधत आल्यानंतर मला जाणवले की, इथल्या लोकांनी त्यांचं धरणग्रस्त गाव आहे तसं आणि त्याच्या संस्कृती आणि राहण्याच्या बारकाव्यांसकट वसवलं आहे. त्याचं कारण म्हणजे जेव्हा त्या भाड्याने घर घेतलेल्या जागेची मालकीण, एक आजीबाई; ती माझ्याशी बोलली की, आम्ही काळम्मावाडी धरणाच्या भागातले. या गावाचं नाव कोनोली ! गावाबाहेरच अब्दुल लाट आणि लाटवाडी गावच्या रोडवर एक गांगोबाचे ग्रामीण देवस्थान आणि त्याच्या मागे गणपतीचे मंदिर.
25 जानेवारी 2021
कोल्हापूरच्या दक्षिणेकडील कर्नाटकच्या बेळगाव सरहद्दीला असणारा आजरा, गारगोटी, चंदगड, गडहिंग्लज हा तालुक्यांचा पट्टा फार वेगळा आहे. म्हणजे इथली अजूनही टिकून राहिलेली वनसंपदा, तिथले सह्याद्रीचे कमी-अधिक उंचीचे पठारे डोंगर भाग आणि तुलनेने थंड आणि अल्हाददायी हवा.
अशा गावी मी सांगलीतून ए एच - 47 पार करत पुढे छोटी मोठी घाटी, गावे व दोनदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा ओलांडत पोहोचलो. संध्याकाळी उत्तूर गावातील एका महादेव मंदिराचा माग गुगल मॅप व स्थानिक गावकऱ्यांना विचारत शोधून काढला.
कोल्हापुरातील बावड्याची मिसळ :- एक अनुभूती
खिद्रापूर
कडाकणी-- नुसतं नाव घेतलं तरी गरम गरम चहा आणि प्लेट मध्ये कडाकण्यांची चळत डोळ्यासमोर आली. कोल्हापूर बीबी वर रोजच्या गप्पा मारताना अचानक कडाकण्याचा विषय निघाला. सगळं लहाणपण डोळ्यासमोरुन जाऊ लागलं..
कोल्हापुरला आमची १२-१३ घरांची गल्ली. दसरा जवळ आला की घरातले सगळं झाडणं-पुसनं करून जीव मेटाकुटीला आलेला असायचा. एक आणि एक भांड आणि एक आणी एक कपडा धूऊन काढंण काही खायचे काम नसायचे. अगदी माळा पण लख्ख व्हायचा. पण हा सगळा शीण कडाकणी नाव काढताच् रंकाळा/कळंबा तलावाच्या पल्याड पळुन जायचा....
काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये गप्पा मारता मारता कोल्हापूरचा विषय निघाला आणि मला माझी ३ वर्षापूर्वी केलेली कोल्हापूरची भटकंती आठवली. त्याच भटकंतीचे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करण्याचा मोह आवरला नाही. :). चार दिवसात भरपूर भटकलो तरीही सिद्धगिरी म्युझियम राहिले (आम्ही संध्याकाळी ६:३० वाजता गेलो आणि ते ७:३० ला बंद होणार होते :(). जेंव्हा गेलो तेंव्हा रामनवमी असल्याने तांबडा/पांढरा रस्सा न खाताच यावे लागले. :(.
आता खास कणेरी मठाला भेट देण्यासाठी आणि तांबडा/पांढरा रस्सा खाण्यासाठी तरी परत एकदा कोल्हापूरची भटकंती करायला पाहिजेच.
भाड्याने देणे अाहे. १ खोली अॅटॅच...
मित्रहो,
कोणी जर कोल्हापुरला फिरायला जात असेल तर त्याला काय काय बघाव ह्याची