भाग २: https://www.maayboli.com/node/86965
प्रवास सुरू झाला आणि इकडे आमचं रूटिन चालू झालं. आज शिवाजीनगरला जायचं म्हणून मी कॉलेजात अर्धा दिवस सुट्टी घेतली होती. शिवाजीनगरहून घरी आले, आवरलं आणि कामावर गेले. नवरा दुपारी ताईकडे पोहचून मग खाऊ एक्सचेंज, ताईसाठी दिलेला खाऊ आठवणीने तिला देणं, तिच्याकडचा खाऊ बॅगेत घेणं, केबिन बॅग-चेक इन बॅग वगैरे सामानाची शेवटची बदलाबदली हे सगळं करणार होता. एक हात फिरवून सामान नीट भरून लगेच संध्याकाळी राजधानी गाठायची होती.
(डिस्क्लेमर : या भागात काही दुकानांची नावं मी लिहिली असली तरी तो फक्त तयारीचा भाग म्हणून सांगायच्या ओघात ती लिहिली आहेत. कोणत्याही दुकानाची जाहिरात नाही. माझा कोणत्याही दुकानाशी संबंध नाही.)
भाग १: https://www.maayboli.com/node/86961
(डिस्क्लेमर : हिमालय, कैलास हे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे घटक आहेत. सर्वार्थाने उत्तुंग! तिथे अनेक कारणांनी लोक जातात आणि त्या सगळ्यांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. मला हे या जन्मात तरी नक्की झेपणार नाही हे मी पूर्ण ओळखून आहे. पण तयारी करताना तो मानस-प्रवास घडत गेला आणि लिहावंसं वाटलं. कुठे काय घेतलं, काय तयारी केली, मग आपलं माणूस सुखरूप परत येईपर्यंत काय अवस्था झाली या सगळ्याचं हे वर्णन आहे. काही ठिकाणी थोडंफार गमतीचं, कधी तणावाचं, कधी हतबलही वाटणारंही आहे. पण कुणाच्याही श्रद्धा/ धार्मिक भावना यात दुखवायच्या नाहीयेत, आणि कुणाच्याही उत्साहावर विरजण घालयचं नाहिये.
एक कबुली सुरवातीलाच देते. मी आस्तिक किंवा नास्तिक दोन्हीही नाही. किंबहुना
सोयीस्करपणे दोन्हीही आहे. आस्तिक असणं तुलनेनं सोपं असतं. एखाद्या सर्व-शक्तिमान ठिकाणी श्रद्धा ठेवून त्या शक्तीवर विश्वासानं सगळं काही सोपवलं की आपण निर्धास्त. अशा वेळी विरोधी भूमिका घेणा-यांकडे पाठ फिरवून त्यांना हुर्र्ऽऽऽ करायला जमलं की झालं. पण तरी कधी काही चुकार प्रश्नांचे भुंगे सतावतात, कोड्यात टाकतात, त्रास देतात, आपल्या श्रद्धास्थानाच्या अस्तित्वावर शंका घेण्यास भाग पाडतात.
नमस्कार मित्रांनो,
या गणपतीत आंबोली ते कर्नाटकातील मुर्डेश्वर, गोवा मार्गे गाडीने जायचा बेत आखत आहोत. जाताना वाटेत लागतील ती प्रेक्षणिय स्थळे पाहात, आवश्यकतेनुसार मुक्काम करत जायचे असा दोन-तिन दिवसांचा प्रवास करणार आहोत.
मुर्डेश्वर, गोकर्ण इतके माहिती आहे. जायच्या वाटेवर कारवार, अंकोला वगैरे मोठी शहरे आहेत. बाकी इतरही पाहण्यासारखे असेल.
कृपया आंबोली-गोवा - कारवार-अंकोला-मुर्डेश्वर मार्गावरच्या पाहण्यालायक जागा, चांगले होमस्टे व खादाडीच्या जागा सुचवा.