पुण्याहून सिकंदराबादपर्यंत शताब्दी एक्सप्रेसने प्रवास करण्याचा बेत नुकताच आखला. दिवस निश्चित केला. मधला दिवस असल्याने आणि परीक्षांचे दिवस असल्याने आरक्षणही भरपूर शिल्लक होतं. शताब्दीतून फेरफटका मारायचा असल्याने पहाटे पुण्याहून निघून लगेच त्याच गाडीने परत पुण्यात यायचं होतं. असं मागं दोनवेळा केलेलं होतंच. अशा प्रवासानंतर खरंच प्रचंड उत्साही आणि समाधानी वाटतं. या दोन्ही बाबी इतर कशातूनही मिळतील असं मला वाटत नाही.
प्रेमाची ती गोष्ट.. part 1
हो मला हा प्रश्न कधी पासून विचारायचा होता. म्हणजे जाणून घेण्याची उत्सुकता होती . तशी मी गेल्या दोन तीन वर्षांपासून जास्त प्रवास करतेय . किव्वा प्रवास करायला सुरवात केली . त्याच्या आधी खूप कमी प्रवास करत होते . त्यामुळे त्यावेळी सरधोपट ड्रेस च्या घड्या करून टॉप्स चा घड्या करून थोडक्यात सगळे कपडे घड्या करून एकावर एक ठेऊन सगळ्या बॅगा भरत होते. त्याव्यतिरिक्त ज्वेलरी ठेवण्याकरता , कॉस्मेटिक्स/ प्रसाधन साहित्य ठेवण्याकरता दोन वेगवेगळे ट्रान्सपरंट पाऊच वापरले कि झालं .
आपल्याकडे हिंदी मध्ये एक म्हण आहे . आसमान से गिरा और खजूर मे अटका . माझे तसेच काहीसे झाले म्हणजे मी नवीन वर्षाची
शकुनाची ट्रिप म्हणून Tokyo वरून Cape Town ला जायला emirates ने निघालो आणि दुबईत येता येता उशीर झाला.
मग काय emirates च्या कृपेने अरेबिअन पाहुणचार घ्यायला तयार झालो. (अल दुबई , अल खजूर आणि अल पाहुणचार )
थोडक्यात अस्मानातून उतरलो आणि दुबईत अडकलो आता दुबई आणि खजूर एकच कि .
माझ्या अरबस्तानाविषयी काही समजुती होत्या .
समाजातल्या अनेक रूढी, परंपरा आणि प्रथा वर्षानुवर्षे चालत आल्यामुळे त्यांना एक प्रकारचं अमरत्व प्राप्त झालेलं असतं. काल बदलतो, वेळ बदलते पण माणसांच्या मनात त्यांचं स्थान अबाधित राहतं. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सगळ्या रूढी-परंपरांचं ओझं हस्तांतरित होत असतं. त्या रूढी-परंपरांचा मूळ उद्देश मधल्या मध्ये एक तर अर्धवट हस्तांतरित होतो किंवा पूर्णपणे विस्मृतीत जातो आणि एखाद्या पिढीत निपजलेला एखादा बंडखोर त्या सगळ्याला तर्कांच्या आधारावर आव्हान देतो. हा तर्कवादी दृष्टिकोन अनेकांच्या पचनी पडत नाही.
भूतांच्या गोष्टी
खरं सांगायचं तर माझा भूतांवर अजिबात विश्वास नाही. पण ज्या काही घटना घडतात त्याचे आपल्या जवळ स्पष्टीकरण नसते. मग आपल्याला पटेल ते स्पष्टीकरण आपण स्वीकारतो. त्यातील एक म्हणजे भूतांचे अस्तित्त्व.
मला तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमात असे शिकविले गेले की कुठल्याही गोष्टीचे त्यावेळेसचे सर्वात जास्त स्वीकारले गेलेले स्पष्टीकरण म्हणजे ‘सत्य’ असे मानले जाते. पण खरे ‘सत्य’ तेच असेल ह्याची शाश्वती देता येत नाही. कारण काही दिवसांनी आणखी कुणी तरी त्याचे आणखी चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण देतो आणि आपण त्याला सत्य मानायला लागतो.