सुंदर

अंकुर बालवाडी

Submitted by नादिशा on 6 September, 2020 - 12:58

स्वयम जेव्हा 2.5 वर्षांचा झाला, तेव्हा त्याच्यासाठी मी बालवाडीचा शोध सुरू केला. मी "पालकनीती "मासिकाची सदस्य होते. "जडणघडण "पण माझ्याकडे नियमित यायचे. दिवस राहिल्यापासून मी मुलांसाठीचेच वाचन करत होते.रेणूताईंचे "कणवू "पुस्तक, नामदेव माळींचे "शाळाभेट "ही तर माझी खूप लाडकी होती . रेणूताईंची सगळीच पुस्तके पालकांसाठी उत्तम आहेत. त्यामुळे आपण स्वयमला शिस्त लावण्यासाठी नाही, तर त्याला explore करण्यासाठी, फुलवण्यासाठी शाळेत घालायचे आहे, हे माझ्या मनात ठाम होते.

विषय: 
शब्दखुणा: 

काही स्वप्नवत वर्षे

Submitted by रेव्यु on 7 September, 2019 - 09:51

अविस्मरणीय परवानू –
आयुष्यातले कांही दिवस ,कांही वर्षे मनात एक आपले घर करून जातात्,अश्या स्मृती सोडून जातात, चंदनाच्या खोडाप्रमाणे असा दरवळ सोडून जातात की उर्वरीत आयुष्य आपण त्यांच्यावर जगतो.

या गत आयुष्यातील मनोहारी कप्पा म्हणजे परवानू.परवानू म्हणजे फक्त एक गांव नाही.त्या गांवातील आमच्या वास्तव्याला एक चरित्र आहे,एक बाज आहे,एक साज आहे ,एक नजाकत आहे अन पहिल्या पावसात भिजलेल्या मातीचा गंध जसा वेळोवेळी मुग्ध करून जातो तसा या गावचा स्मृतीगंध आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

सुंदर...एक सुंदर सहृदयी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 11 December, 2018 - 08:43

सुंदर...एक सुंदर सहृदयी

त्याचे नाव सुंदर हरिहरन पण आमच्यासाठी तो फक्त सुंदर. नावातच त्याच्या स्वभावाचं सौंदर्य ठळकपणे व्यक्त व्हायचं. एखाद्या स्वच्छ सुंदर निर्झरा सारखं खळाळून हसायचा तो. माझ्या बाजूच्या केबिनमध्येच तो बसायचा. तो ऑफिसमध्ये आला आहे याची खबर मला त्याचे खळाळते सातमजली हास्य द्यायचे. कोणी काही विनोद केला तर ही मनमुराद दाद मिळायची. त्याचे खळाळते हास्य त्याच्या निर्मळ मनाचा आरसा होते. कधीही ओठात एक आणि पोटात एक अशी गोष्ट नसायची.

त्याला कधी काही पोटात ठेव सांगायचं म्हणजे बर्फाने वितळू नये अशी अपेक्षा ठेवणं.

शब्दखुणा: 

खरंच तु खुप सुंदर दिसतेस...

Submitted by Nikhil. on 7 November, 2017 - 08:58

पांढऱ्या डिओवर जेव्हा तु
पाढऱ्या कलरची साडी नेसतेस
खरं सांगु एखादी देवदुत वाटतेस

पण ते तर सर्वांच भलं करतात
तु सर्वांना घायाळ करुन जातेस
तशी काळ्या साडीतही तु खुप सुंदर दिसतेस.

साडीचा पदर तु उजव्या हाताला गुंडाळतेस
प्रत्येक सिग्नल ला घड्याळाकडे बघतेस
त्या निमित्ताने आरश्यात हळुच स्वत्:ला पाहतेस

अचानक जेव्हा सिग्नल हिरवा होतो तेव्हा
स्टार्टर मारायचा सोडुन हॊर्न् जोरजोरात दाबतेस
खरं सांगु घाबरल्यावरही तु खुप छान दिसतेस

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सुंदर