साहित्य

दंभ - १

Submitted by ऑर्फियस on 6 September, 2019 - 19:45

प्रा.डॉ. कुमार आज फार खुशीत होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेमिनारचा आज शेवटचा दिवस होता. समाजशास्त्रात कुमारांचा दराराच इतका होता की त्यांनी बोलावल्यावर अगदी देशोदेशीचे विद्वान रीसर्च पेपर वाचण्यासाठी आले होते. सारे काही सुरळीत पार पडले होते. काल कुमारांनी आपले अलिकडले संशोधन मांडले. त्यावेळी तर तूफान गर्दी झाली होती. मार्क्सवाद आणि अंतोनिओ ग्रामशीच्या हेजेमनीशी तूलना करीत त्यांनी सांस्कृतिक वर्चस्वाविषयी आपले मत दिले. टाळ्यांचा नुसता कडकडाट चालला होता. देशोदेशीचे बुजूर्ग संशोधक पसंतीने माना डोलवत होते. पेपर संपल्यावर प्रकाशनाबद्दलही विचारणा झाली.

शब्दखुणा: 

सोळा आण्याच्या गोष्टी - मात! - अज्ञातवासी

Submitted by अज्ञातवासी on 5 September, 2019 - 13:59

वरच्या खोलीत बाळ शांत झोपलं होतं...
खिडकीतून जाडजूड जनावर सरपटत आलं, आणि खोलीत शिरलं...
वाड्यात लगबग सुरू होती.
जनावर माणसांची चाहूल घेत हळूहळू फुसफुसत बाळाच्या दिशेने जात होतं...
★★★★★
खळ्ळ्ळ!!!!
"अगबाई, काय पडलं," म्हणत राधाबाई वरच्या खोलीत धावल्या.
पाचफुटी जाडजूड फोटोफ्रेम पडली होती...
तिच्याखाली जनावराच्या डोक्याचा चेचरा झाला होता...
राधाबाई ते दृश्य बघून जागीच थंडगार पडल्या!
भानावर आल्यावर त्यांनी किंचाळी फोडली आणि बाळाला घेतलं.

विषय: 

बाप्पा बाप्पा…

Submitted by Asu on 1 September, 2019 - 22:46

माझ्या नातीने आभाने स्वतः बनवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसह-

बाप्पा बाप्पा… (बालकविता)

शब्दखुणा: 

मिळता नजरेस नजर

Submitted by avi.appa on 30 August, 2019 - 12:22

मिळता नजरेस नजर
श्वास थांबून गेला
मनात मन मोराचा
पिसारा फुलू लागला
*
कशी चुकवू नजर
जीव गोंधळून गेला
त्या हस~या छबीच
ध्यास काळजाने घेतला
*
पुजले प्रेम दैवताला
कौमार्य नैवेद्य वाहिला
विश्वासू सखा होता तो
जिव्हारी घाव देवुन गेला
*
उतरता धुंदी प्रेमाची
जगाचा व्यवहार कळला
तो पहिला घाव
बरेच शिकवून गेला

प्रेमकाव्य

विषय: 

पोया

Submitted by Asu on 30 August, 2019 - 09:36

माझे चित्रकार मित्र श्री.लीलाधर कोल्हे यांनी काढलेल्या सुंदर चित्रासह माझी कविता-
      *पोया*
(लेवा गणबोली)

शब्दखुणा: 

शेतकर्‍यांचा आदिम सण : बैलपोळा

Submitted by ravin on 30 August, 2019 - 06:04

शेतकऱ्याचा रानसखा बैल

शेतकऱ्याचा जिवाभावाचा काळया मातीतला सवंगडी म्हणजे जित्राब . शेतकऱ्याची खरी रानातली सुखदुःखे ज्याला समजतात असा 'काळी 'तला सोबती म्हणजे बैल. सनातन काळापासुन शेतीतली नांगरणी , वखरणी, पेरणी, मळणी इत्यादी सारी कामे बैलाच्याच मदतीने केली जातात.
बैल हा श्रमसंस्कृतीचा कणा आणि समृद्धीचे लक्षण मानल्या जातो. तो खर्‍या अर्थाने सृजनाचा मानस्तंभ व शेतीमातीतल्या हिरव्या जगाचा निर्माता आहे.

प्रांत/गाव: 

व्यंकटेश माडगूळकर: भरभरून जगणे शिकवणाऱ्या प्रतिभावंताचे पुण्यस्मरण

Submitted by atuldpatil on 28 August, 2019 - 23:25

ठरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे. परदेशातल्या एका खूप मोठ्ठ्या शहरातील मध्यवर्ती भागात माझे ऑफिस होते. भारतातून येऊन केवळ काहीच दिवस झाले होते. ऑफिसात एकटाच भारतीय होतो. करीयर आणि चार पैसे मिळवायच्या नादात आपला देश आपली माणसे सोडून पार हजारो किलोमीटर अंतरावर परक्या मुलखात येऊन पडलो होतो. एकटेच राहणे व काम करणे. जिथे दूरदूरवर मराठी तर राहोच भारतीय सुद्धा फार क्वचित कोणीतरी दिसत असे. हे सगळे नंतरच्या काळात अंगवळणी पडले खरे पण सुरवातीचा काळ फारच मानसिक त्रासाचा गेला. सकाळ आणि इतर दैनिकांच्या इंटरनेट आवृत्त्या सुरु झालेल्या होत्या.

Pages

Subscribe to RSS - साहित्य