हे तीन मोठ्या कथांचं छोटंसं पुस्तक आहे.
कथा, लघुकथा, दीर्घकथा – यांची नक्की व्याख्या कशी करायची याबाबत माझ्या मनात कायम गोंधळ असतो. माझ्या मते या पुस्तकातल्या तीनही कथा दीर्घकथा म्हणायला हव्यात. असो.
पुस्तकाबद्दल लिहिण्यापूर्वी सलमा यांच्याबद्दल थोडंसं. (कारण त्यामुळेच मुळात मी हे पुस्तक वाचायचं ठरवलं.)
सलमा हे त्यांचं टोपणनाव आहे. तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात एका कर्मठ मुसलमान कुटुंबात त्या वाढल्या. त्यांच्या घरात मुलगी वयात आली की घरातल्या पुरुषांशिवाय इतर कुणाचीही तिच्यावर नजर पडू नये म्हणून तिचं घराबाहेर पडणं बंद केलं जात असे. अगदी तिचं शाळाशिक्षणही अर्धवट बंद होत असे. तिचं लग्न झालं की मगच तिची त्यातून सुटका होत असे. सलमा यांच्यावरही ती वेळ आलीच. त्यांनी विरोध करून पाहिला. पण उपयोग झाला नाही. पुढे ८-९ वर्षं त्यांनी अशी घराच्या चार भिंतींत काढली.
कधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या पुस्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये असतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला!... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं.