साहित्य

तुमची अंधश्रद्धा कोणती ?

Submitted by प्रकाशपुत्र on 15 August, 2018 - 23:58

मित्रहो आज एक विचार मांडतोय. आपण इतिहासात वाचायचो की आपले पूर्वज अंधश्रद्धा पाळायाचे. उदा. सती प्रथा, अस्प्रुश्यता, बळी, वगैरे. मी नेहमी विचार करायचो की ते एवढे मागास कसे होते ? त्यांना समाजसुधारकानी सांगेपर्यन्त हे का कळले नाही की या अंधश्रद्धा आहेत ? आपले पूर्वज काही आपल्यापेक्षा मुर्ख नव्हते, मग असे का ? मग लक्षात आले की त्या त्यांच्या श्रद्धाच होत्या जोपर्यंत समाजसुधारकानी त्या अंधश्रद्धा आहेत हे दाखवले नाही तोपर्यंत.

विषय: 

परवानगी द्या

Submitted by स्वच्छंदी महेश on 11 August, 2018 - 01:14

परवानगी द्या
- स्वच्छंदी

हात गुंफायची परवानगी द्या
ओठ चुंबायची परवानगी द्या

शोध घेईन मी तिचिया तळाचा
खोल डुंबायची परवानगी द्या

बंद होईल तगमग ह्या जिवाची
राज खोलायची परवानगी द्या

वादळांनो कधीही या, परंतू
रान पेरायची परवानगी द्या

दोष होता कुणाचा सांगतो मी
दोष शोधायची परवानगी द्या

भूक ताटात येताना म्हणाली
कोर मागायची परवानगी द्या

शुभ्र सदऱ्यातही शोभेन मी बस्
झूठ बोलायची परवानगी द्या

गझल...गुलाम शिल्लक आहे

Submitted by स्वच्छंदी महेश on 6 August, 2018 - 03:15

गझल..............
गुलाम शिल्लक आहे
- स्वच्छंदी / महेश मोरे

तुला जिंदगी करावयाचा सलाम शिल्लक आहे
कधी हारलो नाही ,माझे इनाम शिल्लक आहे

तुझी नि माझी बदामातली पुसून गेली नावे
तरी वाळल्या खोडावरला बदाम शिल्लक आहे

लोकशाहीच हसत बोलली स्वप्नामध्ये मजला
म्हणे माणसामध्ये अजूनी निजाम शिल्लक आहे

दगडापुढती नाही झुकली मान कधीही ज्याची
मला वाटते त्याच्यामधला कलाम शिल्लक आहे

नकोस समजू आयुष्या की डाव संपला माझा
राजा गेला,राणी गेली,गुलाम शिल्लक आहे

विषय: 

पाठमोरी

Submitted by अभ्या... on 3 August, 2018 - 11:38

"आपलं कसं है लक्ष्या, वुडलॅन्ड म्हनजे वुडलॅन्ड"
"आत्ता पायात सेमच हाय की बॉस, पन जबरीय राव ट्रॅक्टरटायरवानीच दिसतंय बूट"
"मग लका, दोन वर्ष बघायचं नाही आता, आधीचा कंटाळा आला राव. चल काढ गाडी"
चकचकीत सफारीत बसताना काचेत स्वतःलाच बघताना मात्र कंटाळा येईना. काळा शर्ट, फिटींगची जीन, खाली वुडलॅन्ड्,डोळ्यावर रेबॅन. सगळा साज कसा रोजचा फिक्स. रेबॅनमागचे डोळे मात्र फिरायचे कायम. माग काढत, सावज हेरत.
आत्ताही.
दार उघडताना दिसली ती पाठमोरी.

विषय: 

चिरुमाला (भाग ११ ते १३ )

Submitted by मिरिंडा on 2 August, 2018 - 07:32

पो. स्टेशनचा माझा अनुभव पहिलाच असल्याने मी थोडा नर्व्हस होतो. गेलो तेव्हा इन्स्पे. कानविंदे मोहंती साहेबांशी बोलत होते. मला मोहंती साहेबांचं आश्चर्य वाटलं एवढा मोठा धक्का बसूनही ते थंडपणे घेत होते. फक्त उठताना मात्र ते धमकीवजा म्हणाले, " ऑफिसर ध्यानमे रखना अगर मेरी बेटी नही मिली या उसके साथ कुछ हुवा तो तुम तुम्हारे कुर्सीकी फिकर करना चालू करो, समझे " हे बोलणं अर्थातच कानविंदेंना आवडलं नाही. " सर हम पूरी कोशिश करेंगे, आप फिकर नही करना " मग मोहंती म्हणाले, " फिकर मुझे नही आपको करनी है. " असं म्हणून मोहंती गेले. कानविंदेंची चर्या उतरली. त्यावर त्यांनी राग माझ्यावर काढायला सुरुवात केली.

Au 79 ( नवख्या गुप्तहेरांची कथा )

Submitted by अॅस्ट्रोनाट विनय on 27 July, 2018 - 04:56

आज शुभांगी घाईगडबडीत कॉलेजला निघाली होती. कुणीतरी नवीन शिक्षक केमिस्ट्री शिकवण्यासाठी रुजू झाले होते. त्यांचं आज पाहिलं लेक्चर होतं. आजपर्यंत गोचीड उर्फ महाले सरांच्या केमिकल जाचाला विद्यार्थी कंटाळले होते, त्यामुळे ते मोठ्या आशेने वर्गात जमा झाले होते, नवीन सर कसे शिकवतात हे बघायला सर्वजण उत्सुक होते. त्यांची बारावी विज्ञानची अ तुकडी फिजिक्स लॅबच्या खाली पहुडलेली होती. पहिल्या तासाला कधी नव्हे ते सगळे विद्यार्थी हजर होते, म्हणून ती वर्गखोली थोड्या नाराजीनेच उठली. मुलं-मुली हुल्लड करत आत घुसले. गडबड, गोंधळ, मारामाऱ्या यांना उधाण आलं.

विषय: 

खेळ -प्रा. मिलिंद जोशी

Submitted by बेफ़िकीर on 25 July, 2018 - 22:45

खेळ (लेखक प्रा. मिलिंद जोशी) - वार्‍यावर लहरणारा दुपट्टा
==========

प्रा. मिलिंद जोशी लिखित 'खेळ'हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला व तो वाचनातही आला. प्रा. मिलिंद जोशी हे माझे समवयीन असले तरीही त्यांचा व्यासंग आणि वक्तृत्व हे एखाद्या ज्येष्ठ वयाच्या साहित्यिकासारखे आहेत. मी त्यांच्या व्याख्यानांचा चाहता आहे. त्यांचे इतर साहित्य मी आजवर वाचलेले नाही. त्यांच्यातील कथाकार कसा आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असल्याने खेळ हा संग्रह वाचला.

ह्या कथासंग्रहातील कथांची अनेक बरी-वाईट वैशिष्ट्ये जाणवली व त्याबाबत एक वाचक म्हणून कथन करत आहे.

विषय: 

उशीरा चा पाऊस कविता

Submitted by नानबा on 25 July, 2018 - 13:23

कुणाकडे अनिलान्ची उशीरा चा पाऊस कविता मिळेल का?

चिरुमाला (भाग १ ते १०)

Submitted by मिरिंडा on 25 July, 2018 - 09:11

नोकरीत बदली होणं हे कुणालाच नवीन नाही . तसं ते मलाही नवीन नव्हतं. बँकेतल्या नोकरीतली बदली मात्र एखाद्या शहरात असली तर बरं वाटतं परंतू एखाद्या आडवाटेच्या खेड्यात असेल तर प्रत्येक बाबतीत आपली अडवणूक होत आहे असं

चिरुमाला (भाग १०)

Submitted by मिरिंडा on 25 July, 2018 - 08:34

दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही उशिरा म्हणजे आठ वाजता उठलो. अचानक माझ्या ज्येष्ठ बंधूंचा फोन आला . ते सपत्निक येणार असल्याचे म्हणाले. अर्थातच त्यांना आणण्याची जबाबदारी जुडेकर वर सोपवली. बँकेतला काही स्टाफ मी या कार्यक्रमाला बोलावला होता. त्यादिवशीच्या कार्यक्रमात आम्ही थोडा बदल केला होता. तो म्हणजे पार्टी सकाळी न ठेवता संध्याकाळी सहा वाजता ठेवली. म्हणजे जास्त गर्दी होऊ नये. भटजी नऊ साडेनऊ पर्यंत येणार् होते. आम्हाला झोप नसल्याने आमचे डोळे चुरचुरत होते. सध्या साडेनऊ पर्यंत आवरणार कसे हा प्रश्न होता. तरीही जुजबी कामं करीत होतो. पावणे नऊ च्या सुमारास जुडेकर आला.

Pages

Subscribe to RSS - साहित्य