साहित्य

कविता

Submitted by Asu on 19 December, 2018 - 13:35

*कविता*

भावनांचा बाण जेव्हा,
हृदय छेदून जातो.
रक्तरंजित जखमेतून तेव्हा
कवितेचा हुंकार येतो.

शब्दकळ्यांना झुळूक जेव्हा,
भावनांची फुंकर घालते.
कळत नकळत तेव्हा
कवितेचे फूल फुलते.

स्वयंभू अन सर्वव्यापी
फुलपाखरी मधुगंध कुपी
दु:खी, मुकी, छंदी फंदी
कविता असते ब्रम्हानंदी

कविता कधी माझी नसते
कविता कधी तुमची नसते.
हृदयाला भिडणारी,
कविता फक्त कविता असते.

शब्दखुणा: 

हसवणूक फसवणूक

Submitted by अननस on 19 December, 2018 - 10:43

पु.ल. देशपांडेंच्या आठवणी तसेच इतर मराठी विनोदी लेखकांचे वाचनीय लेखन, त्यांच्या आठवणी या लेखन धाग्यावर आवश्य लिहा.

शब्दखुणा: 

परिक्रमा

Submitted by पुरंदरे शशांक on 17 December, 2018 - 23:41

परिक्रमा

तर्क जाणीवे पल्याड
अज्ञाताचा गाव मोठा
अव्यक्ताच्या वेशीआत
व्यर्थ सारा आटापिटा

गावा नाही पायवाट
नाही तेथे घरेदारे
वस्तीकर नावालाही
नाही कोणी सांगणारे

गाजावाजा गावाचा या
जरी नाही किंचितसा
वाटा चालताती सारे
नकळत त्याच दिशा

वाट सरता सरता
मागे वळून पहाती
चाललो कि भास सारे
प्रश्नचिन्ह उरे हाती

भास आभासी जगात
कोण आपले परके
विसंबलो ज्यांच्यावरी
कोण होते ते नेमके

स्वयंभू

Submitted by रमेश रावल on 17 December, 2018 - 22:55

माझ्या भावाला वाचनाची खूप आवड..इतिहासात विषेशत जास्त रूची.. शिवाजी महाराज/संभाजी महाराजांच्या विषयी तर तारखेस सर्व पाठ.. रामायण महाभारत व त्यातील घटनेविषयी कोणी चूकूनही बोलायला सर्वात केली तर हा काही त्याला तासभर तरी सोडत नाही...पण आत्ता वाईट वाटते की धकाधकीच्या आयुष्यात इतरांसाठी जगताना स्वतचा छंद जोपासता आला नाही.. दोन महिन्याने महिनाभर रजा घेवून भारतात येतोय.

विषय: 
शब्दखुणा: 

दांभिक

Submitted by Asu on 12 December, 2018 - 00:05

*दांभिक*

तिला बिलगून बसतांना
त्याच्या मनात विचार आला
संसार करतांना खराखोटा
आयुष्यभर वापर केला
खोटं खोटं रडतांना
अश्रूंनी जरी दगा दिला
मरतांनाही प्रेम दाविण्या
पार्थिवाने आधार दिला

- प्रा. अरुण सु. पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 

नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे

Submitted by आनन्दिनी on 10 December, 2018 - 03:05

नंदिनीची डायरी - तेव्हा आता पुढे

विषय: 

किमयागार

Submitted by Asu on 7 December, 2018 - 21:56

किमयागार

अजब तुझे डोळे गड्या
अफाट तुझी स्मृती
प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर
दिसे हुबेहूब कृती

रेटिन्यावर तुझ्या लिंपिले
सिल्व्हर हलाईडस् थेट
निगेटिव्ह पॉझिटिव्ह करण्या
धडपडे अंधारी थायोसल्फेट

डिजिटल तू आज जाहला
अद्भुत अचंबित खूप
सेंसोर चिपेवर पिक्सेल
साठवी तेजस्वी रंग रूप

बटण दाबता होतो मानव
तुझ्यात कैद क्षणात
सुंदऱ्या वा असो बंदऱ्या
सदैव तुझ्या प्रेमात

उपकार तव कॅमेरेदादा
झाले आम्हावर भारी
तुझ्याविना कोण करील
आम्हां अमर या संसारी

शब्दखुणा: 

फ्रेंच फ्राईज

Submitted by मकरंद गोडबोले on 6 December, 2018 - 12:08

आपट्यांची टीना आमच्या बिल्डिंगिला फ्रेंच फ्राईज म्हणते. म्हणजे त्याचे काय झाले, तिनी नको त्या वयात नको ते केले. ती चांगली बघत्या पिढीतील मुलगी, ती आमच्या वाचत्या पिढितल्या लोकांचे ऐकून, केवळ पुलंची शंभरी आली म्हणून, आणि कलपकाका, हे तिनीच ठेवलेले नाव बरंका. तसे कलपकाका म्हातारे नव्हते. पण ते दिसायचे. त्यांना चिरतारुण्याची विलक्षण हौस. ते अगदी चाळिशिच्या जवळपास होते. फक्त तिसेक वर्षांचा फरक. पण यांचे सगळे केस पूर्ण काळे होते. अगदी नैसर्गिक कलप लावल्यासारखे दिसायचे. म्हणून कलपकाका. चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून खरेतर त्यांचे आडनाव सुरकुतलेले असे ठेवायला हरकत नव्हती.

विषय: 

कोण काय वाचतो..?

Submitted by खुशालराव on 3 December, 2018 - 23:40

आपण सगळे मायबोलीवर येतो म्हणजे कुठे ना कुठे आपल्या सगळ्यांना वाचनाची आवड आहे.. आपल्यापैकी अनेकांनी पुस्तकें वाचलेली असतील त्यातील कित्येक पुस्तकें आवडलेली सुध्दा असतीलच... आपण ईथे त्याच संदर्भात चर्चा सुरू केली तर? म्हणजे या निमित्ताने आपली सुध्दा उजळणी होईल, अनेक पुस्तकाचे प्रत्येकावर पडलेला प्रभाव कळेल आणि आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्याला ज्या वेळी पुस्तक वाचायचे मन करेल त्या वेळी कोणत पुस्तक आपल्याला वाचायला आवडेल हे सुध्दा पटकन कळेल की...

हा धागा नक्कीच मनोरंजक असेल.. चला तर मग करूया सुरवात....

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य