साहित्य

आनंद ओंजळी

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:43

गंधावाचून आहे फुल,इथे कोणाला रुचले का ?
अन्न आहे नाही चव,इथे कोणाला पचले का ?

प्रीत त्यांनी खरी जळवली,देह गिळून खचले का ?
बऱ्याच झाल्या भूलथापा,अजुनही त्यांना सुचते का ?

पाऊस माझा सखा सोयरा,आता तोही सुकला का ?
नभात दाटुनी येते वीज,अश्रू सोबतीस बसला का ?

नको नको हे तुमचे लालच,असे म्हणुनी फसलात का ?
नकारघंटा ऐकू आली,आयुष्यावर रुसलात का ?

अरे किती रे करशील हाल जिवाचे,आनंद ओंजळी रुतला का ?
तूच म्हणाला हेच सुख ते,मग असा पळत तू सुटला का ?
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

नशिब

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:41

झुरल्या माझ्या या व्यथाना,हसून गेले "नशिब"
कष्ट करून हात पोळले,मन म्हणाले "नशिब"

अंतरीच्या या मळ्याला,गंध दिला "नशिब"
एक वेड्या चाहुलीला,फसवून गेले "नशिब"

वाट बघण्याची ही सवय,वाट लावून गेले "नशिब"
हातात होता घास माझा,त्यांनी पळवले "नशिब"

वेदनेचा हुंकार आला,अन बहिरे झाले "नशिब"
रक्ताचे मग सडेच पडले,उपचार नडला "नशिब"

कर्तृत्व हाती आपुल्या असते,नसते काही "नशिब"
ज्यांचे जळले अन मग कळले,ते म्हणाले "नशिब"
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

रविवार

Submitted by वेडा फकीर on 21 June, 2018 - 10:34

आता फक्त रविवारची
वाट बघत जगायचं
शनिवार रात्री जागून
रविवारी हे नको,ते हवं
असं म्हणत झोपायचं
तुला माझ्या आठवणीत
घुसळ घुसळ घुसळायच
पुन्हा तू आलीस का सोबत ?
असं म्हणत अबोल व्हायचं...
तुझं मन माझ्यात
अविरत असच जळायच
तू जळाली खरी
मनात निखारा बनून कशाला उरायच ?
सुमित्रा आपलं नात ही रविवार सारख व्हायचं...
जस की वेळात वेळ काढून रविवार कधी हे "फक्त बघायचं"
©कवी - वेडा फकीर

शब्दखुणा: 

क्षण वेचताना

Submitted by व्यक्त अव्यक्त on 21 June, 2018 - 09:04

ऋतू बदलतोय, भिजतोय. आपले कठीण रुक्ष रूप सांडून कोवळा कोवळा होतोय. रंग बावरे वेल्हाळ रूप सांडून रुजवातीच्या जबाबदाऱ्या

पेलू पहातोय.

  इतके दिवस करपून, कोळपुन गेलेल्या भुईवर वळवाचे चार थेंब काय पडले, उत्साहाने ती रोमांचित झाली आहे.

दाटून येणाऱ्या नभात ती उद्याच्या आशेचे चित्र पाहतेय. थोडीशी उन्हाची तलखी कमी होत आहे म्हणताच जराश्या सरीनन्तर ती परत वाढते. कुमारावस्थेतून यौवनात येण्याचा काळ जसा चिंतामिश्रित कुतूहलाचा असतो तसाच हा परिवर्तनाचा दोन ऋतूंच्या मधला हा काळ, हुरहुरीचा, नवीन अनुभव घेण्याचा. काया बदलून नव्या उत्साहाने तरारून उठण्याचा. लगबगीचा.

शब्दखुणा: 

काथ्याकूट: जरी तर्री (भाग पावणे आठ)

Submitted by चैतन्य रासकर on 19 June, 2018 - 15:40

मिलन (शतशब्दकथा)

Submitted by हाडळीचा आशिक on 16 June, 2018 - 02:38

दोघांनी ठरवल्याप्रमाणं घनदाट येड्याबाभळी पसरलेल्या पांदीत आलो होतो. हवा असलेला एकांत आज आम्हाला तृप्त करणार होता. समाज पण निष्ठुर असतो, प्रेमाचं नातं नेहेमीच नाकारतो. आज मात्र आम्हाला मिलनापासून रोखणारं कुणीही नव्हतं. कमालीचा एक्साइटेड मी, तिची आतुरतेनं वाट बघत होतो.

गुडाकेश. (शतशब्दकथा)

Submitted by दासानु दास on 15 June, 2018 - 11:21

त्याचा प्रचंड वेग आज सर्वांना चकीत करत होता. त्याचे ऐश्वर्यही त्याच वेगाने त्याचा पाठलाग करत होते. परंतू, ती सुद्धा ह्या खेळात नविन नव्हती. आजपर्यंत भल्याभल्यांना तीने धूळीत मिळवलं होतं, तो तर केवळ एक कच्चा खेळाडू होता.

ती बरोबर वेळ साधून त्याच्या समोर आली, आणि त्यांची नजरानजर झाली. काय नव्हतं त्या नजरेत, साक्षात कामदेवालासुद्धा घायाळ करण्याचं सामर्थ्य होतं तिच्या नजरेत! तो तर एक बालक होता.

फक्त क्षणभरासाठी त्यांची नजरानजर झाली, बस्स! पुढच्याच क्षणी तीच्या शिगेला पोहोचलेल्या अहंकाराचा कचरा झाला होता. हा तिच्यासाठी एक अनपेक्षित धक्का होता....

विषय: 

पाऊस त्याचा पाऊस तिचा...

Submitted by mr.pandit on 12 June, 2018 - 12:20

त्याची पावसाला आर्जवे
नकोच पडु आता .
तिचीही पावसाला विनंती
चिंबच भिजव आता ...

त्याचा पाऊस म्हणजे
चिखलाने वैतागलेला
तिचा पाऊस म्हणजे
मृदगंधाने शहारलेला...

पाऊस त्याचा पाऊस तिचा
दरवेळी दोघांचा ठरलेला वाद
सैरावैरा पावसासारखे दोघेही
धुमसायचे मनातल्या मनात...

पाऊस थोडा ओसरला की
दोघेही शांत व्हायचे.
श्रावणसरींनी बरसल्यावर जसे
पुन्हा ऊन पडायचे...

पाऊस तुझा पाऊस माझा
वाद शेवटी मिटायचा
मिठीत सामावताच दोघे
पाऊस पुन्हा बरसायचा...

- १२-०६-२०१८ निखिल..

शब्दखुणा: 

गझल

Submitted by वैवकु रीटर्न्स on 11 June, 2018 - 23:34

तुझ्यामाझ्या उन्हाचा जर असा खालावला पारा
कसा वितळेल हा रस्ता कसा वाहील मग वारा

तुझा खोटेपणा केंव्हातरी पोचेल दुनियेला
तशी जर वेळ आली तर तुला देईन मी थारा

अशी करशील जर संभावना माझ्या प्रवासाची
पुन्हा जाईन माघारी पुन्हा होईन बंजारा

इथे थांबून पडल्याची मला तर काळजी नाही
मला माहीत आहे की पुढे नेईल नेणारा

नको बोलावणे धाडूस आषाढात यंदाच्या
पहा शब्दांमुळे माझ्या तुझा पेटेल गाभारा

~वैवकु

स्पर्श

Submitted by kokatay on 10 June, 2018 - 17:03

मेघाला कॉलेजमधुन निघायला खुपच उशीर झाला होता. येत्या वार्षिक समारंभामध्ये ती सूत्रधार म्हणून निवडली गेली होती. कॉलेज च्या बाहेर येऊन ती रिक्षाची वाट बघत होती. कुणी रिक्षावाला थांबतच नव्हता, अंधारहि व्हायला लागला होता. आता काय करू? असा प्रश्न तिला पडला आणि तिनं पर्स मधून फोन काढला, निदान घरी कळवते आणि तिचा भाऊ समीर घरी आला असल्यास त्याला बाईक वरून मला न्यायला ये असं सांगते....तर फोन “डेड” झाला होता, सकाळ पासून चार्ज केलाच नव्हता.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य