नमस्कार.. मागील काही दिवसांपासून मी पुस्तके वाचायला सुरु केले आहे... माझा वाचन स्पीड तसा चांगला आहे पण मी जेंव्हा वाचतो तेंव्हा मनातल्या मनात एका आवाजात ते बोलले जाते...
म्हणजे मी वाचायला सुरु करतो तर सेम टाईम डोक्यात ते शब्द आणि वाक्य उच्चरले जातात... त्यामुळे माझा वाचण्याचा स्पीड हा त्या बोलण्याच्या स्पीड इतकाच राहतो..
हा इनर व्हॉइस टाळण्याच्या काही अनुभव? युक्त्या?
गतवर्षी वाचकांना मी लीळा पुस्तकांच्या या अभिनव पुस्तकाचा परिचय करून दिला होता (https://www.maayboli.com/node/77708). वर्षभरात त्या पुस्तकाची मी अनेक पुनर्वाचने केली. त्यातला मला सर्वाधिक आवडलेला भाग म्हणजे त्याची दीर्घ प्रस्तावना. त्यामध्ये लेखकाने अन्य एका पुस्तकाचा उल्लेख केलाय, ते म्हणजे अरुण टिकेकरांचे 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी'. या पुस्तकाचे नावच इतके भारदस्त वाटले की त्यावरून ते वाचायची तीव्र इच्छा झाली. अक्षरधारा-प्रदर्शनामधून केलेल्या मागच्या पुस्तक खरेदीला आता वर्ष उलटून गेले होते.
नमस्कार.
'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण.
लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.
वाचन संस्कृतीच्या बैलाला …
नमस्कार,
माझ्या वडीलांकडे जुन्या वृत्तपत्रांचा खूप मोठा संग्रह आहे. त्यांना वाचनाची खूप आवड असल्याने आणि केवळ त्यांचा विषयच नव्हे (निवृत्त इतिहासाचे प्राध्यापक) पण सायन्स, भूगोल, पर्यावरण इ. विषयांत कमालीचा रस असल्याने त्यांनी महत्त्वाच्या घडामोडींचे/ऐतिहासिक घटनांचे/बातम्यांचे न्यूजपेपर जतन करायला सुरुवात केली आणि त्याचे छंदात रुपांतर झाले. त्यांच्याकडे जवळपास इंग्रजी-मराठी अशी २००० वृत्तपत्रे आहेत.
"स्वयम , हे बघ आता तू हा धडा नीट वाचलास किनई, मग आता मला सांग या प्रश्नाचे उत्तर, की नदीशी आपण काय बोललो असतो.. "माझ्या चौथी मधल्या मुलाचा मी अभ्यास घेत होते, पण माझे मन भूतकाळात गेले होते. ते पोचले होते, अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या काळामध्ये.
सात -आठ वर्षांची मी पुस्तक वाचत होते आणि माझे पपा तेव्हाच्या मला सांगत होते, "तायडे, आज मी संध्याकाळी जेव्हा घरी येईन ना, तेव्हा मला तू ही गोष्ट सांगायची बरंका, नीट वाचून ठेव. "
बरेचदा नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांची माहिती आपल्याला विविध मार्गाने मिळत असते. ती सर्वच पुस्तके वाचली जातात असे नाही. कधी अॅमेझॉनवर सुचवलेल्या पुस्तकात एखादे वाचावेसे वाटणारे पुस्तक दिसते तर कधी न्युयॉर्क टाइम्स बूक रिव्युमध्ये.
आपल्या वर्गात एखादी तरी कॅरी असतेच- सर्वांपेक्षा वेगळी, थोडी गोंधळलेली, अवघडलेली.तिच्या चालण्यावरून, कपड्यांवरून आपण तिला नावं पाडलेली असतात.कधी तिच्या मागे, कधी तिच्या समोर ही नावं पुढे येतात.एकत्र असण्याच्या बळाने वर्गातला अगदी शेळपटातला शेळपट मुलगा पण तिची टर उडवायचे नवे नवे उपाय शोधतो, अंमलात आणतो.एक समान धागा, एक समान शत्रू वापरून तो किंवा ती आपली इतर मुलांमधली प्रतिमा उंचावू पाहतात.कॅरीबरोबर सध्या जे वर्गात केलं जातंय ते आपल्या सोबत होऊ नये, कॅरीवरचं टवाळखोरांचं लक्ष आपल्यावर वळू नये म्हणून ते टवाळीला पूर्ण सहकार्य करतात.एखादा किंवा एखादीच असते- जिला किंवा ज्याला मनातून ही टवाळी अजिबा
मायबोली विविध विषयांवर, विविध वारंवारितेने वाचणारे लोक आहेत. आजच्या जमान्यात छापील पुस्तकांबरोबरच अनेक जण इ-पुस्तके व ऑडिओ-पुस्तकेदेखील वाचत/ऐकत असतील. आंतरजाल उपलब्ध व्हायच्या आधीच्या जमान्यात पुस्तकाबद्दल माहिती मिळवण्याची साधने व आंतरजालाच्या युगातील साधने यात जमीन-आस्मानाचा फरक पडला आहे. लोकं एखादे पुस्तक का वाचायला सुरू करतात, तेच पुस्तक का, त्याबद्दल माहिती कुठून मिळते की फक्त लायब्रीत्/दुकानात चाळता चाळता पुस्तक उचलतात याबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे.
गोनीदा जन्मशताब्दी वर्षानिमित्त या वर्षभरात काहीतरी करू या का, असं गेल्या ८ जुलैला मी मित्रमंडळीत विचारलं होतं. त्यात मला सुचलेल्या वेगवेगळ्या कल्पना मांडल्या. काहीतरी करायची ही कल्पना सगळ्यांनीच तेव्हा मनापासून उचलून धरली. प्रत्यक्षात मात्र काही ना काही अडचणी येत राहिल्या आणि आज या दिवसापर्यंत तरी काहीच होऊ शकलं नाही. सहज विचार करत मागे मागे जाताना खुपशा अवांतर गोष्टीही आठवत राहिल्या आणि लक्षात आलं, अरेच्चा, पार्श्वभूमीला सगळीकडे गोनीदा आहेतच की. मात्र त्यातली एक गोष्ट अगदी आवर्जून उल्लेख करण्यासारखी आणि आपल्या मायबोलीकरांना तर सहर्ष सांगण्यासारखी आहे, ती म्हणजे आमचं 'वाचन वेल्हाळ'.