रुद्रसेन
खोली क्रमांक ४
"अरे नुसता बसलायस काय आतमधे. जरा बाहेर येऊन धक्का मार" अजय वैतागत म्हणाला.
"काय..." कानामध्ये हेडफोन्स घातलेले असल्याने टोनीला नीट ऐकू गेलं नाही.
अजयच्या ते लक्षात आलं. तसं त्याने गाडीच्या मागून चालत येत पुढे बसलेल्या टोनीच्या कानातले हेडफोन्स काढून ते मागच्या सीटवर फेकले.
"गधड्या खाली उतर आणि धक्का मार. त्या दोघीच धक्का मारत आहेत" अजय जरा नरमाईत बोलत गाडीच्या मागे धक्का मारायला गेला. नाईलाजानेच टोनी गाडीमधून उतरला आणि गाडीला धक्का मारायला मागे गेला.
गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग ७ (अंतिम)
रात्र चांगलीच पडलेली होती. बंगल्याच्या आसपास नेहमी असते तशीच भयाण शांतात होती, बंगल्यातील आरडाओरडा आणि भयानक किंकाळ्याचे आवाज आता बंद पडलेले असले तरी एक प्रकारची विचित्र शांतता अजूनही तिथे होती. बंगल्याच्या आतल्या भागात एका मोठ्या हॉलवजा खोलीमध्ये एका खुर्चीच्या मागे रॉबिन लपून बसलेला होता. शेजारच्याच खोलीत इ. इनामदार देखील लपलेले होते. अंधाऱ्या रात्री कोणी गुपचूप बंगल्यात प्रवेश केलाच तर त्याला बेसावध गाठून पकडण्याचा इरादा केला गेला होता.
गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग ६
सकाळ झाल्या झाल्या हरिभाऊंनी पोलिसांना कळवलं कि दोन चोर रात्री बंगल्यात गुपचूप शिरून आरडाओरडा करून लोकांना घाबरवण्याचे चाळे करताना पकडले गेलेत. त्यानुसार सकाळीच पोलिसांनी आपल्या गाडीतून रंगा आणि बाळू या दोन्ही चोरांना पकडून नेले. तरीही ते दोघे पकडले गेले आहेत याची गुप्तता बाळगण्याबद्दल रॉबिनने पोलिसांना सूचित केले होते.
गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग ५
गावातीलच एका छोट्याश्या हॉटेलमध्ये मिसळ खात रॉबिन बसला होता. हॉटेलमध्ये इतर कोणीही गिऱ्हाईक न्हवते. शेंडेंच्या बंगल्यातील होणाऱ्या भुताटकीच्या घटनांमागे नक्की कोण असावे असा विचार करत तो बसला होता. गावात नीट व्यवस्थित चौकशी करावी असा त्याचा विचार होता. भूतबंगल्यावर जाऊन पाळत ठेवणे देखील गरजेचे होते. हरिभाऊ आपली घरातली कामे उरकून नंतर इथेच येणार होते.
गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग ४
सकाळी रॉबिन झोपेतून उठला आणि लाडकी बाजेवर तसच आळसावलेल अंग टाकून तो उगाच पडून राहिला. हरिभाऊंच्या घराजवळच एक छोटी चूल होती त्यावर हंडा ठेवून हरिभाऊ पाणी गरम करत होते आणि खांद्यावरील पंचाने गरम हंड्याला लावून तो गरम झालेला पंचा डोक्याला लावत होते. थोडक्यातच डोक्यावरील टेंगळाला शेक देत होते. त्यांना तसं करताना पाहून रॉबिनला कालचा प्रसंग आठवला आणि हसू आवरलं नाही. हात तोंडावर धरून हरिभाऊंना ऐकू येऊ नये म्हणून खुसपुसत हसू लागला. पण त्याच्या खुसपूस करत हसण्याचा आवाज हरिभाऊंना आलाच.
गुप्तहेर रॉबिन आणी भूतबंगल्याचे रहस्य - भाग ३
सूर्य आता चांगलाच वर आला होता आणि तापू लागलेला होता. शेंडेंच्या घरातून बाहेर पडल्यावर रॉबिन आणि हरिभाऊ रस्त्यावरून चालू लागले. शेंडेंच्या घरापासून ते पुढे चालत आले असता त्यांना शेजारच्या घरातून हरिभाऊंना कोणीतरी आवाज दिला.
“ काय हरिभाऊ, दुपारच्या वेळी उन्हातान्हात कुठे हिंडताय, आणी सोबत हे महाभाग कोण ?”
या प्रश्नाकर्त्याकडे माना वळवून दोघेही बघू लागले. एक स्थूल शरीरयष्टीचा माणूस अंगात बनियन आणि लुंगी घालून शेजारच्या घराच्या कुंपणामागे उभा राहून मिश्किलपणे त्यांच्याकडे पाहत होता.
गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग २
सकाळी सकाळी न्याहारी उरकून रॉबिन आणि हरिभाऊ आपल्या घरातून शेंडे साहेबांना भेटायला त्यांच्या घराकडे निघाले. कच्च्या रस्त्यावरून रॉबिन मस्तपैकी खिशात हात घालून चालत होता आणि हरिभाऊ त्याला आजूबाजूच्या परिसरात काय काय विशेष आहे हे सांगत होते. रस्त्यावरून गावातील माणसे आपापल्या शेतात काम करायला चाललेली दिसत होती. रस्त्याच्या आजूबाजूला मस्तपैकी मोठमोठी झाडे असल्याने मस्त थंडावा जाणवत होता. पुढे जाताना त्यांना गावातील लोकांची छोटी छोटी घरे दिसू लागली, ज्यामध्ये छोटस कुटुंब मावू शकेल. गाव जास्त मोठं न्हवत. हवा मस्त खेळती होती आणी वातावरण अल्हाददायक.
गुप्तहेर रॉबिन आणि भूतबंगल्याचे रहस्य - भाग १
रेल्वे इंजिनाच्या कर्कश्य भोंग्याने रॉबिन जरासा दचकूनच जागा झाला. डोळे किलेकिले करून रॉबिनने डब्यातील खिडकीबाहेर नजर टाकली, रेल्वे कोणत्यातरी स्टेशनवर थांबली होती. रॉबिनने फलाटावर पाहिलं तर फलाटावर जास्त गर्दीपण न्हवती, तरीसुद्धा रेल्वेने हा थांबा का घेतला असं वाटून रॉबिन चरफडतच व्यवस्थित उठून बसला. अंगावर घेतलेली शाल त्याने बाजूला ठेवली आणी शरीराला आळोखे पिळोखे देत बाजूला नजर टाकली. रॉबिन रेल्वेच्या ज्या डब्यात बसला होता त्या डब्यामध्ये खूपच कमी प्रवासी बसले होते. रॉबिनच्या समोरच्या लांबलचक असलेल्या सीटवर किंवा शेजारी कोणीही बसलेले न्हवते.
पडकं घर
संध्याकाळचे ६ वाजत आले होते. पावसाचा जोर ओसरलेला होता. दिवसभर माळरानावर चारा चरून गुरे ढोरे आपल्या गोठ्यांकडे शांतपणे जात होती, त्यांचा मागे गुराखी सुद्धा त्यांचावर न ओरडता शांतपणे हातात काठी घेऊन चालत होता. वडाच्या पारावर काही रिकामटेकडी म्हातारी उगाचच सुतकी चेहरा करत समोरच्या कच्च्या रस्त्याकडे पाहत बसलेली होती. त्या वडाच्या पाराजवळच पारगावचं छोटस सरकारी कार्यालय होतं. त्या कार्यालयाच्या दरवाजावर तशी पाटी सुद्धा लटकत होती, जवळपास मोडकळीला आलेल्या त्या कार्यालयात गणपत चोरगे हा सरकारी खात्यातील माणूस गावातील २-३ ग्रामपंचायत सदस्यांसोबत कसलीतरी चर्चा करत बसलेला होता.