साहित्य

आज त्याची पावले उंबऱ्याला लागली

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 5 August, 2019 - 04:30

आज त्याची पावले उंबऱ्याला लागली

- महेश मोरे (स्वच्छंदी)

आस ज्याची नेमकी जीवनाला लागली
आज त्याची पावले उंबऱ्याला लागली

बाण नव्हता एकही काळजाला लागला
पण शिकाऱ्याची नजर पाखराला लागली

एकदाही भेटली, बोलली नाहीच पण
वाट बघण्याची सवय अंगणाला लागली

पावसाशी काल तर बाप होता भांडला
आज त्याची एक झळ वावराला लागली

'प्रेम'..असताना तसा रोग होता चांगला
त्यात झुरण्याची चटक माणसाला लागली

ती मजेने बोलली, "मी तुझी आहे कुठे ?"
हाय त्याची मग तिच्या काळजाला लागली

शब्दखुणा: 

आशेचा किरण

Submitted by Asu on 2 August, 2019 - 12:36

आशेचा किरण

अंधारल्या दिशा सगळ्या
काळोख जगती दाटला
वादळ वारा तुफान सुटला
भरदिवसा सूर्य झाकोळला

भरकटल्या वाटा भोवती
प्रकाशही कुठे लपला ?
मनातल्या कोपऱ्यात पण
आशेचा किरण दिसला

प्रयत्नांचा दीपक सदैव
मनात असू दे तेवता
तारिल तुज संकटसमयी
तोच असे तव देवता

सूर्य नसू दे तुझ्या संगती
सांभाळ दिवा मनातला
माणसुकीचा स्नेह देऊनी
पसरो प्रकाश किरणातला

प्राजक्त

Submitted by Asu on 31 July, 2019 - 01:08

प्राजक्त

शुभ्र अंगी केसर रंगी
प्राजक्त फुलला पानोपानी
धुंद फुंद गंध पसरला
श्रावण हसला रानोरानी

शापित अप्सरा नभातुनी
अवतरल्या का भूवरती
नाजूक नाजूक सुंदर बाला
श्रावणमासी दरवळती

उमलताच गळून पडावे
अगम्य ऐसी दैवगती
प्राजक्ताचा सडा सांडला
वनराणीची बैठक ती!

आयुष्य तुझे क्षणभर जरी
वेड लाविते जन सकला
रूप रंग तव गंध जपतो
मम हृदयी प्राजक्त फुला

नवी नवरी

Submitted by Asu on 30 July, 2019 - 01:35

*नवी नवरी*

नवी नवरी उंबरठ्यावर
माप ओलांडून घरात येते
बाहेरचे जग बाहेर ठेऊन
घर आपल्या कवेत घेते

बंध माहेरचे तुटत नाही
सासरचे पाश सुटत नाही
दोघांचा गोफ विणत असते
एवढे पण ते सोपे नसते

आनंद घराचे गाली हसती
दुःख तिच्या नयनी दिसती
हसणे रडणे तिचेच नसते
घराशी अद्वैत नाते असते

तुळस माहेरच्या घरची
सासरच्या अंगणी रुजते
माती पाणी बदलले तरी
वृंदावनी गोकुळ फुलते

सडा माहेरच्या प्राजक्ताचा
सासरी पाडायचा असतो
गंध माहेरच्या प्रेमाचा सदा
मनात जपून ठेवायचा असतो

शब्दखुणा: 

आदिअनादि

Submitted by पुरंदरे शशांक on 29 July, 2019 - 23:21

आदिअनादि

भरकटून गेलो वार्‍यावरती जेव्हा
आधार संपता भिरभिरलो मी तेव्हा

गरगरता वार्‍यासंगे फिरलो दूर
फांदीचा नव्हता हळवासाही सूर

संपन्न हिरवे जगणे जेव्हा स्मरतो
स्वप्नेही अलगद अंतरात साठवतो

मातीत पुन्हा मी मिसळून जातानाही
कोंभांची लवलव खुणावीत ती जाई

मी आदिअनादी होतो जेव्हा व्यक्त
दिपवून जगाला पुन्हा पुन्हा अव्यक्त

धिंग एक्स्प्रेस

Submitted by Asu on 28 July, 2019 - 22:40

आसामची धावपटू १९ वर्षीय हिमा दासने २ ते २० जुलै २०१९ या १९ दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये पाच सुवर्णपदके जिंकली. हिमा दासचे हे यश फार मोठे नसले तरी फार लहानही नाही. एवढ्या लहान वयात तिने स्वतःला सिद्ध केले आहे. म्हणून तिला पाठिंबा देणे गरजेचे आहे. गरुड भरारी घेण्यासाठी हिमाला योग्य वेळी प्रोत्साहन मिळाले तरच तिच्याकडून जागतिक आणि ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न पाहता येईल. म्हणून ही कविता-

*धिंग एक्स्प्रेस*

सुवर्णकन्या भारताची
हिमा दास शाब्बास !
सुवर्णांचा वर्षाव केला
कामगिरी तुझी खास

द डेथ ट्रॅप भाग १४

Submitted by स्वाती पोतनीस on 28 July, 2019 - 06:39

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग १४
बद्री, खुरानाचा मुलगा?
“खुराना, तुम्हाला माहीत आहे का बद्रीचा मृत्यू कसा झाला ते?” वेदांतीने विचारले. खुराना थोडासा सावध झाला. त्याने विचारले, “कोण आहात तुम्ही?”
“आम्ही तुमचे शत्रू नक्कीच नाही आहोत.”
“मग हे का विचारता आहात मला?”
“आम्हाला काही माहिती हवी आहे. ती तुम्ही देऊ शकता हेही आम्हाला माहीत आहे.”
“कसली माहिती?”
“तुम्ही कुणासाठी काम करता?”
“मी नवतेज ऍग्रोमध्ये काम करतो. त्यांच्या गोदामात.”

शब्दखुणा: 

द डेथ ट्रॅप भाग १३

Submitted by स्वाती पोतनीस on 28 July, 2019 - 06:39

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग १३

शब्दखुणा: 

द डेथ ट्रॅप भाग १२

Submitted by स्वाती पोतनीस on 28 July, 2019 - 06:07

स्वाती पोतनीस
द डेथ ट्रॅप
भाग १२
नरेंद्रने दारा आणि जॉर्जला एकत्र रिक्षेतून जाताना पाहीले. त्याने मागुन येणाऱ्या रिक्षेला खुण करून थांबविले. नरेंद्र रिक्षेत चढला आणि त्याने ड्रायव्हरला पुढच्या रिक्षेचा पाठलाग करण्यास सांगितले. रिक्षा ड्रायव्हरने विचारले, “साहेब काही लफडा नाही ना?” नरेंद्रने त्याचा परवाना दाखविला आणि सांगितले,
“काळजी करू नकोस. तुला काहीही प्रॉब्लेम होणार नाही. पण ती रिक्षा बरीच पुढे गेली आहे. तिला कसे गाठणार?”
“मी आत्ता त्या रिक्षेला गाठतो.” असे म्हणून त्याने सफाईने गर्दीतून रिक्षा पुढे नेली. अंतर राखून तो त्या रिक्षेचा पाठलाग करू लागला.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - साहित्य