पुस्तक

मराठी साहित्यातील प्रेम कथा सुचवाव्यात

Submitted by therising on 16 January, 2023 - 00:16

नमस्कार,
परवाच सुहास शिरवळकर यांची'जाई' ही कादंबरी वाचण्यात आली. जाईच्या कथानकात आणि तरल प्रेमकथेत अक्षरशः न्हाऊन निघाल्याची भावना झाली.
या कथेनंतर मराठी साहित्यातील इतर अजरामर आणि कमी माहिती असलेल्या (अंडररेटेड) प्रेमकथा वाचण्याचा मोह आवरला गेला नाही, या कादंबरीनंतर शिरवळकर यांच्या तलखी, कोवळीक, मुक्ती या कादंबऱ्या वाचावयास घेतल्या आहेत पण तरीही असे राहून राहून वाटले की जाईची सर इतर कथांना नाही.
कृपया आपणास माहिती असलेले मराठीतील इतर प्रेमकथा साहित्य सुचवावे.
धन्यवाद.

पुस्तक परिचय : Are You Posture Perfect?

Submitted by शैलपुत्री on 6 January, 2023 - 05:50

खरं तर गेली वर्षभर, मी दुखण्यामुळे घरातच नैराश्याच्या गर्तेत अडकून पडले होते. ज्या डॉक्टरांनी (डॉ. विनायक देंडगे, पुणे) मला या सगळ्यातून बाहेर काढले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांनी आणि डॉ. राजश्री लाड यांनी लिहिलेल्या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

या धाग्याच्या सुरुवातीच्या अर्ध्या भागात मी माझा स्वानुभव आणि उरलेल्या अर्ध्या भागात पुस्तक परिचय मांडलेला आहे. कारण त्याशिवाय माझी हा धागा लिहिण्यामागे असलेली कळकळ तुम्हांपर्यंत पोचू शकणार नाही असे मला खात्रीने वाटते. असो.

ही काही गोष्ट असू शकत नाही...

Submitted by संप्रति१ on 25 December, 2022 - 02:18

त्याचं झालं असं की कालपरवाकडे एकीने 'एक्सक्युज मी अंकल' म्हणून माझा अपमान केला. मी पण 'बोला मावशी' म्हणून परतफेड केली. त्यावेळी मी चेहऱ्यावर नेहमीचंच भंपक हाफ-स्माईल धारण केलेलं. त्यामुळे ती हसायला लागली. अपमान परिणामकारक झाला नसावा, असं मला वाटलं.
पत्ता शोधत होती बाय द वे.

"एफसी रोडला कुठून जायचं काका ?" तिनं पुन्हा एकदा
अपमान केला.. ह्यावेळी ठरवून. आणि मातृभाषेतून..!

"आता ह्या वयात एफसी रोडला जाऊन काय करणार मावशी तुम्ही??" मी जवाबी हमला केला.

मी वाचलेल पुस्तक -माल्कम ग्लॅडवेलच ‘आउटलायर्स’

Submitted by Prashant Mathkar on 11 November, 2022 - 09:42

माल्कम ग्लॅडवेलच ‘आउटलायर्स’

प्रसिद्ध कॅनेडियन लेखक माल्कम ग्लॅडवेलच ‘आउटलायर्स’ नुकतंच वाचनात आल. जगात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींच्या यशामागची कारण आणि त्यांच विश्लेषण एका वेगळ्याच अंगाने करणारं हे पुस्तक. अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या यशामागे त्यांची हुशारी आणि कठोर मेहनत या बरोबरच या यशाची पायरी चढताना त्यांना मदत करणाऱ्या इतरही काही सुप्त गोष्टी असतात याच विवेचन ग्लॅडवेलने या पुस्तकात केल आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

'ब्लाईंडनेस'- ज्युझे सारामागो

Submitted by साजिरा on 8 October, 2022 - 06:15

आपण आपल्या आयुष्याला जगण्याला किती गृहित धरत असतो. आपल्या आजूबाजूला असलेल्या, आपल्या मालकीच्या असोत वा नसोत, अनेक गोष्टी, वस्तू, व्यक्ती आणि एकंदरच आपल्या भोवताली मांडलेलं किंवा आपसूक तयार झालेलं नेपथ्यही गृहित धरून चालतो. एका दृष्टीने पाहिलं तर हे सारं आपण आपलंच समजून जगत राहतो.

मग एक दिवस अचानक आपला एखादा जिवलग, आपल्याला रोज भेटत असलेली व्यक्ती मरतेच.
हे काय आक्रित- असं म्हणून आपण हलतो, घाबरतो. माणूस अगदीच घरातलं असलं तर हादरून, कोसळून जातो. हताश-निराश होऊन बसून राहतो. अनेक दिवस आपले दैनंदिन व्यवहार बदलतात.

विषय: 

वाचतानाचे तुकडे

Submitted by पाचपाटील on 27 August, 2022 - 07:49

१. खात्री आहे की पुढे सुदूर भविष्यात
"मनुष्यस्वभावाचा आजवरचा थोर निरीक्षक",
असं काही त्याच्याबद्दल कुणी म्हणणार नाही..!
कारण दुनियेला हादरवून बिदरवून टाकणारं काहीतरी
लिहिण्याची महत्वाकांक्षा ऐन तारुण्यात थोडीबहुत
असते..! ती नंतर सरळसरळ भुईसपाटच होते..!

शब्दखुणा: 

पुस्तक परिचय : मध्यरात्रीनंतरचे तास (तमिळ लेखिका - सलमा. अनुवाद - सोनाली नवांगुळ)

Submitted by ललिता-प्रीति on 13 August, 2022 - 03:28

पुस्तकाबद्दल लिहिण्यापूर्वी सलमा यांच्याबद्दल थोडंसं. (कारण त्यामुळेच मुळात मी हे पुस्तक वाचायचं ठरवलं.)

सलमा हे त्यांचं टोपणनाव आहे. तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात एका कर्मठ मुसलमान कुटुंबात त्या वाढल्या. त्यांच्या घरात मुलगी वयात आली की घरातल्या पुरुषांशिवाय इतर कुणाचीही तिच्यावर नजर पडू नये म्हणून तिचं घराबाहेर पडणं बंद केलं जात असे. अगदी तिचं शाळाशिक्षणही अर्धवट बंद होत असे. तिचं लग्न झालं की मगच तिची त्यातून सुटका होत असे. सलमा यांच्यावरही ती वेळ आलीच. त्यांनी विरोध करून पाहिला. पण उपयोग झाला नाही. पुढे ८-९ वर्षं त्यांनी अशी घराच्या चार भिंतींत काढली.

पुस्तक परिचय : क्लोज एन्काउंटर्स (पुरुषोत्तम बेर्डे)

Submitted by ललिता-प्रीति on 22 July, 2022 - 03:43

पुस्तक आणि लेखकाच्या नावाची जोडी एकत्र पाहिली, तर वाटतं की नाट्य-चित्रसृष्टीतल्या काही व्यक्ती-वल्लींबद्दल किंवा अनुभवांबद्दल लेखन असेल. पण पुस्तकाचं मुखपृष्ठ काही वेगळंच सांगतं... याच क्रमाने विचार करत मी हे पुस्तक उचललं.

पॉडकास्ट ते पुस्तक

Submitted by MandarKulkarni on 3 July, 2022 - 23:43
A cover of a book: 'Nivadak Vishwasamwaad'

‘विश्वसंवाद’ हा मराठीतला पहिला पॉडकास्ट मी सुरु केला, त्याला जून २०२२ मध्ये साडेपाच वर्ष पूर्ण होतायत. “काही आगळं-वेगळं, हट के काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पा” असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे. जानेवारी २०१७ ते डिसेम्बर २०२१ या पाच वर्षांत ६२ एपिसोडस प्रसिद्ध झाले असून जुलै २०२२पासून पुन्हा नवीन एपिसोडस प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. मोबाईल फोनवरील Apple podcast, Stitcher अशा apps बरोबरच ‘विश्वसंवाद’ चा YouTube channel ही आहे, जिथे आजपर्यंतचे सगळे एपिसोडस ऐकता येतील: www.youtube.com/c/vishwasawaad

विषय: 

पुस्तक परिचय : विश्वामित्र सिण्ड्रोम (पंकज भोसले)

Submitted by ललिता-प्रीति on 28 June, 2022 - 04:28

९० च्या दशकाच्या सुरुवातीला जागतिकीकरणानंतर आपल्याकडच्या शहरी भागांमध्ये झपाट्यानं बदल व्हायला लागले. नवनवी टीव्ही चॅनल्स, इंटरनेट कॅफे यांच्यामार्फत आधी कधीही न पाहिलेलं एक जग लोकांच्या घरात पोहोचलं. एम-टीव्ही, चॅनल-व्ही यांचाही यात मोठा हात होता. परदेशी पॉप गायकगायिका, त्यांचे म्युझिक व्हिडिओज, त्यातली फॅशन या सगळ्याचं विशेषतः तरुणांना वेड लागलं. पुढे अनेक घरांमध्ये PC दिसायला लागले. वॉकमन्स, मोबाइल फोन्स, CDs ची देवाणघेवाण हे पाठोपाठ होतंच. त्यातूनच पॉर्नोग्राफी बघण्याच्या व्यसनाने शिरकाव केला...

Pages

Subscribe to RSS - पुस्तक