भाषांतर

अपहरण - भाग ८

Submitted by स्मिताके on 10 March, 2024 - 09:52

भाग ७ - https://www.maayboli.com/node/84756

बिजली किनाऱ्याजवळ चालली होती. कर्नल पाहत उभे होते. त्यांनी आपल्या मुलाला बाहेर जाऊ दिलं नाही. दोघे एकमेकांशेजारी उभे राहून संतप्त जमाव न्याहाळत होते. कोस्ट गार्डचे सैनिक सज्ज होते. बिजली कधी धक्क्याला लागते याची वाट पाहत होते. ती पन्नास फुटांवर येताच कोस्टगार्डच्या प्रमुखाने मोठ्याने गर्जना केली, "थांबा!"

शब्दखुणा: 

अपहरण - भाग ४

Submitted by स्मिताके on 25 February, 2024 - 15:18

भाग ३ - https://www.maayboli.com/node/84694

कर्नल ऑडमिंटन.
एक उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व. अगागागा काय त्यांची दाढी.. लांब, भरघोस.. असायचीच! रेझरचं पातं कधी पाहिलेलंच नव्हतं ना तिने !कर्नलचं वय असेल पंचेचाळीस. ते विधुर होते, आणि त्यांना पंधरा वर्षांचा एक मुलगा होता.

शब्दखुणा: 

अपहरण - भाग ३

Submitted by स्मिताके on 21 February, 2024 - 11:50

भाग २: https://www.maayboli.com/node/84681

या घटनेला बरोबर एक आठवडा झाल्यादिवशी न्यू यॉर्क हेराल्ड वृत्तपत्रात एक जाहीरनामा छापण्यात आला. हा मसुदा कोणीतरी जाहिरात म्हणून पाच डॉलर्सच्या मोबदल्याबरोबर त्या वृत्तपत्राकडे पाठवला होता. त्यावर शिक्का होता, न्यू यॉर्क टपाल खाते, विभाग २. त्यावर पाठवणाऱ्याचा नावपत्ता नव्हता.

"अमेरिकन नागरिकांसाठी जाहीरनामा.

शब्दखुणा: 

अपहरण - भाग १

Submitted by स्मिताके on 14 February, 2024 - 08:16

८ जून १८९३. सकाळी दहा वाजताची वेळ. न्यू यॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, बॉस्टन..सर्व मोठ्या शहरांतल्या स्थानिक वृत्तपत्रांच्या इमारतींबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. पूर्वी जेम्स गारफील्ड या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर अशी गर्दी झाली होती म्हणतात. रात्रीपर्यंत तर इतकी खळबळ माजली, की लिंकन यांच्या हत्येच्या दिवसाची आठवण यावी.

शब्दखुणा: 

भिकारी (भाषांतर)

Submitted by स्मिताके on 26 January, 2022 - 12:20

"गरिबावर दया करा साहेब. तीन दिवस अन्न चाखलं नाही साहेब. रात्रीच्या मुक्कामापुरते पाच कोपेक्सदेखील नाहीत हो. देवाशपथ सांगतो. पाच वर्षं गावाकडे मास्तर होतो. झारच्या या नव्या झेम्स्तवो सरकारच्या कारस्थानामुळे नोकरी गेली माझी. खोटी साक्ष देऊन बळी घेतला त्यांनी माझा. वर्ष झालं, मला राहायला घर नाही, साहेब."

सेंट पीटर्सबर्गमधले वकील स्क्वॉर्तसोव्ह त्याच्याकडे बघत उभे होते. त्याचा तो गडद निळा फाटका कोट, नशा केल्यासारखे धुंद डोळे, गालावरचे तांबडे डाग पाहून त्यांना वाटलं, आपण याला याआधी कुठेतरी पाहिलं आहे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भाषांतर