आपली खाद्य संकृती पंचक्रोशीच्या सीमा ओलांडून कधी पलीकडे गेली ते समजलं ही नाही. जिल्हा, प्रांत ह्यांच्या पलीकडे जाऊन आता आपण दुसऱ्या देशातले ही पदार्थ आपलेसे केले आहेत. घावन , आंबोळ्या ह्यांच्या बरोबर डोसे, अप्पम ह्यांनी ही न्ह्याहरी च्या ताटलीत मानाचे स्थान पटकावले आहे. आणि थलिपीठं, आणि कुरडया शेवया इतकाच नव्हे तर काकणभर अधिकच पिझ्झा आणि पास्ता आपल्याला आवडू लागला आहे. अर्थात त्यात काही गैर आहे असं ही नाही. सतत नावीन्याचा ध्यास, ओढ हे मानवी जीवनाचं प्रतीक आहे. ह्या मुळेच तर मानवाने इतकी प्रगती करून दाखवली आहे . असो.
पुर्वेला लाली शिंपडत पहाट हरित तृणांवर दवाचा वर्षाव करू लागली. पक्षांनी किलबिलाट सुरु केला आणि हस्तिनापुर नगराला जाग आली. महालात दास-दासींचा वावर चालू झाला. महाराज दास महराजांच्या कक्षेत फलाहार घेऊन गेला. पण महाराज तिथे होतेच कुठे?
आपलं बाप्पाशी असलेलं नातं वयाबरोबर बदलत जातं नाही? आपली समज वाढते तसा कदाचित अधिक समजत जातो बाप्पा आणि दिसायला लागतो त्याच्या वेगवेगळ्या रुपात. लहान्पणी तो बुद्धी देणारा बाप्पा असतो, मग मागण्या पुरवणारा देव होतो, ज्याच्याशी वाद घालता येतो असा मित्र होतो, प्रश्नांची उत्तरे असणारा सखा होतो, आपला आधार होतो, दाता होतो, त्राता होतो.
मित्रांनो... आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी नवीन गाणं रेलीज केलं आहे. जरूर ऐका, विसर्जनापर्यन्त रोज वाजवा आणि शेअर करा.....
https://youtu.be/_hfF0zfQ8nM
धन्यावाद...
प्रवरा संदीप.
नमस्ते मित्र मैत्रिणींनो,
ही गणपतीची आरती माझ्या बाबांच्या काकांनी तयार केली आहे.
आम्ही ती अनेक वर्ष घरी रोज म्हणतो. तिचा प्रसार व्हावा हि इच्छा आहे.
तुम्हाला आवडल्यास तुम्हीही म्हणू शकता.
जय देव जय देव जय ओंकार रूपा
आरती ओवाळिता नुरविशी पापा || धृ ||
विश्वस्वरूपा तुजला स्थापू मी कोठे
आवाहन करू कैसे संमंतपी थाटे
तव निज महिमा आठविता तर्को दधि आटे
पाहुनी अद्भुत शक्ती आदर बहू वाटे || १ ||
||गणपती बाप्पा मोरया| मंगलमूर्ती मोरया|| _/\_
गजानना तव रूप मनोहर _/\_
१.

२.

३.

४.

५.

६.

७.
हात जोडूनं | करतो वंदन | देव गजानन | आरंभी मी || १ ||
तुझ्या कृपेनं | तुझे नमन | येते घडून | शुभ कार्यी || २ ||
दु:ख सरुनी | विघ्न पळूनी | जाते होवुनी | विश्व सुखी || ३ ||
मी तो बालक | नवथर साधक | भक्ती एक | तुज मागे || ४ ||
रिद्धीसिद्धीचा | दाता जगाचा | परि मी त्याचा | नसे भुका || ५ ||
तुझ्या चरणी | मी पण वाहुनी | जावी संपूनी | सर्व गती || ६ ||
हेच सांगणे | देवा मागणे | ठाव देणे | तुझ्या पदी || ७ ||
तव गुण गाणी | झिजो लेखणी | सदैव वदनी | नाव तुझे || ८ ||
गणेशोत्सवातील मी क्रोशाने विणलेल्या गणपतीला आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात, कौतुक केलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद ! पण ते नुसते कसे म्हणू ? त्यासाठी माझ्या मनातल्या धन्यवादांनी हे रूप धारण केलय 

"नारायण, नारायण" असा जप करत नारदमुनी गजाननाकडं आले. दोन हातात दोन छोटे ब्रश आणि सोंडेत एक मोठा ब्रश. एक सुंदर निसर्गचित्र रंगवण्यात दंग होते श्रीगणेश. पृथ्वीतलावर सातत्यानं ये-जा करणार्या मोजक्या देवांपैकी श्रीगणेश एक. आपण जाऊ तिथला परिसर सुंदर बनवायचा त्यांचा आग्रह. हिरव्या-पिवळ्या रंगांची मुक्त उधळण केली होती त्या चित्रात. आता हे चित्र पूर्ण झालं की पृथ्वीवरच्या नक्की कुठल्या भागात बसवलं जाईल, या विचारात नारदमुनी गढून गेले. इतक्यात गणेशाचं त्यांच्याकडं लक्ष गेलं.
"प्रणाम मुनीवर, कसं काय येणं केलंत?" सगळे ब्रश बाजूला ठेवत गणेशानं नारदमुनींना विचारलं.
फिल्लमी गाण्यांवर देवादिकांची भजनं (?) ऐकायला येणं तुम्हा आम्हाला नवीन नाही. कुठल्याही 'फेमस' देवळाच्या परिसरात अशा कलाकृती ऐकायला मिळतात. तर या संगीतप्रकारात माझ्याकडून एक भर पडण्याचा योग असावा; म्हणून मला हे जे गणपतीचं भजन (हा शब्द योग्य न वाटल्यास जो शब्द योग्य वाटेल तो इथे वाचावा) स्फुरलं, ते आपणापुढे मांडत आहे.
चूक भूल माफ असावी.
चेन्नई एक्सप्रेस च्या लुंगी डान्स या रचनेच्या चालीवर आधारित.
कपाळावर; लावुनि गंध
बाप्पाचा; घेऊनि छंद
सेवा करू प्रेमभावाने
म्हणू सारे एकमुखाने
तूच अमुची शान... (रे बाप्पा)
तूच अमुचा प्राण...(रे बाप्पा)
तूच अमुची शान... (हे)