मला गणपतीच्या पूजेसाठी लागणार्या पत्री आणि फुलांमधील काहींची नावे इंग्लिशमधून हवी आहेत. बोटॅनिकल नाव देऊ शकलात तर उत्तम.
१. मधुमालती.
२. माका (म्हणजेच भृंगराज का हे कन्फर्म करायचे आहे)
३. डोरली
४. अर्जुन सादडा
५. मरूवा
६. जाई
८. अगस्ती.
फुलांमधे:
१. बकुळ,
२. उंडीच्या झाडाचे फूल
३. नांदुरकीचे फूल
४. चवईच्या झाडाचे फूल
५. कावळा नावाच्या झाडाह्चे फूल (याला संस्कृतमधे गोविंदपुष्प म्हटलय)

बा गजानना..
सुखि ठेव भक्तगना..
माझी मावस-आत्ये सून ( माझ्या बहिणीच्या नणंदेची सून ) एक गुणी कलाकार. तिच्या अनेक कलाकृती नेहमीच वाखाणण्याजोग्या. या वर्षी ती आणि तिच्या दोघी मैत्रिणी अन त्यांच्या लेकींनी त्यांच्या सोसायटीच्या गणपतीची सजावट फार फार सुरेख केली आहे. मला त्यांची ही कला इथे दाखवावी वाटली, अन त्या तिघींनी तशी लगेच परवानगीही दिली. त्या तिघींचे मनापासून आभार अन कौतुकही.
ह्युस्टनच्या गणपतीची क(व्य)था
अमेरिकेत, गणेश्-मुर्ती कशी बनवावी? साधारण १ फूटी बनवून पहायची आहे. बादली मधे विसर्जित करता यायला हवी.
कोणाला काही माहिती असल्यास कृपया कळवा.
-धन्यवाद,
परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मला ही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवर मला तसे कळवण्यात आले. ऑफिसमध्येही नेमके त्याच दिवशी जरा जादा काम असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते. त्यानंतर पुन्हा मंदीर. वैताग नुसता डोक्याला. पण नकार देण्याचा पर्याय नव्हताच. मी आत नाही येणार बाहेरच थांबेन एवढ्यावर काय ती मांडवली केली.