ग्रामव्यवस्था...
(गम्भीर मोड ऑन , च्यायला हेबी वरडून सांगावा लागतय )वाहून जाईल जाऊद्या. खरे तर सगळे कुळकरणीच. पूर्वी ग्रामव्यवस्थेत जमीनेचे सर्व रेकॉर्ड शिक्षणाची परम्परा असल्याने ब्राम्हण कुळकरणी ठेवत . ज्या ब्राम्हणाला हे कुळ्करणीपद मिळालेले असे ते ट्रॅडिशनल असे.जमिनीवर लागलेल्या कुळाची नोन्द व तत्सम जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे हे त्यांचे काम. त्याबद्दल त्याना वेगळी जमीन उपजिवीकेसाठी मिळे त्याला कुळकरणी इनाम म्हणत. मुलकी पाटील हे दुसरे वतनदार. त्यांचे काम शेतसार्याची वसूली करून सरकारात भरणे. आणि तिसरे पोलीस पाटील गावातील तंटे मिटवणे. गुन्ह्यांची खबर पोलीस स्टेशनला देणे, प्रेतांचे पंचनामे इ.