“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच “हा सूर्य आणि हा जयद्रथ” असा निवाडा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अस्त्राचा आपल्याला आता प्रयोग करायचा आहे आणि ते अस्त्र म्हणजे स्वतः केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेली कबुली.” भारताच्या केंद्र सरकारने श्री० सलील कुळकर्णी ह्यांच्या हस्ते ही एक नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे.

आता यापुढे महाराष्ट्रात कुठेही “हिंदी राष्ट्रभाषा आहे” या सबबीखाली मराठीची उपेक्षा, गळचेपी होत असेल तर या पुराव्याचा उपयोग करून त्याला खंबीर विरोध करायलाच पाहिजे.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.

http://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/

आज आपणा सर्व स्वाभिमानी मराठी मावळ्यांना एक सूचना करावीशी वाटते. वरील मूळ पत्राच्या भरपूर छापील प्रती काढून त्या नेहमी हाताशी ठेवा. ज्येष्ठ राजकीय नेत्यांपासून आणि रेल्‌वे-टपाल-बॅंका-राज्यशासन यांमधील अधिकार्यांापासून ते बस-लोकलमधील मराठी-अमराठी सहप्रवासी किंवा मंडईतील भाजीविक्यांपर्यंत कोणीही "हिंदी-ही-राष्ट्रभाषा आणि मराठी-ही-दुय्यम-भाषा" ह्या पाढ्यातील एक शब्द जरी उच्चारला तरी त्याला या पत्राची एक प्रत सप्रेम भेट द्या.

- अमृतयात्री

प्रकार: 

अगदी अगदी! झक्कास बातमी! (पेढे वाटा, लोकहो!) Happy
मी माझ्या ऑर्कुटात स्टेटस-ओळ म्हणून या बाफाचा दुवा टाकणार. Proud

पण आपले माननीय मुख्यमंत्री तर म्हणतात की हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे आणि ते मान्य न करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू.

शरद

परीक्षेसाठीचा प्रश्न (२ गुण)
----------------------
कोण कोणास (उद्देशून) म्हणाले?
'तो खुळा मुख्यमंत्री आहे'

उत्तर : मंत्री पतंगराव कदम अशोक चव्हाण यांना Happy