एकच अमोघ उपाय - मराठी एकजूट !! (लोकसत्ता, २० डिसेंबर २००९)

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

भाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्परविरोधी (contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) मुळीच नाहीत; हे नीट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला, त्याच क्षणी आणि त्याच घटनेमुळे, मी माझ्या आजीचा (आईच्या आईचा) नातूसुद्धा ठरलो. ही दोन्ही नाती मी एका वेळीच स्वीकारतो आणि दोन्ही नात्यांचा मला सारखाच अभिमान वाटतो. या सर्व विधानांमध्ये काही विरोधाभास आहे असे आपल्याला वाटते का? त्याचप्रमाणे मी महाराष्ट्रीय आहे आणि म्हणूनच मी भारतीय आहे व या दोन्ही निष्ठांचा मला अभिमान वाटतो, ही विधानेही सुसंगतच आहेत, हे मनाला स्पष्टपणे उमगायला हवे.
---------------
२० डिसेंबर २००९ या दिवशी लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेला श्री० सलील कुळकर्णी यांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.

http://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

विषय: 
प्रकार: 

अप्रतिम आणि समयोचित.

ह्याविषयी तथाकथित मराठी माध्यमांनी नुसता पुढाकारच नव्हे तर 'आधी केले मग सांगीतले' ह्या न्यायाने स्वतःचे धेडगुजरीकरण थांबवायला हवं. इलेक्ट्रॉनिक माध्यमात [दूरचित्र वाणीवरच्या विविध वाहिन्या अगदीच टाकाऊ आहेत] मराठी भाषेतल्या विविध महा-जाल संकेत स्थळांचाही समावेश होतो. सुदैवानं तरूण पिढीचा वाढता प्रतिसाद त्यांना मिळतो आहे आणि तरीही त्यांवर प्रसिद्ध होणारं लेखन कमीतकमी 'इंग्रजाळलेलं' असतं, हे विशेष. तथाकथित लोकप्रिय माध्यमांनी या संकेत स्थळांवरचं लिखाण आणि त्यावरचे प्रतिसाद वाचले तर त्यांच्या लक्षात येईल की 'तरुण वाचक आणि प्रेक्षक-वर्ग आकृष्ट करण्यासाठी नाईलाजानं मिंग्लिश वापरावं लागतं' ही सबब किती फुसकी आहे! त्यामुळे, 'मायबोली' सारख्याच इतर संकेत स्थळांवरही तुमचा लेख प्रसिद्ध व्हावा आणि 'अमृतमंथन' ह्या ब्लॉगची लिंक उपलब्ध असावी असं मला वाटतं. [ब्लॉग आणि लिंक हे शब्द खूप रुळले आहेत, त्यांचे प्रतिशब्द चटकन आठवले नाहीत म्हणून ते तसेच वापरले आहेत. क्षमस्व!]

साहित्यसंस्था [मराठी महमंडळ, म.सा.प. यांसरख्या संकुचित राजकारणाचे अड्डे झालेल्या निष्क्रिय आणि निब्बर कातडीच्या निर्लज्ज संस्था] आणि शासन यांनीही पुढे यायला हवं. फक्त लोकमताचा रेटाच ते करू शकतो. त्यामानाने मराठी प्रकाशक आणि गावोगावी ग्रंथालयं चालवणार्‍या सेवाभावी संस्था यांचं सक्रीय सहाय्य या चळवळीस मिळणं अवघड जाउ नये.

-बापू करंदीकर